Friday, August 10, 2012

माझं Tweet.....बांसरीचे शब्दबद्ध केलेले सुर!

10 ऑगस्ट 2012:   आज जन्माष्टमी.... श्रीकृष्ण जन्म..  आज अचानक पं. हरी प्रसाद चौरसियांची आठवण झाली आणि त्यांच्या भेटी वर लिहीलेला मांझ Tweet आठवल ते खाली देत आहे....

१३ सप्टेंबर २०११:  तारिख १० सप्टेंबर २०११ वेळ सकाळी ७.३० मी जेट एअरवेजचे फ्लाईट क्रं. ४५७ या मुंबई ते हैदराबाद विमानात शिरताच माझी नजर  सीट क्रमांक 2A आणि 2B वर गेली - बांसरीवादक पं. हरी प्रसाद चौरसिया आणि संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा!  आणि माझी सीट होती 1B;  दोघांनाही बघुन खरचं खुप बरं वाटलं.  विमान तस रिकामं होतं म्हणुन वाटलं कुणीही एकच असतं तर त्यांच्या शेजारी बसुन छान बोलता आलं असतं.  मला  पं. हरी प्रसाद चौरसियांबद्दल तर आकर्षण आहेच पण जास्त आदर आहे.   श्रीकृष्णाची बांसरी वाजवताताना जेंव्हा ते तल्लिन होतात तेंव्हा कृष्णाविषयी त्यांची नेमकी काय भावना असेल?  हा प्रश्न मझ्या मनात  कित्येक वर्ष घर करुन होता.   तो त्यांना मला शांतपणे विचारायचा होता.   विमानाचं टेकऑफ झालं आणि ते दोघेही बोलण्यात गुंग झाले.   माझ्या मनातला प्रश्न मनातच राहून गेला.  वाईट वाटलं.   विमानातच नव्हे तर एकुणच कुठल्याही प्रवासात आपण कुणाशीही शांत बोलु शकतो, आणि ती संधी हुकली म्हणुन मान खाली घालुन गुलजारची गाणी माझ्या आयपॅडवरुन एकत बसलो.   हैदराबाद आलं ते दोघेही त्यांच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने निघुन गेलो.   दिवसभरची काम उरकुन मी माझ्या हॉटेलमधे आलो तरी डोळ्यासमोरुन पं. हरी प्रसाद चौरसिया आणि मनात असलेला प्रश्न काही केल्या जात नव्हता.  माझं श्रीकृष्णावर निसिम प्रेम, भक्ती आणि श्रध्दा आहे.  म्हटंल तुझी मर्जी! 

दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबर वेळ सकाळी १० स्थळ जेट एअरवेजची फ्लाईट क्रमांक 9W 2115  हैदराबाद ते मुंबई असा परतीच्या प्रवसासाठी मी विमानात शिरलो तर सीट क्रमांक 2 A वर पं. हरी प्रसाद चौरसिया शांतपणे बसलेले आणि माझी सीट क्रमांक 2 B!  WOW!!   मानातला आनंद लपवत मी इकडे तिकडे बघुन खात्री केली की पं. शिवकुमार शर्मा कुठे दिसत नाही ना.   बहुतेक ते आज विमानात नव्हते.  मी पंडितजींच्या शेजारी हळुच बसलो.   विमान टेकऑफच्या पुर्वीचे सगळे सोपास्कार झाले आणि एकदाच विमान मुंबईच्या दिशेने उडालं आणि मनात हुश्श झालं.  आता मी किमान एक तास तरी पंडितजींच्या शेजारी बसुन त्यांच्याशी मनातले सगळे प्रश्न विचारु शकणार होतो.   तरी मी डोळे मिटुन शांतपणे दहा मिनिटे जाऊ दिली.   त्यांनी ब्रेकफास्टची ऑर्डर दिली, मी म्हटंल मला फक्त मसाला चहा पाहिजे कारण मला खाण्यात वेळ घालवायचा नव्हता.

एरवी प्रवासात आपण कुणाशीही सहज बोलु शकतो पण आज मला पंडितजींबरोबर खुप बोलायच होतं.  त्यांच्या मनातल जाणुन घ्यायच होतं.  मनात नेमका प्रश्न तयार केला.  म्हटंल "पंडितजी प्रणाम!  जभी आपके पास समय हो और आपकी मर्जी हो तो क्या मै आपसे सिर्फ पाच मिनिट दो बात कर सकता हु?"  मी पंडितजींना नम्रपणे विचारलं.  "हां हां क्यु नही.  जरुर किजिये.  और पाच मिनिट क्यों जादा बात करेंगे ऎसी क्या बात है" ते म्हणाले.   "आपका कल रात का प्रोग्राम कैसा हुआ?"  ते फक्त हसले.  मी लगेच स्वत:ला सावरत म्हणालो "माफी चाहता हुं मैने गलत सवाल कर दिया.  मै पुछना चाहता था की आपके ऑडिअन्स कैसे थे?"  ते मना पासुन हसले आणि म्हणाले "प्रोग्राम अच्छा हुआं और लोगभी काफी समझदार थे".   नंतर आम्ही दोघेही सलग एक तास बांसरी ते अण्णां हजारेंच आंदोलन अशा विविध विषयांवर हिंदीत बोललो, ते मराठीत खाली देत आहे.

