Thursday, July 28, 2011

माझं tweet.....दुरुस्ती ते निमिर्ती!

२८ जुलै २०११:  आणखी एक ईमेल आला तो नाव बदलून देत आहे.

"नमसकार सर...

माझे नाव संजय कुमार पाटिल (३०) असुन माझे शिक्षणं डिप्लोमा इन एग्रिक्लचर आणि BSC एग्रिक्लचर (******* ओपन University) पर्यंत झाले आहे. मी नुकतचम आपण लिहीलेले "प्रगतीचा एक्सप्रेस वे" हे पुस्तक वाचलं.  आपण लिहिल्या प्रमाणे मराठी माणसांने उद्दोग करुन मराठी समाजाचे नाव मोठे केले पाहिजे.  मलाही स्वत:चा उद्दोग सुरु करायचा आहे. माझे शिक्षण शेती विषयी असले तरी मला स्वत:चा "Electronic Commponods Manufacturing Company" सुरु करायची आहे.  काय करु?

धन्यवाद - संजय पाटिल"

मला वाटतं संजय सारखे असंख्य मुल अशी असतील त्यांना आपल्या उद्दोगाची नेमकी सुरुवात कुठन करायची हेच कळत नसेल.  गोंधळलेली मानस्कित्ता असेल.  त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला श्री. प्रवीण मेश्रामचा यशाचा प्रवास जरुर वाचावी.  मित्रांनो अशी हजारो उदाहरणं आहेत आणि या पुढे ही होतील.   मला वाटतं स्वत:चा शोध घेण फार गरजेच आहे.   आपण शिक्षण एक घेतो आणि आपल्याल करायच दुसरच असतं.  याच कारण आपण स्वत:शी बोलतच नसतो,  आपण  इतरांशी बोलतो आणि त्यांच्या कडुन आपण काय केल पाहिजे याच उत्तर मागतो.  

मला आयुष्यात काय करायच आहे?  त्या क्षेत्राची पुर्ण माहिती मी मिळवलेली आहे का?  त्या क्षेत्रामधे असणाऱ्या लोकांशी मी संवाद केला आहे का?  आज ईन्टर्नेट वर कुठल्याही विषयाची नुस्ती माहीती  उपलब्ध नसुन माहितीचा महापुर आलेला आहे.  आपल्याला काय करायच आहे याची माहिती सुध्दा जो स्वत;हुन काढू शकत नसेल तर तो आयुष्यात काहीही करु शकणार नाही हे लक्षात ठेवा.    भविष्यातल्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर "हो" किंवा "नाही" मधे देता येत नसतात.  आपण फक्ता प्रयत्न करु शकतो, यश अपयश हे आपल्या हातात मुळीत नसतं.  म्हणुन आपण प्रयत्नच करणार नाही का?  
बऱ्याच वेळा आपण नुस्ताच विचार करत नाही तर खुपच विचार करतो, आणि निर्णय घेतेवेळी अविचार करतो.  म्हणुन स्वत:ला ओळखा, माहिती मिळवा, चर्चा करा आणि लागा कामाला.    काहीही न करण्या पेक्षा काही तरी करुन बघा.  हो कदाचित यश मिळेल न मिळेल; प्रत्येक वेळी यश मिळालच पाहिजे असा नियम आहे का?  एखादा "राईट" टर्न चुकला तर "यु" टर्न घ्या पण पुढे चालत रहा.  थांबला तो संपला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

दुरुस्ती ते निमिर्ती!

वडिलांच्या इलेक्ट्रिकल रिपेअरिंग दुकानापासून कामाला सुरुवात करणारे प्रवीण मेश्राम आता २० कोटींचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत! पण इथपर्यंत येण्यासाठी त्यांना अनेक टक्केटोणपे सोसावे लागले.

- नागपूरमधील अमरावती रोड येथे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनकडून अंतिम मंजुरी मिळण्यासाठी प्रवीण मेश्राम गेली पाच वषेर् वाट बघत आहेत. प्रवीण यांच्या आईला अनुसूचित जातीसाठीच्या कोट्यातून कंपनीकडून पेट्रोल पंपाचे वाटप झाले आहे. प्रवीण यांनी जमीन घेतली, सर्व औपचारिक बाबी पूर्ण केल्या असूनही त्यांना अद्याप पेट्रोल पंप ताब्यात मिळालेला नाही. वरच्या जातीतील अन्य लोकांना मात्र केव्हाच पंप मिळाले. प्रवीण यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. पण ते अपयशी ठरल्याने कुटुंब चालवण्यासाठी या पेट्रोल पंपावर त्यांची भिस्त होती. या पाच वर्षांच्या कालावधीत प्रवीण यांनी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरनिमिर्तीचा २० कोटींचा व्यवसाय उभारला. आता त्यांना पेट्रोल पंपाच्या आधाराची अजिबात आवश्यकता नाही!

प्रवीण यांचा जन्म नागपूरमधील कनिष्ठ मध्यमवर्गातला. स्वत:चा व्यवसाय असावा, हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. सन १९९८ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केल्यावर त्यांनी वडिलांच्या दुकानात कामाला सुरुवात केली आणि इलेक्ट्रिकल साधनांची दुरुस्ती व ती बसवणे शिकून घेतले. व्यवसायाच्या दृष्टीने संपर्क वाढवला. वडिलांचे ग्राहक असलेल्या 'एमएसईबी'मध्ये त्यांनी पंखे व दिवे दुरुस्तीचे आणि काही प्रमाणात जनरेटर बसवण्याचे काम मिळवले. यातून त्यांना १०० ते हजार रुपये मिळाले. त्यांनी 'एमएसईबी'कडे मोठे काम मागितले, पण ते नाकारण्यात आले.

एकदा तर त्यांनी सलग १८ तास काम केले. प्रवीण म्हणतात, 'मी तसे केले नसते तर त्या दिवशी आमच्या घरात अन्न शिजले नसते. त्यामुळे त्यांना भावासोबत आणखी कामे शोधायला सुरुवात केली. २००० ते २००७ या वर्षांत अनेकदा अपयश पत्करले. प्रकाशनांसाठी जाहिराती नोंदवणे, जवळपासच्या कारखान्यांत प्लॅस्टिकचे बॉक्स पोचवणे, ट्रेडिंग यामध्ये नशीब आजमावले. शेवटी प्रवीण यांनी स्थानिक कंपनीत इलेक्ट्रिशिअन म्हणून दोन हजारांची नोकरी स्वीकारली. तरीही स्वत:च्या व्यवसायाचा विचार डोक्यातून जाईना. सहा महिने त्यांनी ट्रान्सफॉर्मर कंपनीत काम केले आणि त्याची निमिर्ती शिकून घेतली. वडिलांकडून दोन लाख आणि मित्राकडून एक लाख रुपये उसने घेऊन त्यांनी लहान ट्रान्सफॉर्मर निमिर्ती युनिट सुरू केले. त्यांच्या 'भारत इलेक्ट्रिकल्स'ने बनवलेला पहिला ट्रान्सफॉर्मर एमएसईबीने नाकारला. प्रवीण सांगतात, 'याचा मला उपयोग झाला. दोन महिन्यांनी मला मंजुरी मिळाली. एमएसईबीला दिलेला पहिला ट्रान्सफॉर्मर ५ किलोवॉटचा होता. यामुळे मला खूप आनंद झाला. माझ्या कुुटंुबाला मी स्थिरता, सुरक्षितता देऊ शकेन, असे वाटले. वर्षभरात कंपनीने एक कोटीची उलाढाल केली. सुरुवातीला लोकांनी माझा गंभीरपणे विचार केला नाही. मला पुन्हा रिपेअरिंगचेच काम करावे लागले, अशी टीका केली. कंपनीची पत निर्माण करण्यासाठी अनेक वषेर् लागली.'

ट्रान्सफॉर्मरची क्षमता आणि संख्या या बाबतीत एमएसईबीकडून येत असलेल्या ऑर्डर हळूहळू वाढल्या. २००९ साली त्यांनी एमएसईबीसाठी १० हजार कोटींचे २००-६५० किलोवॉट ट्रान्सफॉर्मर बनवले.

आज एका एकराच्या जागेत प्रवीण यांचा कारखाना उभा आहे. २५-१००० किलोवॉट क्षमतेचे तीन हजार ट्रान्सफॉर्मर बनवण्याची कंपनीची क्षमता आहे. यापैकी ८० टक्के ट्रान्सफॉर्मर एमएसईबीला पुरवले जातात, तर उरलेले छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाला. त्यांच्याकडे आत्ता २५ कोटी रुपयांची ऑर्डर आहे.

आई-वडिलांना परदेशात फिरवून आणणे आणि उलाढालीचा १०० कोटींचा टप्पा पार करणे, अशी उद्दिष्ट्ये त्यांनी सध्या समोर ठेवली आहेत. चार एकरच्या जागेत ते २ ते ५ हजाक किलोवॉट क्षमतेचे मोठे ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत. यामुळे दोन वर्षांत त्यांना ५० कोटींपर्यंत महसूल मिळू शकेल आणि नफाही चांगला होईल. आणखी १०० रोजगार निर्माण होऊ शकतील. या नोकऱ्या मागासवगीर्य मंडळींना द्यायची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचीही त्यांची तयारी आहे. या प्रकल्पासाठी भागीदारी करण्यासाठी प्रवीण यांची एका चिनी कंपनीशी बोलणी सुरू आहेत.

1 comment:

GORDON'S HORSE said...

All the best Mr. Meshram,
Keep flying high all times.