Wednesday, August 3, 2011

माझं Tweet.....माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल" - कलपना सरोज

३ ऒग्स्ट २०११: गेले तिन ब्लॉग मधुन मी काही यश्स्वी पुरुष उद्दोजकांचे परिचय करुन दिले.  माझ्या माहितीत असंख्य महिला उद्दोजक स्वत:च्या व्यवसायात कुटुंब सांभाळुन चांगल काम करीत आहे त्यांची दखल घेणं गरजेच आहे.  खरं तर महिला फारच focussed आणि determined असतात, कुठल्याही मेहनतीला त्या घाबरत नाही.   काही महिन्यांपुर्वी सौ. मिनलताई मोहाडिकारांच्या महिला उद्दोगिनी या कार्यक्रमाला गेलो होतो.  तिथं आलेल्या महिला उद्दोजकांचे यश बघुन थक्क व्हायला झालं.  कधीतरी मिनलताईंच्या अफाट कार्याबद्दल माझ्या ब्लॉग वरून नक्कीच लिहीन.   मिनलताईंचा उल्लेख आलाच आहे म्हणुन सांगतो She is an institute in herself!   आज महाराष्ट्र टाईम्स मधे कलपना सरोज या महिलेच्या यशाची गाथा दिलेली आहे.  ती खाली देत आहे.

लेखात कलपना सरोज म्हणतात की - व्यवसाय म्हटला की मित्र आणि शत्रू आलेच ! 'माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे.'   प्रगतीचा एक्सप्रे वे! या माझ्या पुस्तकात सुध्दा मी हेच सुत्र मांडलेल आहे - आपण आपली बॅक बॅलन्स बघतो, दागिने मोजतो, बॅलंन्सशीट तपासतो पण आपल्या नेटवर्कच "नेटवर्थ" कधीच तपासत नाही, कारण माणसांची आपण किंमत करत नाही.  तरी आपल्या प्रत्येक कामासाठी आपण फक्त रोज माणसं शोधत असतो.

कलपना सरोजची जास्त माहिती मिळवण्यासाठी मी गुगल सर्च केला तर एका लेखात त्यांचा उल्लेख "Kalpana Saroj - India's original slumdog billionaire" असा आढळला.   बऱ्यात इंग्रजी वृतपत्रांनी त्यांचा गौरव केलेला आहे. प्लानिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन मॉन्टेकसिंग अल्हुवालियांनी स्वत: कल्पना सरोजची माहिती काढुन त्यांच कौतुक केलं त्या क्षणांचा फोटो मिळाला तो वर देत आहे.
महाराष्ट्रातल्या मुर्तिझापुर या एका छोटश्या गावातुन आलेल्या कल्पना सरोज यांचे पुर्व आयुष्य बघितलं तर अंगावर काटा येतो. तरी परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत त्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आज त्या अनेक व्यवसायांचे अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या पुढिल वाटचालीला शुभेच्छा देऊ या!....
****** ****** ****** ****** ****** ****** ******

"माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे"... कलपना सरोज.

चांगल्या उद्दोजकांची माअसंख्य अडचणींना तोंड देत कल्पना सरोज यांनी एकेकाळच्या ' आजारी ' कंपनीला निरोगी करण्यासाठी धाडसी पावले उचलली आहेत . त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे कंपनी पुन्हा उभारी घेत आहे.

नवीनभाई कमानी यांच्या व्यवसायावर आरिष्ट ओढवले . एकेकाळी त्यांचा उद्योग प्रचंड नावाजलेला होता. थोरामोठ्यांचा सहवास लाभलेला होता . कामगारांसोबत दीर्घ संघर्ष झाल्यावर त्यांनी १९८८ साली कमानी ट्युब्स लिमिटेड ( केटीएल) ही कंपनी कामगारांच्या हवाली केली . कामगारांची मालकी आणि व्यवस्थापन यातला त्या वेळचा धाडसी, चौकटीबाहेरचा निर्णय मानला गेला.

तो सुप्रीम कोर्टाच्या सूचनेवर आधारित होता . नॉन - फेरस मेटल ट्युब व पाइप बनवणारी ही कंपनी १९९५ साली आजारी कंपनी म्हणून घोषित झाली . सध्या केटीएलचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या कल्पना सरोज यांनी या आजारी कंपनीला औषधोपचार करून पुन्हा निरोगी केले !

कंपनीवर ११६ कोटींचे कर्ज होते . ५०० हून अधिक कामगारांचे पगार व प्रॉव्हिडंट फंड थकलेले होते आणि १७० हून अधिक कोर्टाचे खटले सुरू होते . ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी कुणी धजावत नव्हते . अशा वेळी सरोज पुढे सरसावल्या . कंपनीला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी मांडलेली योजना सन २००६ मध्ये मंजूर झाली . त्यांनी सगळे कर्ज मिटवून टाकले . कामगारांची ८.५ कोटीहून अधिक थकित रक्कम चुकती करण्यात आली .

कल्पना सरोज अँड असोसिएट्सच्या ( केएसए ) कल्पना सरोज महाराष्ट्राच्या आड भागातल्या मुर्तिझापुरा या लहानशा गावातल्या आहेत आज त्या अनेक व्यवसायांचे अध्यक्षपद भूषवत आहेत . त्यांचा बऱ्यापैकी हिस्सा असलेला अहमदनगरमधील साईकृपा साखर कारखाना म्हणजे साखरेचे मोठे कॉम्प्लेक्स म्हणून उदयास येत आहे.

कारखान्याची क्षमता ७५०० टीसीडीपर्यंत ( दर दिवशी गाळला जाणारा ऊस टनामध्ये ) वाढवण्यात आली आहे . ३५ मेगावॉट क्षमतेचा को - जनरेशन ऊर्जाप्रकल्पही साकारला जात आहे . अलिकडेच कंपनीने स्टील उत्पादन आणि खाणकामात उडी घेतली . दररोज १०० टन स्टीलनिर्मिती करणारा प्रकल्प १० कोटी रुपये गुंतवून वाडा येथे उभारला आहे . महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उद्गीर येथे १२३० एकरात बॉक्साइट खाणींचा प्रकल्प उभारला जात आहे . कॉपर ट्युबना असलेली मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी सरोज यांनी कमानी ब्रँड कुवेतमध्ये अल कमानी यामार्फत आणि दुबईमध्ये कल्पना सरोज एलएलसी यामार्फत आखाती देशांत पुन्हा ठसठशीत केला आहे !

सरोज यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते . सरोज यांचा भूतकाळ अतिशय त्रासाचा आणि खडतर आहे. बाराव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. तिथून त्या मुंबईतील झोपडपट्टीत राहायला आल्या . पण लग्न अल्पायुषी ठरल्याने त्यांना गावी परतावे लागले . त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला . त्यातून त्या बचावल्या . स्वत : चे नशीब घडवण्यासाठी त्या मुंबईला निघून आल्या . होजिअरी युनिटमध्ये त्यांनी दर दिवशी दोन रुपये इतक्या मजुरीवर काम केले . पुन्हा विवाह केला . पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्टील अलमिराह फॅब्रिकेशन व्यवसायाची धुरा हाती घेतली . बांधकाम व्यवसायात प्रवेश केला .

व्यवसायाची घोडदौड सुरू असताना सरोज सामाजिक कार्यातही सक्रिय झाल्या . त्यामुळे त्यांचा विविध प्रकारच्या राजकीय नेत्यांशी संपर्क आला. यामुळे सामाजिक क्षेत्राच्या शिड्या त्या पटापट चढल्या . त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली . पण व्यवसाय म्हटला की मित्र आणि शत्रू आलेच ! सरोज म्हणतात , 'माणसे हेच माझे सर्वात मोठे भांडवल राहिले आहे .'

कंपनीला पुन्हा पूर्वपदावर आणणे आव्हानात्मक आणि कठीण होते . त्यासाठी सरोज यांना जुन्या कमानी एम्प्लॉईज युनियनशी ( केईयू ) सामना करायला लागला. कामगार संघटनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली . हा टप्पाही पार होईल, अशी आशा सरोज यांना आहे . ' केटीएल ' ने डिसेंबर २०१० मध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात केली. विक्रीचे आकडे वाढत आहेत. ' केटीएल ' च्या मुंबईतील प्रकल्पात नवे गॅस फर्नेस बसवले आहेत. कंपनी काही नव्या गोष्टी सुरू केल्या आहेत. हळूहळू कंपनी पुन्हा सक्षम होते आहे !

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दिनांक ३ ऒगस्ट २०११.

3 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

छान माहिती.
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://www.prashantredkarsobat.blogspot.com/

Anonymous said...

BRAVO ZULU.
ATB 100 RED ALWAYS,
FOR SAROJ.

Hobasrao said...

I had read about her earlier. She comes from a small village in Murtizapur, Akola District. She being successful in such "man dominated" arena is really noteworthy.
She is a very good example of - If we are determined, we can be successful in any business.
All the Best to her and all other new startups by Marathi people!