Sunday, August 28, 2011

माझं Tweet.....अण्णां तुझे सलाम!

२८ ऑगस्ट २०११:  मित्रांनो गेली १२ दिवस अण्णांच उपोषण दिल्लीच्या रामलील मैदानावर सुरु होतं.  एक ७४ वर्षीय साधा सच्चा माणुस देशाला एक हाक देतो; करोडो लोकांचा देश १२ दिवस एकही दगड हातात न घेता, कुठलीही जाळपोळ, मोडतोड, बंद किंवा हिंसा न करता शांतपणे शिस्तित रस्यावर एकत्र येतो ही केवढी मोठी किमया आहे!!  सगळ्या राजकीय नेत्यांना चक्रावऊन आणि बुध्दिजीवी लोकांना गप्प करणारे असं हे आंदोलन अण्णांनी उभ केल.  त्यांच आणि त्यांच्या संपुर्ण टीम अण्णांच त्रिवार अभिनंदन करुया.  गेली १२ दिवस अण्णां विषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, लोकांविषयी आणि एकुणच या संपुर्ण आंदोलना विषयी जस लोकांनी भरभरुन समर्थन केलं प्रचार केला तसचं काही लोकांनी अपप्रचार सुध्दा केला!   शेवटी विजय हा सत्याचाच होतो.  अण्णा आज म्हणाले तस हा अर्धा विजय आहे, अजुन पुर्ण लढाई बाकी आहे.   काल  संसदेत आपले खासदार विचारत होते की एक कायदा करुन देशातुन भ्रष्टाचार कसा निघणार?  म्हणजे एकुणच अशा आंदोलनातुन काही फारसं हाताला लागणार नाही.   लोक आज आहेत उद्या विसरतील.... कदाचित लोक हे आंदोलन विसरतील पण गेली ४२ वर्ष कुठलेही सरकार भ्रष्टाचारा विरुध्द एक सशक्त कायदा करु शकला नाही हे मात्र लोक नक्कीच विसरणार नाही.   आणी म्हणुन येणाऱ्या निवडणुकामधे त्याच उत्तर लोक शोधतील....   एखादी समाज रचना बदलायला वेळ लागतो, म्हणून तसा प्रयत्नच कुणी करु नये का?  देशातली सामान्य जनता ही सदैव झोपलेली असते, अस म्हणणारे महाभाग या देशात कमी नाहीत!  त्यांना एक सणसणीत उत्तर अण्णांच्या आंदोलनामुळे मिळलं आहे अस मी समजतो. 

माझे मित्र श्री. उदय निरगुडकरांनी त्यांच्या फेसबुक वरुन देशातील संसदेत राजकीय नेत्यांवर छान भाष्य केल होतं ते खाली देत आहे; त्यावर मला जे सुचल ते सुध्दा खाली देत आहे...

Uday Nirgurdkar .....if no will.............. then no bill...........result Nil........ so simple.......... if there is bill...but no will....... result nil ....... so simple..... think about it.............


Nitin Potdar.....if no will for the bill, then all against the bill will have to foot the bill in the coming elections!.

गेली १२ दिवस आंदोलन जस जस पुढे जात होत, त्यावर माझ्या फेसबुक वरून मी मला काय वाटलं ते लिहीत होतो ते आज या ब्लॉगवरुन देत आहे.

या आंदोलनात अण्णा राजघाटवर  पोलिसांसोबत धावले.  आपण किती फिट आहेत हे त्यांनी सिध्द केलं तो फोटो देत आहे.   देशाला फिट ठेवण्यासाठी अण्णा तुम्हला फिट रहावच लागेलं!  भारतमाता की जय! वंदे मातरम!! इकलाब जिंदाबाद!!!

28 Aug - Once again it is proved in the history of the World that.....
People also can do strong Politics without any Party or Politicians!

28 Aug - Right to reject! will change the fabric of India politics.....This has to come.

28 Aug - Let all know that ...
People never sleep, people cannot be fooled, and People have real power!

28 Aug - Congratulations to all. People of this Country have won! Truth has prevailed!!

27 Aug- People's power is powerful than the Politicians!

27 Aug - Parliament - debate on everything but do nothing....
Politician talk on everything but assure nothing..... and we call it as Indian Democracy!

26 Aug - In the history of 125 years the Dhobi-ghat of Mumbai is closed in support of Anna's Anti Corruption Movement......

Hopefully the Political Parties will now stop their Dhobi-ghat at Delhi?

26 Aug - People from all religion, men & women of all age, students, salaried class, self-employed, businessmen, professionals, media, taxi drivers, hawkers, dabba walas, boot polishers even beggars across the country got strongly aligned with Anna against corruption......

except the strongest political leaders across all political parties having mass support?

25 Aug - Now Anna should now take up Election Reforms, Judicial Reforms, Agricultural Reforms etc etc etc......then what will the Political Leaders do?  let them retire!

25 Aug - उद्या पासुन TV चॅनल्सवरुन राजकीय पक्षांचे पोपटं बोलायला बाहेर पडतील, त्यांच्या पेक्षा रामलीला वर जमलेल्या सामान्य जनतेच्या भावना देशाला कळल्या तर फार बरं होईल....

25 Aug - Lets not find fault with Anna's Team or the Government....
Lets work towards making a transparent and corruption less Country....

25 Aug - The big big statement in the history of independence...

Entire Country can take stand if the person appealing has moral authority!

25 Aug - Dont ask why are beggars & paupers at the Ramlila,

Ask who made our countrymen beggars & paupers in the first place?

24 Aug - New August Kranti !

- Strongest Open attack on Anna personally.....
- Arrest and release within 12 hours.....
- Govt agreed to table Jan Lokpal ......
- PM agree to fast track ......
- Now apology from Cong.....

Kudos to Anna's Team.....Truth has prevailed!
And for awakening the sleeping elephant.....India!

24 Aug - No wonder all political parties sung same tune to Anna's anti corruption movement.
They all are different branches of same tree.........Not surprised!

23 Aug - फक्त आत्मबलाच्या जोरावर अण्णां उभे आहेत........
देवा कॉंग्रेस सरकारला सुबुद्धी दे!

23 Aug - ‎42 years Lokpal bill could not be passed.....
uncontrolled and unlimited corruption continues.....
Country continues to wait, wait and wait.....
and still Government wants the Country to further wait.....

23 Aug - If a strong Lokpal is passed, one after the other existing politicians across party line would get jailed! Hence no one wants to support thats the hard truth.

22 Aug - अमर्याद सत्ता आणि अपार संपत्ती जे देऊ शकतं नाही, ते अण्णांना त्यांच्या एका शब्दांने दिलं.......
आयुष्यभर राजकारण करणाऱ्यांना गेल्या सात दिवसानी खुप काही तरी शिकवलं असेल अशी आशा करुया.......

22 Aug - अण्णांची तब्येत थोडीजरी बिघडली.............

तरी कॉग्रेस सरकारची तब्येत कायमची बिघडेल!........

22 Aug - मित्रांनो अण्णांच्या आणि त्यांच्या एकुणच आंदोलनाच्या यशावर मराठीतील काही नट दिगदर्शक टीका करुन मोठं होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर न देणं हेच शहाणपणाच होईल......

22 Aug - लोकप्रिय नेता" "लोकसंग्रह असलेला नेता" "लोकाभिमुख" अशा व्यख्या अण्णांच्या आंदोलनामुळे पार बदलुन गेलेल्या आहेत.....

22 Aug - Seven days of Anna's fast has done one good thing for the Country.....

he has changed the definition of the expression 'Leader with Mass support' .........

21 Aug - मुंबईने आज दिवा स्वप्न बघितलं.......

बांद्रा येथे १ लाख मुंबईकर शांतपणे स्वत:हुन अण्णांच्या आंदोलनात सहभागी होतात आणि कुणाच्याही हातात एकही दगड नसतो.........

21 Aug - India Gate, Mumbai, Chennai and across the Country............I wonder whether Government can ignore or remain silent...........anymore. If they do people will certainly ignore all those in power today.

21 Aug - अण्णांची कार्यपदधत त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांना आवडली नसेल.....

.......अण्णांचे काही निर्णय त्यांना आवडले नसतील......
......कुठल्याच नेत्याचे विचार किंवा निर्णय हे १००% बरोबर असु शकत नाहीत......
.....अगदी भगवान श्रीकृष्णानी कुरुक्षेत्रावरील घेतलेले सर्व निर्णय बरोबर नव्हते......

लोकांच समर्थन हे एका लढाईसाठी असतं..... आज ती लढाई भ्रष्टाचारा विरुध्द आहे.... बस इतकच महत्वाच आहे.

21 Aug - ज्या राजकीय पक्षांना अण्णांच आंदोलन मान्य नसेल, त्यांची भुमिका मान्य नसेल, तर त्यांनी स्वत:च एक आंदोलन का सुरु करु नये? ...

एरवी क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन दगडफेक, जाळपोळ, तोडफोड आणि बंद करणाऱ्यांनी भ्रष्टाचारा विरुध्द स्वत:ची ताकत आजमावुन पहायला काय हरकत आहे?

21 Aug - मित्रांनो अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस.....
महाराष्ट्रातला ७४ वर्षीय तरूण स्वत:ला क्लेश करुन देशाला दिशा देण्याच काम करतोय!

एक निर्णायक लढाई लढतो आहे!

अस असताना आपण श्रीकृष्ण जन्म कसा "साजरा" करणार?

21 Aug - आज श्रीकृष्ण जन्म.....
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति"......अस श्रीकृष्णाने महाभारतात म्हंटल आहे.
धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत......
अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस.......देशाची धर्मसंस्थापना करण्यासाठी दुष्कृतींचा नाश हा करावाच लागेल......

20 Aug - Government wants time to present a strong Lok Pal Bill.......
.....so that they can further loot the country for some more time!

20 Aug - एकीकडे ऊंच दहीहंडी बांधुन ऊंच होऊ पाहणारे आपल्या महाराष्ट्रातील राजकीय नेते....

तर दुसरीकडे दिल्लीत याच महाराष्ट्राचा एक सव्वा पाच फुटाचा साधा माणूस संपुर्ण देशाला एका नविन ऊंची वर नेऊ पाहत आहे........

20 Aug - Not every Indian knows who Anna Hazare is,
not every Indian has heard him before,
not every Indian has interacted with him,
he has not wrote books, columns, given speeches.....

It is his simplicity ....

his honesty,

and clarity of thoughts....

that makes our country men move!

20 Aug - काल IBN Lokmat वर रात्री अण्णांवर गो. रा. खैरनार यांनी अण्णांवर घाणेरडे आरोप करुन संपुर्ण आंदोलनच बदनाम करण्याचा प्रयत्न केला.......

निखिल वागळें स्पष्ट आणि थेट बोलतात त्यांचा समोर हे घडलं ह्याच वाईट वाटतं.......

20 Aug - Yes not all Politicians are not corrupt, not all Govt. Officers are corrupt....

but then they all must come forward ...........

Its their battle .............Its not battle against Congress!! It is against Corruption.

19 Aug - प्रत्येकाने स्वत:ला भ्रष्टाचारापासुन दुर ठेवलं तर समाजातला भ्रष्टाचार आपोआप संपेल! एक विचार. मग तस असेल तर आपण कुठलाही गुन्हा करणार असही ठरावुन टाकु म्हणजे पोलिसांची सुध्दा गरज असणार नाही. कोर्ट कचेऱ्यांचीही गरज असणार नाही......

19 Aug - "We the People......" are the starting words of our Constitution.

It not the Parliament, Judiciary or the Executive who are important. It is the Constitution that is important ......

Hence please respect the mandate of millions of people who are on road today with Anna...........Fali Nariman (Sr. Counsel Supreme Court).

19 Aug - Anna is simple! Government must come down from its high horse, Everybody is totally fedup, Something concrete has to be done to try and remove corruption - Fali Nariman (Sr. Counsel)

19 Aug - ‎42 years no political party could not introduce Lokpal Bill! Corruption continues...... increased from few thousands to thousands of crores!!
Prime Minister say that he does not have a magical wand to remove corruption which means he cannot remove corruption........