जास्त वेळ न दवडता कित्येक वर्ष माझ्या मनात असलेला प्रश्न मी त्यांना अगदी विचारला -  "पंडितजी तुम्ही जेंव्हा बांसरी वाजवता, मग रियाज असो की एखादा मोठा कार्यक्रम, तुम्ही तल्लिन होता, नकळतपणे तुमचे डोळे बंद होतात, अशा वेळेस एक क्षण असा येत असेल की जेंव्हा तुम्ही श्रीकृष्णाशी नकळतपणे जोडले जात असाल!   त्याच्याशी बोलत असणार, त्या क्षणाला तुमची काय भावना असते?"  प्रश्नाच गांभिर्य त्यांच्या लक्षात आलं.  माझ्या कडे  प्रेमळ नजरेने ते बघत राहिले,   "एक क्षण का?  मी बांसरी हातात घेतो आणि सुरुवातीचे दहा पंधरा मिनिटे ट्युनिंगला लागतात इतकचं त्या नंतर मी सगळ विसरुन जातो.  वेळ, स्थळ, समोर बसलेले श्रोते सगळं सगळं!  मी अस मानतो की श्रीकृष्णच माझ्या कडुन बांसरी वाजवुन घेतो.  माझ्यासाठी बांसरी वाजणं म्हणजे एक पुजा असते! Meditation असतं.  बांसरी वाजविण्याला मी Entertainment कधीच समजलो नाही आणि यापुढेही समजणार नाही."  पंडितजी मनापासुन बोलत होते.

"पंडितजी बांसरी फुंक मारुन वाजवावी लागते.  तुमच्या वाजविण्यात तुमचं मन दिसत असतं.   तुम्ही  जेंव्हा दु:खी असता किंवा रागावलेले असता तेंव्हा बांसरी वाजवताना तुम्हाला त्रास होतो का?"  "श्रीकृष्ण आमच्या घरातली एक व्यक्ती आहे अस आम्ही समजतो!  बांसरी वाजवणे म्हणजे माझ्यासाठी एक पुजा असते!!  आणि तो माझ्या कडुन वाजवुन घेतो म्हटंल्यावर दु:ख, राग वगैरे अशा कुठल्याही गोष्टींचा मला त्रास कसा होईल?"  हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसली.  "माझी त्याच्या (कृष्णा) कडून काहीच अपेक्षा नसते आणि पुढेही असणार नाही.  मला बांसरी वाजवताना आनंद मिळतो, मी तो आनंद इतरांना देऊ शकतो हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे."

"पंडितजी शहनाई, तबला, बांसरी ही वाध्ये त्यांच्यात संपुर्ण आहेत;  ती वाजवणारी मंडळी म्हणजे शहनाई वादक बिसमिल्लह खांन, सितारवादक रवि शंकर,  तबला वादक अल्लारखां, तसेच तुम्ही सगळे तर स्वत:मधेच ऎक ऎक स्वतंत्र विद्यापीठ आहात!  तुमचं ज्ञान पुढच्या पिढिला मिळावं आणि तुमच्या पावला वर पाऊल ठेवुन एक असाच हरी प्रसाद चौरसिया जन्माला यावा, यासाठी तुम्ही बरच काही केलं आहे आणि पुढेही करणार असाल.  त्या बद्दल थोडं सांगाल का?"  मी विचारलं.  "इतरांनी काय केल हे मला जास्त माहित नाही, पण हो मी मुंबईला - वृंदावन नावाने एक गुरुकुल चालवतो.  तिथं माझ्या पुष्कळ रेकॉर्डस, टेप्स, ऑडिओ, व्हिडिओ असे बरेच काही ठेवलेल आहे.   भरपुर काही करुन ठेवलेल आहे.  माझ्या मुलांना मी नेहमी सांगतो की माझ संगीत टेप्समधे रेकॉर्ड करण्यापेक्षा, आपल्या डोक्यात रेकॉर्ड करा आणि नविन संगीत निर्माण करा."   पंडितजी पोटतिडकीने सांगत होते.   "आताची नविन पिढी खुपच हुशार आणि फोकस्ड आहे.  त्यांना आयुष्यात काय करावं हे चांगल समजतं, पण त्यांनी materialistic  होता कामा नये.  टेकनोलॉजीच्या जास्त मागे लागण्यात काही अर्थ नाही.  शेवटी आपण माणस आहोत आपण माणुसकी  विसरता कामा नये.  Human Values are very important."  पंडितजी मनापासुन बोलत होते.  मधेच त्यांचा सुर आशावादी असायचा तर मधेच दु:खी.  

"अण्णा हजारेंच्या आंदोलना विषयी तुम्हाला काय वाटतं?" मी एकदम विषय बदलायचा प्रयत्न केला.  "भला माणुस आहे!  कुणीतरी हे करायला पाहिजे होतचं.  सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला  ही  फारच आनंदाची गोष्ट आहे."  "मतलब लोग अभी जिंदा है!"  बोलताना आपले मराठीचे संगीतकार श्री. यशवंत देव यांचा ही उल्लेख त्यांनी खुपच आदरपुर्वक केला.

मधेच हळवे होत ते म्हणाले की "आजकी इस भाग दौड मे एक संगीत ही इन्सान को इन्सान बनाये रखेगा.  बस संगीत ही उसे शांती दे शकता है!  लेकीन इस दिशा मे और ज्यादा काम होना चाहिये! देखो अब आगे क्या होता है!" 

......कृष्णाची पुजा पंडितजींकडून अशीच अजुन बरीच वर्ष होत रहावी ही त्या श्रीकृष्णाकडे मनापासुन प्रार्थना करतो.  मित्रांनो बांसरीचे शब्दबद्ध केलेले सुर मी तुमच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केल.  पं. हरी प्रसाद चौरसिया आणि पं. शिवकुमार शर्मा तरूणपणा पासुन एकत्र वाजवत आहेत तो फोटो दिला आहे.

No comments: