Tuesday, June 7, 2011

माझं Tweet.....कॅम्लिनची शाई आणि कॅम्पसची वही.

७ जुन २०११:   गेल्या आठवड्यात दांडेकर कुटूंबाच्या कॅम्लिन कंपनीने जापानच्या कोकियो या बलाढ्या कंपनी बरोबर जॉईन्ट वेंचर करार केला, त्याची सविस्तर माहिती दैनिक लोकसत्ताच्या अर्थवृतान्त मधे काल म्हणजे ६ जुन रोजी प्रसिद्द झालेली आहे.   ह्या करारासाठी दांडेकर कुटूंबियांना आणि कॅम्लिन कंपनीला संपुर्ण डील तयार करण्यापासुन ते कोकियो बरोबर सविस्तर चर्चाकरुन करार करण्यासाठी लागणारी कायदेशीर बाजु संभाळायच काम  माझ्या फर्म तर्फे मी पाहिलं.   हा करार म्हणजे माझ्या दृष्टीने एक "क्लासिक"   जॉईन्ट वेंचर आहे.   मी नेहमी म्हणतो की आजच्या स्पर्धात्मक जगात टिकुन रहायचं असेल तर आपण जिथं कमी पडतो तिथं इतरांच सहकार्य घेण्यात कसलाही कमीपणा नसतो;   तेंव्हाच १+१=११ हे करता  येतं.     

आज   टेकनॉलॉजी  रोज बदलते आहे,  मार्केटिंगचे स्ट्राटेजी रोज बदलत आहे, नव-नविन उत्पादन मार्केट मधे येत आहेत अशा वेळी आपल्या उत्पादनांना complimentary products शोधले पाहिजे म्हणजे उत्पादनांचा पुर्ण बुके आपल्या कस्टमर्सला देता येतो.   ज्यांच्या कडे रिसर्च करुन नविन प्रोडक्टस तयार करण्याची क्षमता नसेल, किंवा नविन प्रोडक्टस मॅन्युफॅचर करण्यासाठी लागणारे भांडवल नसेल तर त्यांनी एखाद्या मोठ्या कंपनी बरोबर सहकार्याचा करार करणे क्रमप्राप्त आहे.   

कॅम्लिन कडे शाई कलर्स आणि स्टेशनरीचे काही उत्पादन वगळता इतर कुठलेही प्रोडक्टस नाही.  म्हणुन कॅम्लिनच्या शाई आणि कंपॉस बॉक्स बरोबर कोकीयो कंपनीच्या "कॅम्पस" नोटबुक्स आल्या तर त्यांना मोठ मार्केट सहज मिळवता येईल.   कोकीयो कंपनी ही जपानची नोटबुक्स बनविणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.   भारता मधे ब्रॅण्डेड नोटबुक्स/ वह्यांच मार्केट तयार होत आहे.   सध्या भारता मधे शिक्षणाला मुलभुत अधिकार मिळाल्याने शिक्षणाच महत्व आपल्या देशात रोज वाढत आहे.  अशा वेळी नुसत शाई आणि कलर्स या दोन प्रोड्क्ट्स वर कॅम्लिन आणखी मोठी होऊ शकली नसती.  त्याच बरोबर त्यांची शाई आणि कलर्स हे जागतिक बाजारपेठत जाणं गरजेच होत.  कोकिय़ो त्यांची नोटबुक्स भारता मधे कॅम्लिन मार्फत तर कॅम्लिनची शाई आणि कलर्स कोकियो मार्फत जपान आणि इतर देशांमधे विकु शकतील.  हे दोघांसाठी win win आहे.   ह्या सहकार्याचे इतर गोष्टी लोकसत्तेत प्रसिद्द झालेल्या अहातेच.   आपल्या कंपनीचे ब्रॅण्ड आणि उत्पादन हे जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात न्यायचे असेल तर विविध प्रकारच्या सहकार्याचे करार करावेच लागती त्याला पर्याय नाही. हे करत असताना संपुर्ण मालकी हक्क सुद्दा सोडावे लागतील, नव्हे इतरांनी ते तसे सोडले देखिल आहेत.  छोट्या कंपनीचे पुर्ण मालक राहण्यापेक्षा मोठ्या जागतिक कंपनीत छोटी भागिदारी म्हणजे वाईट अस समजण्याच कारण मुळीच नाही.  जगातल्या मोठ मोठ्या कंपन्यांचे मुळ मालक कंपनी जस जशी मोठी होत जाते तशी त्यांची मालकी कमी कमीच होत जाणार.  भारतातल ताज उदाहरण म्हणजे अगदी रिलायंसच्या मुकेश अंबानींनी देखिल ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या २३ तेल आणि गॅस ब्लॉक्स मधील ३०% शेअर विकला.  त्या विषयी जाणकारांनी काय म्हटंल आहे ते खाली बघा.... 
"Reliance Industries Ltd’s decision to sell 30 per cent stake to British Petroleum in its 23 oil and gas blocks, including the gigantic eastern offshore KG-D6 fields, for $7.2 billion as part of a long-term deal that involves a total investment of $20 billion, is seen by many as a win-win for both the companies. The deal will not only provide RIL with BP’s skills in deep water oil exploration, but it will also help the UK firm to emerge from the miseries of last year’s Gulf of Mexico environmental disaster.

"It is a marriage of two equals. BP is the best explorer in deep water and its technology will only help RIL raise it production levels from 60-80 mmscmd,” said Sushil Choksey, director of Rosy Blue Securities.

मी गेल्या एका ब्लॉग मधे म्हटलं होत की मराठी उद्दोजकांचा "विश्वासाहर्ता" हाच मोठा ब्रॅण्ड आहे त्याचा प्रत्यय मला इथं सुद्दा आला.  कोकियो कंपनीने संपुर्ण चर्चे दर्म्यान कुठलाही अविश्वास दांडेकर कुटूंबियांवर दाखवला नाही.  त्यांची मॅनेजमेंन्ट तशीच ठेवुन कंपनीन नव्याने पैसा आणि नविन प्रोडक्टस आणायला ते तयार झाले.   दांडेकर कुटूंबियांना, कॅम्लिन आणि कोकियो व दोघांचेही भागधारकांना शुभेच्छा!

********************************************************

लोकसत्ता अर्थवृतान्त दिनांक ६ जुन २०११

‘उंटा’ची नवी ‘वाट-चाल’   -प्रसाद केरकर.

सुमारे ८० वर्षांची जुनी असलेली व घरोघरी पोहोचलेल्या कॅम्लिन लि. या कंपनीने जपानच्या कोकुयो या कंपनीशी सहकार्य करार करून त्यांना ५० टक्केपेक्षा जास्त भांडवल दिल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात एक नवा चांगला पायंडा घातला गेला आहे. उभयतांत झालेल्या सहकार्य करारानुसार पहिल्या टप्प्यात कोकुयो तातडीने कॅम्लिनमधील १० टक्के समभाग खरेदी करील. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २० टक्के समभाग खरेदी करेल. कोकुयो यानंतर २० टक्के समभाग खुल्या बाजारातून खरेदी केल्यावर त्यांचा भांडवलातील वाटा ५० टक्क्य़ांवर जाईल. असे असले तरीही कॅम्लिनचे प्रवर्तक असलेल्या दांडेकर कुटुंबीयांकडे असलेले कॅम्लिनचे अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालकपद तसेच कार्यकारी संचालकपद यापुढेही कायम राखले जाणार आहे. सध्या कॅम्लिनच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप दांडेकर व कार्यकारी संचालकपदी श्रीराम दांडेकर आहेत. दांडेकर कुटुंबीय जोपर्यंत कंपनीतील आपले भांडवल १३ टक्क्य़ांपर्यंत राखतील तोपर्यंत त्यांना ही दोन पदे कायम राखता येणार आहेत. त्या जोडीला सध्या कंपनीचे असलेले मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांनाही हे पद कायम स्वरूपी देण्यात आले आहे. कंपनीच्या संचालक मंडळात अशा प्रकारे दोन प्रतिनिधी दांडेकर कुटुंबीयांचे तर चार प्रतिनिधी कोकुयोचे असतील. कॅमल व कॅम्लिन हे दोन्ही ब्रँड यापुढेही कायम राहाणार आहेत. कॅम्लिन कंपनीतील सध्या असलेले दांडेकर कुटुंबीयांचे भांडवल हे कमी होणार असले तरी त्यांचा व्यवस्थापनावरचा ताबा काही सुटणार नाही हे या कराराचे वैशिष्टय़ ठरावे.

कॅम्लिन ही शालेय स्टेशनरी उद्योगातील देशातील आघाडीची कंपनी असली तरी त्यांची गेल्या काही वषार्ंत असंघटित क्षेत्रातील उत्पादकांमुळे मोठी दमछाक झाली होती. कॅम्लिनच्या या ‘उंटाची’ गती मंदावली होती. वाढत्या स्पर्धेमुळे नफ्यावर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळेच की काय ८० वर्षे जुनी असलेली ही कंपनी जेमतेम ३६० कोटी रुपयांची उलाढाल गाठू शकली. कॅम्लिनला जर उलाढाल वाढवायची असेल तर अनेक नवीन उत्पादनांची मालिका बाजारात आणणे आवश्यक होते. त्यासाठी नव्याने गुंतवणूक करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना या उद्योगातील विदेशी कंपनीचे सहकार्य घेण्याची आवश्यकता होती. अशा वेळी त्यांना कोकुयोची साथ मिळाली आहे. कोकुयो ही सुमारे १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली जपानमधील शालेय नोटबुक व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. त्यांचा जपानमधील या उद्योगातील वाटा ५० टक्क्य़ांहून जास्त असून त्यांचा ‘कॅम्पस’ हा ब्रँड तेथे फार लोकप्रिय आहे. आता उभयतांच्या सहकार्य करारामुळे कोकुयोच्या नोटबुक्स तसेच त्यांची विविध शालोपयोगी वस्तू कॅम्लिनच्या देशव्यापी विक्री जाळ्यातून विक्रीला येतील. याचा कंपनीला स्पर्धेत टिकण्यासाठी तसेच उलाढाल वाढविण्यासाठी म्हणजेच पर्यायाने नफा वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच कॅम्लिनची उत्पादनेही जपानच्या बाजारपेठेत कोकुयोच्या माध्यमातून पोहोचतील. अशा प्रकारे नजीकच्या काळात कॅम्लिनने हजार कोटींची उलाढाल गाठल्यास आश्चर्य वाटावयास नको.

उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपल्याकडे कॉर्पोरेट जगतातील सर्व सूत्रे बदलली आहेत. कंपनीचा ताबा आपल्याकडे राखण्यासाठी बहुसंख्य भांडवल प्रवर्तकांकडे असणे आवश्यक असते हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र सध्याच्या स्पर्धेच्या युगात कंपनी मोठी होणे तिचे बाजारपेठेत प्रभुत्व असणे महत्त्वाचे आहे. लहान डबक्यात राहण्यापेक्षा समुद्रात पोहण्याला खरा अर्थ आहे. मग त्यासाठी कंपनीतील जास्तीत जास्त भांडवल आपल्याकडे राखण्यापेक्षा कमी भांडवल ठेवणे शहाणपणाचे ठरते. कॅम्लिनचे हे डिल करण्यात मोलाचा वाटा असलेले जे. सागर या लॉ फर्मचे पार्टनर नितीन पोतदार यांच्या सांगण्यानुसार, कंपनी लहान ठेवून तिचे बहुतांश समभाग आपल्याकडे ठेवण्याचा काळ आता गेला आहे. आता कंपनीचे कमी भांडवल ताब्यात ठेवा परंतु ती कंपनी मोठी झाली पाहिजे याला महत्त्व आहे. अनेक मराठी उद्योजक आपल्या कंपनीवर ताबा ठेवण्यासाठी अन्य दुसऱ्याशी सहकार्य करार करून त्यांना भांडवलातील वाटा देण्यास तयार नसतात. यामागे त्यांची अनेकदा ‘भावनिक गुंतवणूक’ जास्त असते. ती असणे स्वाभाविक आहे, परंतु काळाची पावले ओळखणेही गरजेचे असते. ही पावले जे उद्योजक ओळखत नाहीत त्या कंपन्या व उद्योजक काळाच्या ओघात संपण्याचा धोका असतो.

कॅम्लिनने काळाची पावले ओळखून योग्य वेळीच जपानी कंपनीशी हा सहकार्य करार केला आहे. या सहकार्य कराराचा केवळ कॅम्लिनलाच फायदा होणार नाही तर कोकुयोलाही होणार आहे. त्यांना भारतासारख्या एका मोठय़ा बाजारपेठेचे दरवाजे कॅम्लिनच्या माध्यमातून खुले झाले आहेत. कॅम्लिनच्या प्रवर्तकांना आपले काही भांडवल गमवावे लागले असले तरीही त्यांचा कंपनीच्या व्यवस्थापनावरील वाटा काही ढिला होणार नाही. दांडेकर कुटुंबीयातील काही जणांना आपले भांडवल विकायचे होते. या सहकार्य करारामुळे त्यांना आपले कंपनीतील भांडवल विकण्याचा मार्ग खुला झाला. तसेच देशातील ‘कॅमल’ हा जुना ब्रँड संपुष्टात येणार नाही. उलट तो आणखी झपाटय़ाने विस्तारणार आहे. कोकाकोलाने ज्यावेळी पार्ले ताब्यात घेतली त्यावेळी त्यांनी पार्लेची उत्पादने संपुष्टात आणली. कारण त्यांना स्पर्धा संपवायची होती. इकडे तसे होणार नाही. कारण कोकुयोची स्पर्धा कॅम्लिनच्या उत्पादनांशी नाही आहे. या कराराचा आणखी एक फायदा म्हणजे कॅम्लिनच्या प्रवर्तकांना कोणतीही नवीन गुंतवणूक न करता कंपनीच्या विस्तार योजना मार्गी लावता येतील. यातून कंपनीच्या पोर्टफोलियोत उत्पादनांची एक नवी मालिका दाखल होईल. अशा प्रकारे या कराराच्या माध्यमातून कॅम्लिनने एकाच दगडाने अनेक पक्षी मारले आहेत असे म्हणणे योग्य ठरेल. कॅम्लिनच्या ‘उंटा’ने अशा प्रकारे आपली नवी ‘वाट-चाल’ सुरू केली आहे. ही चाल यशस्वी ठरली तर या ‘उंटा’च्या पावलांवर अन्य उद्योजकही पाऊल टाकतील यात काहीच शंका नाही.

4 comments:

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

कॅम्लिन म्हटले कि आज हि उंटाचे वैशिष्टपूर्ण चित्र असलेली कंपास बॉक्स,पोष्टर कलर्स पटकन डोळ्यासमोर येतात. माझ्यासारख्या कित्येकांची स्वप्ने रंगीत करण्याचे काम कॅम्लिनच्या कलर्सनी केले आहे. लहानपणी परीक्षेच्या वेळी कॅम्लिन चीच कंपास हवी असा ...आमचा मुलांचा हट्ट असायचा. आणि हा हट्ट पालकांकडून पुराविलाही जायचा यांचे कारण बाजारातील इतर हलक्या दर्जाच्या कंपास पेक्षा कॅम्लिन थोडी महाग असली तरी तीन ते चार वर्ष सहज चालायची. दर्जाबाबातीत कॅम्लिन ने कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे आणि कॅम्लिन सारख्या दर्जेदार मराठी उद्योजाकांमुळे मराठी व्यावसायिक म्हणजे विश्वासाहर्ता हे समीकरण सर्वमान्य झाल.

असे जरी असले तरी व्यावसायिक स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि अधिक नफा असलेल्या क्षेत्रांचा सातत्याने घ्यावयाचा शोध यामध्ये कॅम्लिन कुठे तरी कमी पडले आणि त्यामुळेच कॅम्लिनच्या उंटाची चाल गेल्या दशकात मंद होऊ लागली. मात्र गेल्या काही वर्षात दीपक घैसास यांच्या सारख्या स्वतंत्र संचालकांची संचालक मंडळावर नियुक्ती करून कॅम्लिन ने अनेक धाडसी निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे. कोकियो बरोबर विस्तार हा याच महत्वाकांक्षी धोरणांचा भाग असावा. एक मराठी माणूस म्हणून कॅम्लिन ने घेतलेल्या या समयोचित निर्णयाचे कौतुक वाटते. कॅम्लिनचे कार्यक्षेत्र या निर्णयामुळे वाढेल आणि एक मराठी कंपनी गोल्बल होईल हा सार्थ अभिमान आहेच. कॅम्लिनच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.!

हे सर्व असूनही कॅम्लिन गाईड, व्यवसाय या क्षेत्रात का उतरली नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. मागे एकदा श्रीराम दांडेकर यांना हा प्रश्न मी विचारला होता परंतु फारसे समाधानकारक उत्तर नाही मिळू शकले. कदाचित येणाऱ्या काळात या क्षेत्रातही कॅम्लिन आपले हात पाय पसरेल अशी अशा वाटते.

Mr. Padmakar Shirsat had placed the above comment on my facebook which I am reproducing here.

Nitin Potdar, Corporate Lawyer, Mumbai. said...

In the era of globalisation, multinationalisation and internalisation are the essential strategies........ we should be open to global competition and global cooperation......... need to have global standards with local flavor................ globalisation means having global outlook and attitude.......... mindest need to be changed........

Mr. Uday Nirgudkar commented on my Facebook.

Anonymous said...

One of the best news,that I have read loksatta,

GORDON HORSE said...

Campus che note book,anee,oontaachi shaai,shows we are still on top,
Camel is yet not under the rock,best deal,with respect to all parties.
Hope such deals will be common during the times to come.