Thursday, July 28, 2011

माझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती!

२८ जुलै २०११:  आणखी एक ईमेल आला तो नाव बदलून देत आहे.

"नमसकार सर...

माझे नाव संजय कुमार पाटिल (३०) असुन माझे शिक्षणं डिप्लोमा इन एग्रिक्लचर आणि BSC एग्रिक्लचर (******* ओपन University) पर्यंत झाले आहे. मी नुकतचम आपण लिहीलेले "प्रगतीचा एक्सप्रेस वे" हे पुस्तक वाचलं.  आपण लिहिल्या प्रमाणे मराठी माणसांने उद्दोग करुन मराठी समाजाचे नाव मोठे केले पाहिजे.  मलाही स्वत:चा उद्दोग सुरु करायचा आहे. माझे शिक्षण शेती विषयी असले तरी मला स्वत:चा "Electronic Commponods Manufacturing Company" सुरु करायची आहे.  काय करु?

धन्यवाद - संजय पाटिल"

मला वाटतं संजय सारखे असंख्य मुल अशी असतील त्यांना आपल्या उद्दोगाची नेमकी सुरुवात कुठन करायची हेच कळत नसेल.  गोंधळलेली मानस्कित्ता असेल.  त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला श्री. प्रवीण मेश्रामचा यशाचा प्रवास जरुर वाचावी.  मित्रांनो अशी हजारो उदाहरणं आहेत आणि या पुढे ही होतील.   मला वाटतं स्वत:चा शोध घेण फार गरजेच आहे.   आपण शिक्षण एक घेतो आणि आपल्याल करायच दुसरच असतं.  याच कारण आपण स्वत:शी बोलतच नसतो,  आपण  इतरांशी बोलतो आणि त्यांच्या कडुन आपण काय केल पाहिजे याच उत्तर मागतो.  

मला आयुष्यात काय करायच आहे?  त्या क्षेत्राची पुर्ण माहिती मी मिळवलेली आहे का?  त्या क्षेत्रामधे असणाऱ्या लोकांशी मी संवाद केला आहे का?  आज ईन्टर्नेट वर कुठल्याही विषयाची नुस्ती माहीती  उपलब्ध नसुन माहितीचा महापुर आलेला आहे.  आपल्याला काय करायच आहे याची माहिती सुध्दा जो स्वत;हुन काढू शकत नसेल तर तो आयुष्यात काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा.    भविष्यातल्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर "हो" किंवा "नाही" मधे देता येत नसतात.  आपण फक्ता प्रयत्न करु शकतो, यश अपयश हे आपल्या हातात मुळीत नसतं.  म्हणुन आपण प्रयत्नच करणार नाही का?  

Thursday, July 21, 2011

माझं tweet.....आषाढी एकादशी, पंढरपुर आणि अशोक खाडे!

२१ जुलै २०११:  सोमवार दिनांक ११ जुन २०११ आषाढी एकादशी - माझ्या मोबाईल वर माझे मित्र श्री. अशोक खाडेंचा फोन आला, मी एका महत्वाच्या मिटींग मधे होतो, घाई घाईने रुम बाहेर जात मी फोन घेतला.  "नितीन अरे मी पंढरपुरच्या विठठल मंदिरातुन फोन लावलेला आहे.  सांग तुझ्यासाठी काय मागु?"  "तुझ विठ्ठलाशी सॅटेलाईटवरुन डायरेक्ट कनेक्शन करुन दिलं बघ".  "काय सांगता?" मी म्हटंल.  "अरे आपल्या बायका मुलांसाठी सगळेच मागतात, मी आज म्हटंल मित्रांसाठी मागुया म्हणुन तुला फोन लावला."  क्षणभर माझा विश्वासच बसेना.   दोन दिवस मी टिव्हीवरुन पंढरपुरला लोटलेला लाखो लोकांचा माहापूर बघत होतो, आणि मनात म्हटंल आपल्याला पंढरपुरला आषाढीला जायला मिळेल अस वाटतं नाही.    फोन वरुन मी म्हटंल "अशोक तुम्ही खरचं ग्रेट आहात."  "मी फोन वरुनच सगळ्यात पहिले तुमचे आणि मग विठठलाचे पाय धरतो."  "काय मागू?  तुमच्या सारखे मित्र आहेत मला काहीच मागायच नाही.  आज आषाढीचा उपवास फळला अस मी समजतो."   मित्रांनो असे आहेत आमचे श्री. अशोक खाडे.   मला त्यांचा छोटाच फोटो मिळाला तो दिलेला आहे,  पण हा माणुस मनाचा फारच मोठा आहे!  

Friday, July 15, 2011

माझं tweet.....गुरुपौर्णिमा - ऒम अनुभवाय नम:


१५ जुलै २०११:  आज गुरुपौर्णिमा - गेल्या वर्षी मी लिहिलेलं माझ tweet  पुन्हा ब्लॉग वर देत आहे:  आज हे tweet लिहीताना मुंबईवर परवा झालेले बॉम्ब स्फोटांच्या निमित्ताने होत असलेली चर्चा समोर आहे.  मला आठवत १९९३चे बॉम्ब स्फोट - मी माझ्या ऑफिच्या गच्चीवरून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधे झालेला बॉम्ब स्फोट पाहिला - रस्त्यावरून रक्तबंबाळ लोक सैरावैरा धावताना पाहिले.  सगळीकडे हाहाकार! अफरातफरी!! आणि एक जबरदस्त भीती सगळ्यांच्या मनात होती.  आज त्याची आठवण होण्याच कारण आपण जेंव्हा म्हणतो की अनुभव हाच सगळ्यात मोठा गुरु आहे, तर १९९३च्या बॉम्ब स्फोटांपासुन आपण काय शिकलो?  अमेरिकेच्या ९/११ हल्या नंतर संपुर्ण अमेरिका बदललेली दिसते.   त्यांच्या सरकारने तेथिल नागरिकांना विश्वासात घेऊन तेथे असणारी संपुर्ण सुरक्षा यंत्रणा बदलवून टाकली, कायदे बदलले आणि जगात एक आदर्श निर्माण केला.  १९९३ नंतर मुंबई हे बॉम्ब स्फोटांसाठी सॉफ्ट टारगेट ठरलेलं आहे आणि असे हल्ले होतच राहणार हे गृहीत धरुन आपण पुढे गेल पाहिजे.  कुणाला दोष देण्याचा मी प्रयत्न करणार नाही कारण नुसत एकमेकांवर दोषारोप किंवा राजकीय चिखलफेक करुन हा प्रश्न सुटणार नाही. 

मला अस वाटत आपण अनुभवातून शिकतच असतो, पण जो पर्यंत आपल्या राज्यकर्त्यांना आणि सरकार दरबारी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देशा बद्दल, आपल्या नागरिकां बद्दल आपुलकी वाटत नसेल, आस्था वाटत नसेल तर त्यांच्या कडुन काही अपेक्षा करण पुर्णपणे चुकीच ठरेल.  थोडक्यात जो पर्यंत हा देश म्हणजे माझं स्वत:च "घर" आहे आणि मरणारा प्रत्येक नागरिक हा माझा कुणीतरी आहे हे त्यांना वाटणार नाही तो पर्यंत आपण अनुभवातून काहीच शिकणार नाही.   आज आपल्या राज्यकर्त्यांविषयी किंवा मुंबई पोलिसांबद्दल बोलताना आपल्याला एक कमालीची सर्वत्र उदासिनता, नाराजी आणि खरं म्हणजे "राग" दिसतो - ह्याची त्यांनी दखल घेतलीच पाहिजे.  एक  जबरदस्त   "पोलिटिकल विल" असल्याशिवाय अशा संकटांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही.  जास्त काय लिहू.   आज महाराष्ट्रात "I will make the difference" असा म्हणणारा एकही नेता नाही?  तुर्त इतकचं.  

Sunday, July 10, 2011

माझं Tweet.....यशाचा IRB मार्ग.

१० जुलै २०११:  मला काल लातुरच्या सचिन पाटील (बदललेल नाव) नावाच्या एका तरूणाचा ईमेल आला तो जसाच्या तसाच खाली देत आहे.   तो आधी कृपा करून लक्षपुर्वक वाचा....

Email from Sachin Patil to Shri. Nitin Potdar

Name         : Sachin Patil (name changed)
Education   : Now Studying in Final Year Engg. in college of Engg. Pune (COEP) Branch
Branch       : Electronics & Telecommunication
Location     : XXX, now at Pune

Sir, My dream is my life is to become very big & good businessman from my child-hood.  And I want to start the business in electronics.  But Sir, I am very confused about starting my business.  The questions arises in my minds are HOW, WHERE should start my business.

Sachin Patil.
XXX,

इंजिनीयरिंगच्या फायनयल वर्षात असलेल्या या मुलाला कस आणि काय उत्तर देऊ ह्या विचारात असताना, आज लोकसत्तेच्या मुंबई वृतान्तात  ‘आय. आर. बी.’ या कंपनीच्या दत्तात्रय म्हैसकरांच्या यशाच्या प्रवासाच वर्णन वाचलं ते खाली देत आहे.  महत्वाचे मुद्दे Underline केले आहे.   सचिन आणि त्याच्या सारख्या असंख्य मुलांचे असेच मुलभुत प्रश्न असणार, त्यांच्या देखिल मनात रोज चलबिचल होत असणार.  आयुष्याला एक दिशा देण्याची धडपड आणि जिद्द .....

श्री. म्हैसकरांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअर  ही पदवी घेउन जवळजवळ १७ वर्षे नोकरी केली, परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी १९७७ मध्ये ‘आय. आर. बी.’ची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीत मोठ नाव कमावलं.

ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याचा मूलभूत अभ्यास, व्यवसायाशी प्रामाणिक वृत्ती, पारदर्शक व्यवहार, येणाऱ्या संधीचा अचूक फायदा घेणे, वेळेचे अचूक नियोजन या आणि अशा मूलभूत तत्त्वांच्या पायावर ‘आय. आर. बी.’च्या वटवृक्षाचा आज महाविस्तार झाला आहे......

सचिन सारख्या असंख्य मित्रांना एवढच सांगेन यशाकडे जाणारा रस्ता हा नेहमीच Under Construction असतो..... त्यात येणाऱ्या अपयशाच्या प्रत्येक खड्ड्यांना न घाबरता न डगमगता, मेहनतीच्या दगडांनी बुजवुन पुढे जाव लागणार.......  All the best!

Tuesday, July 5, 2011

माझं Tweet.....शोध करिअरचा! नव्हे स्वत:चा.

५ जुलै २०११:  दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले की आपल्याला जो संवाद घरोघरी ऎकायला मिळतो तो असा......"बाबा मला बारावीला कितीही मार्क मिळाले तरी मला मार्केटिंग मधे करिअर करायच आहे" मंजू "तुला जे काही करायच आहे ते बी.कॉम झाल्यावर कर.  मंजू चे बाबा.  "बी.कॉम झालीस की निदान एखाद्या बॅंकेत किंवा ऑफिसात चांगली नोकरी हमखास मिळेल.  एकदा नोकरी लागलीकी मग तुला काय वाटेल तो कोर्स कर." दुसऱ्या घरी: "संदेश ९७ टक्के मिळाले तर मेडिकल नाहीतर सरळ इंजिनियरिंगला प्रवेश मिळतो का बघं"; "हेमंता बघ सध्या आयटीच जमाना आहे... इंजिनियरिंग करायच तर आयटी मधेच नाही तर सरळ बीएससी कर, पुढे बघु काय करायच तर".   "अगं अंजु ही जाहिरात बघितली का?   १००% नोकरीची हमी आहे!  जऊन जरा चौकशी तरी करशील का?"  "आमच्या वेळेस आम्ही सगळ्यात पहिले बी.कॉम किंवा सरळ बी.ऎची डिगरी हातात पाडुन मग पुढचा विचार करायचो.  हल्लीच मुलांना पुढे इतके विविध मार्ग उपलब्ध असतात की कुठे जायच हेच नेमकं कुणालाच समजत नाही."  असे अनेक सल्ले घरोघरी ऎकायला मिळतात.  

"करिअर" म्हणजे काय? करिअरचा शोध घेणं म्हणजे काय? मुलांनी नेमक काय करावं?  काल दुर्दर्शनच्या मराठी बातम्यामधे मला माझे विचार मांडायला बोलावल होतं त्याची व्हिडिओ क्लिप देत आहे....... बघा पटतं का?