Monday, August 15, 2011

माझं Tweet.....India@65

१५ ऑगस्ट २०११:   मित्रांनो देशाच्या केद्रिंय सरकारने अण्णां हजारेंना दिल्लीत भ्रष्टाचारा विरुध्द ऊपोषणासाठी फक्त तीन दिवसांची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिलेली आहे.   देश स्वतंत्र होऊन आज ६५ वर्ष झाली!  भ्रष्टाचार वर्षाच्या ३६५ दिवस आणि त्याच्या विरुध्द शांतपणे उपोषण करणाऱ्या ७४ वर्षीय अण्णा हजारेंना उपोषणासाठी फक्त तीन दिवस!   केंद्र सरकारचे अर्धाडझन मंत्री २ जी, आदर्श आणि CWG इतर स्कॅम्स मधे तिहार जेल मधे बंद आहेत.

सरकार काही करणार नाही आणि लोकांनी काही करायच नाही.  आज खुद्द गांघीजी जिवंत असते तर त्यांना सुध्दा या सरकार ने सत्याग्रह करायला परवानगी दिली नसती अशी परिस्थिती आहे.  

गेली ६५ वर्षात विकास झाला पण कोणाचा?  गरीबी हटाव ने गरिबी गेली का?  हो गरीबी गेली ती मंत्र्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या मित्रांची.  आधुनिक भारत निर्माण झाला पण तो देशातील १% लोकांसाठी.  उच्च शिक्षणं देशात मिळतं ते पैसेवाल्यांना पण तरी देशातील ४० टक्के लोक अशिक्षित निरक्षर.   अर्धी जनता उपाशी!   ६५ वर्षात आपण देशाला अजुनही साधं पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही.  कसल्या प्रगतीची आपण भाषा करीत आहोत.   संपुर्ण देश आज भ्रष्टाचार नावाच्या कॅन्सर ने गिळुन टाकलेला आहे,  त्याचा ठोस इलाज झाला नाही तर देशाच काही खरं नाही हे आपण समजुन घेतल पाहिजे.  भ्रष्टाचारा विरुध्द बोलण म्हणजे कॉंग्रेस विरुध्द प्रचार हा आरोप खोटा आहे.  भ्रष्टाचार आज वर पासुन खाल पर्यंत पसरलेला आहे, तो सर्व पक्षीय असा आहे.  म्हणुन अंण्णाच्या पाठीशी संपुर्ण देशाने ठामपणे उभं राहणं गरजेच आहे.  

अण्णांनाच्या जनलोकपाल कायद्याने काय होणार असा उलटा प्रश्न केला जातोय?  कसा जाणार? भ्रष्टाचार आज शिष्टाचार झालेला आहे.  ज्यांच्या रक्तात भ्रष्टाचार आहे ते असच बोलणार.  निदान अण्णांनी देशात एक मोठ्या प्रमाणात जनजागृती निक्कीच निर्माण केलेली आहे, त्याला मनापासुन पाठींबा दिलाच पाहिजे.   माहितीच्या अधिकारामुळे पुष्कळ बदल झालेला आहे, आता कठोर लोकपाल कायदा झालाच पाहिजे.  ७४ वर्षाचे अण्णां ६५ वर्षाच्या देशासाठी निर्णायक लढाई देणयस सज्ज आहे.   आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलचं पाहिजे.  जय हिंद!

टीप:  मित्रांनो एकच विनंती हा ब्लॉग फक्त आपल्यात ठेवा जगा समोर आपली झाली तेवढी नलस्ती खुप झाली.  जास्त काय लिहु. 

2 comments:

Hobasrao said...

Khare aahe. We need to support Anna in this satyagraha against curroption!

Anonymous said...

मध्यम वर्ग आणि सुशिविद्य भारतियाना आता तरि शहाणपण सुचत आहे हे खूप भाग्याचे ......... अण्णांना नाहीच खरतर आपल्या सगळ्यानां स्वत: साठी आणि आपल्या देशासाठी ताठ कण्याने उभे राहाणे जरुरी आहे. वेळ गेलेली नाही हे मह्त्वाचे !