Sunday, August 28, 2011

माझं Tweet.....अण्णां तुझे सलाम!

२८ ऑगस्ट २०११:  मित्रांनो गेली १२ दिवस अण्णांच उपोषण दिल्लीच्या रामलील मैदानावर सुरु होतं.  एक ७४ वर्षीय साधा सच्चा माणुस देशाला एक हाक देतो; करोडो लोकांचा देश १२ दिवस एकही दगड हातात न घेता, कुठलीही जाळपोळ, मोडतोड, बंद किंवा हिंसा न करता शांतपणे शिस्तित रस्यावर एकत्र येतो ही केवढी मोठी किमया आहे!!  सगळ्या राजकीय नेत्यांना चक्रावऊन आणि बुध्दिजीवी लोकांना गप्प करणारे असं हे आंदोलन अण्णांनी उभ केल.  त्यांच आणि त्यांच्या संपुर्ण टीम अण्णांच त्रिवार अभिनंदन करुया.  गेली १२ दिवस अण्णां विषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, लोकांविषयी आणि एकुणच या संपुर्ण आंदोलना विषयी जस लोकांनी भरभरुन समर्थन केलं प्रचार केला तसचं काही लोकांनी अपप्रचार सुध्दा केला!   शेवटी विजय हा सत्याचाच होतो.  अण्णा आज म्हणाले तस हा अर्धा विजय आहे, अजुन पुर्ण लढाई बाकी आहे.   काल  संसदेत आपले खासदार विचारत होते की एक कायदा करुन देशातुन भ्रष्टाचार कसा निघणार?  म्हणजे एकुणच अशा आंदोलनातुन काही फारसं हाताला लागणार नाही.   लोक आज आहेत उद्या विसरतील.... कदाचित लोक हे आंदोलन विसरतील पण गेली ४२ वर्ष कुठलेही सरकार भ्रष्टाचारा विरुध्द एक सशक्त कायदा करु शकला नाही हे मात्र लोक नक्कीच विसरणार नाही.   आणी म्हणुन येणाऱ्या निवडणुकामधे त्याच उत्तर लोक शोधतील....   एखादी समाज रचना बदलायला वेळ लागतो, म्हणून तसा प्रयत्नच कुणी करु नये का?  देशातली सामान्य जनता ही सदैव झोपलेली असते, अस म्हणणारे महाभाग या देशात कमी नाहीत!  त्यांना एक सणसणीत उत्तर अण्णांच्या आंदोलनामुळे मिळलं आहे अस मी समजतो. 

माझे मित्र श्री. उदय निरगुडकरांनी त्यांच्या फेसबुक वरुन देशातील संसदेत राजकीय नेत्यांवर छान भाष्य केल होतं ते खाली देत आहे; त्यावर मला जे सुचल ते सुध्दा खाली देत आहे...

Uday Nirgurdkar .....if no will.............. then no bill...........result Nil........ so simple.......... if there is bill...but no will....... result nil ....... so simple..... think about it.............


Nitin Potdar.....if no will for the bill, then all against the bill will have to foot the bill in the coming elections!.

गेली १२ दिवस आंदोलन जस जस पुढे जात होत, त्यावर माझ्या फेसबुक वरून मी मला काय वाटलं ते लिहीत होतो ते आज या ब्लॉगवरुन देत आहे.

या आंदोलनात अण्णा राजघाटवर  पोलिसांसोबत धावले.  आपण किती फिट आहेत हे त्यांनी सिध्द केलं तो फोटो देत आहे.   देशाला फिट ठेवण्यासाठी अण्णा तुम्हला फिट रहावच लागेलं!  भारतमाता की जय! वंदे मातरम!! इकलाब जिंदाबाद!!!

Monday, August 15, 2011

माझं Tweet.....India@65

१५ ऑगस्ट २०११:   मित्रांनो देशाच्या केद्रिंय सरकारने अण्णां हजारेंना दिल्लीत भ्रष्टाचारा विरुध्द ऊपोषणासाठी फक्त तीन दिवसांची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे.   देश स्वतंत्र होऊन आज ६५ वर्ष झाली!  भ्रष्टाचार वर्षाच्या ३६५ दिवस आणि त्याच्या विरुध्द शांतपणे उपोषण करणाऱ्या ७४ वर्षीय अण्णा हजारेंना उपोषणासाठी फक्त तीन दिवस!   केंद्र सरकारचे अर्धाडझन मंत्री २ जी, आदर्श आणि CWG इतर स्कॅम्स मधे तिहार जेल मधे बंद आहेत.

सरकार काही करणार नाही आणि लोकांनी काही करायच नाही.  आज खुद्द गांघीजी जिवंत असते तर त्यांना सुध्दा या सरकार ने सत्याग्रह करायला परवानगी दिली नसती अशी परिस्थिती आहे.  

गेली ६५ वर्षात विकास झाला पण कोणाचा?  गरीबी हटाव ने गरिबी गेली का?  हो गरीबी गेली ती मंत्र्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या मित्रांची.  आधुनिक भारत निर्माण झाला पण तो देशातील १% लोकांसाठी.  उच्च शिक्षणं देशात मिळतं ते पैसेवाल्यांना पण तरी देशातील ४० टक्के लोक अशिक्षित निरक्षर.   अर्धी जनता उपाशी!   ६५ वर्षात आपण देशाला अजुनही साधं पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही.  कसल्या प्रगतीची आपण भाषा करीत आहोत.   संपुर्ण देश आज भ्रष्टाचार नावाच्या कॅन्सर ने गिळुन टाकलेला आहे,  त्याचा ठोस इलाज झाला नाही तर देशाच काही खरं नाही हे आपण समजुन घेतल पाहिजे.  भ्रष्टाचारा विरुध्द बोलण म्हणजे कॉंग्रेस विरुध्द प्रचार हा आरोप खोटा आहे.  भ्रष्टाचार आज वर पासुन खाल पर्यंत पसरलेला आहे, तो सर्व पक्षीय असा आहे.  म्हणुन अंण्णाच्या पाठीशी संपुर्ण देशाने ठामपणे उभं राहणं गरजेच आहे.  

अण्णांनाच्या जनलोकपाल कायद्याने काय होणार असा उलटा प्रश्न केला जातोय?  कसा जाणार? भ्रष्टाचार आज शिष्टाचार झालेला आहे.  ज्यांच्या रक्तात भ्रष्टाचार आहे ते असच बोलणार.  निदान अण्णांनी देशात एक मोठ्या प्रमाणात जनजागृती निक्कीच निर्माण केलेली आहे, त्याला मनापासुन पाठींबा दिलाच पाहिजे.   माहितीच्या अधिकारामुळे पुष्कळ बदल झालेला आहे, आता कठोर लोकपाल कायदा झालाच पाहिजे.  ७४ वर्षाचे अण्णां ६५ वर्षाच्या देशासाठी निर्णायक लढाई देणयस सज्ज आहे.   आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलचं पाहिजे.  जय हिंद!

टीप:  मित्रांनो एकच विनंती हा ब्लॉग फक्त आपल्यात ठेवा जगा समोर आपली झाली तेवढी नलस्ती खुप झाली.  जास्त काय लिहु. 

Wednesday, August 3, 2011

माझं Tweet.....माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल" - कलपना सरोज

३ ऒग्स्ट २०११: गेले तिन ब्लॉग मधुन मी काही यश्स्वी पुरुष उद्दोजकांचे परिचय करुन दिले.  माझ्या माहितीत असंख्य महिला उद्दोजक स्वत:च्या व्यवसायात कुटुंब सांभाळुन चांगल काम करीत आहे त्यांची दखल घेणं गरजेच आहे.  खरं तर महिला फारच focussed आणि determined असतात, कुठल्याही मेहनतीला त्या घाबरत नाही.   काही महिन्यांपुर्वी सौ. मिनलताई मोहाडिकारांच्या महिला उद्दोगिनी या कार्यक्रमाला गेलो होतो.  तिथं आलेल्या महिला उद्दोजकांचे यश बघुन थक्क व्हायला झालं.  कधीतरी मिनलताईंच्या अफाट कार्याबद्दल माझ्या ब्लॉग वरून नक्कीच लिहीन.   मिनलताईंचा उल्लेख आलाच आहे म्हणुन सांगतो She is an institute in herself!   आज महाराष्ट्र टाईम्स मधे कलपना सरोज या महिलेच्या यशाची गाथा दिलेली आहे.  ती खाली देत आहे.

लेखात कलपना सरोज म्हणतात की - व्यवसाय म्हटला की मित्र आणि शत्रू आलेच ! 'माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे.'   प्रगतीचा एक्सप्रे वे! या माझ्या पुस्तकात सुध्दा मी हेच सुत्र मांडलेल आहे - आपण आपली बॅक बॅलन्स बघतो, दागिने मोजतो, बॅलंन्सशीट तपासतो पण आपल्या नेटवर्कच "नेटवर्थ" कधीच तपासत नाही, कारण माणसांची आपण किंमत करत नाही.  तरी आपल्या प्रत्येक कामासाठी आपण फक्त रोज माणसं शोधत असतो.

कलपना सरोजची जास्त माहिती मिळवण्यासाठी मी गुगल सर्च केला तर एका लेखात त्यांचा उल्लेख "Kalpana Saroj - India's original slumdog billionaire" असा आढळला.   बऱ्यात इंग्रजी वृतपत्रांनी त्यांचा गौरव केलेला आहे. प्लानिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन मॉन्टेकसिंग अल्हुवालियांनी स्वत: कल्पना सरोजची माहिती काढुन त्यांच कौतुक केलं त्या क्षणांचा फोटो मिळाला तो वर देत आहे.