And still Anna & the common man is asked to go home..........Now the Country will decide who should go home.

19 Aug - Mumbai's 5000 Dabewalla come out on street in support of Anna Hazare! Hope they carry some sense in their empty dabas for the Government.

19 Aug - Before asking any common man whether he has read Janpal Bill? Question should be asked to our politicians whether they have read our Constitution?

19 Aug - Hw long can Government pretend to sleep! ignore! and avoid! truth has to prevail.

19 Aug - Can one simple demand! shackle the Government? yes if the Govt. is crazy. No problem Anna is also crazy and now even people are crazy. let's see who is more crazy.

19 Aug - where are the bollywood intellectuals who speak on anything and everything........

19 Aug - Where are the Richest Indians who always speak against corruption from Five Star Hotels!

19 Aug - मराठी वृतपत्राचे काही संपादक मराठी बाणा जपत आहेत! त्यांना एकच नम्र विनंती अण्णां कसे चुकले ते शोधण्यापेक्षा अण्णांच्या एका शब्दा खातर देशातील लाखो लोक त्यांच्या मागे का उभे रहातात ह्याचा शोध घ्यावा.....शब्दांचे खेळ करण्यापेक्षा शांतपणे चिंतन करावं.........

18 Aug- रामलीला मैदान. एक नविन कुरुक्षेत्र! पण तेच ध्येय, तोच विचार, तोच निश्चय, तीच भुमिका, तीच सभ्यता, तोच संयम, तेच राम आणि तेच रावण........

18 Aug - एकही दगड न मारता, एकही बस न जाळता, एकही काच न फोडता, ७२ तास - त्वेषाने लाखो लोक रसत्यावर मनात वणवा घेउन लढत आहे! उद्या ही लढतील! शांतपणे, संयमाने आणि शिस्तिने. छत्रपती शिवाजी, शाहु, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र काही शिकणार आहे का?

18 Aug - Please watch Times Now at 9.00 pm today....... Very Important debate.

18 Aug - Yes common man is paying bribe to traffic police, ration officer, passport office, to get telephone line, to get school admission, birth & death certificate. He has to pay because he is not in power like any minister or police cop? How will he survive without any support? The common man does not enjoy this payment, whilst the people in power enjoy receiving the payment.

18 Aug- ...today without paying bribe we cannot get school admissions, ration card, driving license, passport, municipal permissions for enclosing balconies, income tax refunds, sales tax & excise exemptions, licenses for carrying business, even birth & death certificates........ the list is endless. When there is no end to corruption there cannot be end to the fight against corruption!!

18 Aug- Anna still fit - but Congress Ministers get conjunctivitis by seeing large scale people support!!

18 Aug- चार दिवस उपोषण करुन सुध्दा अण्णां तंदुरुस्त आहेत, तर जनतेचा वाढता पाठिंबा बघुन कॉंग्रेसी मंत्र्यांना डोळे आले आहेत, तर काहींना काविळ झालेली आहे......

18 Aug- Truth has prevailed!

17 Aug- New criminal law - arrest without reason then remand for seven days and release in 12 hours without arguments.

17 Aug - आज लोकसभेमधील सगळ्यांची भाषणं ऎकली तर भ्रष्टाचार सगळ्या राजकीय पक्षांना समुळ निपटुन काढायचा आहे. मग चर्चा कसली करता? वाद होण्याचे कारण काय? अण्णां तिहार मधे कशाला डांबलेल आहे? कायदे करा आणि घाला सगळ्यांना जेल मधे.

17 Aug - १०० वर्ष जुना राष्ट्रीय पक्ष, ५० वर्षापेक्षा केंद्रात आणि जवळपास सगळ्या राज्यात सत्ता उपभोगणारा पक्ष, पण एका साध्या, सरळ आणि सच्चा माणसा पुढे हतबल!! भारतमाता की जय! लोकशाही जिंदाबाद!!

17 Aug- महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या रक्षणासाठी धावलेला आहे!! आपण आता मागे राहुन कसं चालेल......ज्याला ज्या पध्दतीने, ज्या मार्गाने आणि मिळेल तशी साथ अण्णांना केली पाहिजे..... परिवर्तन, परिवर्तन आणि फ्क्त परिवर्तन.....

17 Aug- सरकारच्या प्रत्येक चालीला अण्णांच्या सच्चाईने चोख उत्तर दिलेल आहे. सरकारच प्रत्येक पाऊल चुकीच, तर अण्णांच प्रत्येक पाऊल प्रगतीचं! देशाला एक नविन दिशा देणारं!! अण्णां आगे बढॊ हम तुम्हारे साथ है!!!

17 Aug - Hopeless Government, hopeful people. Jago India!

16 Aug - सत्यमेव जयते! Truth has prevailed!! भारतमाता की जय!! अण्णांचा विजय असो.

16 Aug - अण्णांना तिहार जेल मधे कलमाडी बरोबर, आणि अरविंद केजरीवाल राजा बरोबर डांबुन कॉंग्रेस सरकारने गेल्या ६५ वर्षातील सगळ्यात मोठी घोडचुक केली आहे. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे...... धिकार असो! धिकार असो!! धिकार असो!!!

16 Aug - प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाने अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणं गरजेच आहे. हा आप्ल्या अस्तित्वाचा लढा आहे! कॉलेज तरूण-तरूणींनो चला व्हा पुढे! हीच वेळ आहे.

16 Aug - अण्णांना श्री. श्री. रविशंकरांचे समर्थन - उद्या दिल्लीत जाऊन अण्णांची घेणार भेट!

16 Aug - सरकारचे प्रवक्ते म्हणतात अण्णांच आंदोलन हे फेसबुक आणि ट्विटर वाल्यांनी चालविलेल आहे. चला दाखवा त्यांना फेसबुक आणि ट्विटरची ताकद.......

16 Aug - सरकार बदलुन चालणार नाही - "परिवर्तन" हेच आपलं ध्येय असलं पाहिजे - अण्णां हजारे. परिवर्तन हे आपल्यासाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, म्हणुन आपण अण्णांनाची नव्हे तर आपलीच मदत करुया. जय हिंद.

16 Aug - सरकारच्या सर्व तोंडांना गप्प करणारं होतं अण्णांच कालच मौनवर्त! सत्यमेव जयते.

15 Aug - दिल्लीत उपोषणाआधी अण्णांना अटक होण्याची शक्यता! विनाश काले विपरित बुध्दी म्हणतात ते याला.

15 Aug - १५ ऑगस्टच्या निमित्तने देशभर भ्रष्टाचार करण्याच पुर्ण स्वतंत्र्य, मात्र भ्रष्टाचारा विरुध्द शांतीपुर्ण उपोषणास २२ अटी. स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!

15 Aug - मित्रांनो हा ब्लॉग फक्त आपल्यात ठेवा, जगा समोर आपली झाली तेवढी नलस्ती खुप झाली. जास्त काय लिहु...जय हिंद.

http://www.myniti.com/2011/08/tweetindia65.html

14 Aug - जर Anna म्हणजे A Company अस कॉग्रेस म्हणत असेल, तर देशाने Congress ला C- Company का म्हणु नये?

14 Aug - आझादीचे दुसरे आंदोलन पेटवणाऱ्या महाराष्ट्राच्या अण्णां विरुध्द कॉंग्रेस या संग्रामाचे चित्र इंग्रजी आणि हिंदी वृतवाहिन्यांवरून देशभर सुरु असताना मराठी वृतवाहीन्या मात्र Teleshopping आणि इतर शुल्ल्क कार्यक्रम दाखवण्यात मग्न आहेत!

13 Aug - भारतीय लोकशाहीची नविन व्याख्या - अण्णांच भ्रष्टाचारा विरुध्द शांतीपुर्ण आंदोलन फक्त तीन दिवस, पण सरकारचा भ्रष्टाचार मात्र वर्षाचे ३६५ दिवस!

13 Aug - कॉंग्रेसच्या सोनिया गांधींना इलाजासाठी अमेरिकेला जाव लागलं, तर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका इथं धाउन आली!

No comments: