Tuesday, October 25, 2011

माझं tweet.....शुभ दिपावली! २०११

२५ ऒक्टोबर, २०११:  मित्रांनो सर्वप्रथम दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!  दिवाळी म्हटंल की घराघारात उत्साह आनंद आणि जोश!   आकाश कंदिल, रांगोळ्या, दिवे, फटाके, दिवाळीचा फराळ (लाडु चकल्या चिवडा करंज्या अनारसे.....), नविन कपडे, शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग्स),  फोन, एसएमेस्स, ईमेल्स, हल्ला गुल्ला!  मग  एकमेकांच्या घरी जाणं, मित्रांसोबत  दिवाळीची खास पार्टी आणि हो अहो दिवाळी अंक विसरलात?  पुर्वी नाही का म्हणायचे -  चार गुजराती माणसं एकत्र आलीत की एखादा पैसे कमावण्याचा धंदा करतात, आणि चार मराठी माणसं एकत्र आलीत की दिवाळी अंक काढतात!  हल्ली चार मराठी तरूण एकत्र आलीत की ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट बनवितात!   काय चुकलं त्यांच.  खरं तर प्रत्येक मराठी कुटूंबात किमान १००० रुपयांचे दिवाळी अंक विकत घेतले पाहिजेत आणि घरातल्या प्रत्येकाने आवडीनुसार ते वाचले सुद्धा पाहिजेत.  तसेच वेबदुनियेत आपण पाहिलेल्या चांगल्या मराठी वेबसाईट्स इतरांना बघण्यास सुचविल्या पाहिजेत किंवा त्यावर येणारा मजकुर वाचल्यानंतर अभिप्राय दिला पाहिजे.  विचारांनी आपला समाज किती पुढे आहे हेच त्याच एक लक्षण आहे अस मी समजतो.  एकुणच काय तर दिवाळी म्हटंल की नव-चैतन्य आणि जल्लोश! 

Saturday, October 8, 2011

माझं Tweet.....स्टीव्ह जॉब्स - एक चमत्कार!

८ ऑक्टोबर २०११:  स्टीव्ह जॉब्स!  अ‍ॅपलचा सहसंस्थापक!!  आपल्यात नाही ही कल्पना देखिल करवत नाही.   त्यांच्या निधनाची बातमी ट्विट झाली आणि ट्विटर व फेसबूक या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रतिक्रियांचा अक्षरश पाऊस पडला. या प्रतिक्रियांचा ओघ इतका प्रचंड होता की, दोन्ही साइट्स काही काळासाठी ब्लॉक झाल्या होत्या. विशेष म्हणजे फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबूकवर आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर दोन मिनिटांत त्याच्या त्या कमेंटवर तब्बल दहा हजार ‘लाइक्स’ आले. स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेल्या उपकरणांनी माणसांना जवळ आणण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जॉब्स यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. स्टीव्ह जॉब्सनं तयार केलेली अनेक उपकरणं बहुतेक लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडची होती.
सुरुवातीची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या, अपार कष्ट, जिवापाड मेहनत,  वेळोवेळी अपमान,  आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर अपयश! आणि नंतर हळू हळू यशस्वी होत गेलेली!  जगात मोठं नाव, अमाप पैसा, अपार किर्ती कमावलेली!  बरीच माणस आपण जगात बघतो.  पण स्टीव्ह हा माझ्या मते खरोखरच एक चमत्कार होता!  एक कर्तबगार व्यक्तिमत्वं.  त्याने त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याच कधीच भांडवल केल नाही.  कधी नाउमेद झाला नाही.  आयुष्याच्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेतुन एक वेगळ विश्व निर्माण करता येऊ शकतं!   

Thursday, October 6, 2011

सीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)

६ ऑक्टोबर २०११:   आज विजयादशमी - दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!  विचारांच सोन लुटायच असेल तर आपला मित्र परिवार मोठा असला पाहिजे.   आठवड्यातुन नाहीतर किमान महिन्यातुन एक तरी नविन ओळखं किंवा मित्र जोडायलाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे. आणि जर नविन ओळखं नाही झाली तर आपल्या जुन्या मित्रां पैकी एकाला तरी आठवणीने आतमीयतेन आणि प्रेमाने भेटलं पाहिजे.  आपण एक पाउल पुढे टाकुन सीमोल्लघंन तर करुया!  मित्रांची बॅंन्क बॅलन्स ही खरी दौलत असते अस मी समजते.  बघा तुम्हाला पटतं का?    "सीमोल्लंघन" - हा माझा सगळ्यात आवडता लेख वाचकांसाठी पुन्हा देत आहे.  घन्यवाद.  

*****************

‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे नेमकं काय हे आपण मागील लेखात (१४ सप्टेंबर) वाचलंत. आपण नेहमी आपला ‘बँक बॅलन्स’ बघतो, आपल्या उद्योगाची किंवा व्यवसायाच्या जमा-खर्चाची ‘बॅलन्सशीट’ बनवितो आणि त्याचं नेटवर्थ बघतो, तसं आपण आपल्या ‘बिझनेस नेटवर्क’चे नेटवर्थ बघतो का? नाही! कारण आपण आपल्या ‘नेटवर्क’ला एक ‘अ‍ॅसेट’ म्हणून कधीच बघत नाही. आपण आपल्या दाग-दागिन्यांची यादी करतो, त्याचे वेळोवेळी मूल्यांकन करतो; पण आपल्या नेटवर्कमध्ये असलेल्या माणसांची साधी यादी तरी करतो का? नाही! अनेक चांगल्या माणसांना आपण रोज भेटतो, पण कामाशिवाय त्यांची साधी माहितीसुद्धा आपण काढत नाही.  

Sunday, October 2, 2011

माझं Tweet.....मिफ्ता लंडन...यशाचं दुसरे वर्ष!

२ ऑक्टोबर २०११:  महेश मांजरेकर आणि मराठी नाट्य आणि चित्रपटातील कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीत परदेशात होणाऱ्या "आयफा" च्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून 'मिफ्ता' नावाने सुरु केलेला पुरस्कार सोहळा यंदा लंडन मधे दिमाखात पार पडला.  गेल्या वर्षी दुबईत तीनशे कलावंत 'मिफ्ता पुरस्कार सोहळा' करून आले आणि यंदा 'लंडनला’ आणखी जास्त संख्येने मराठी कलाकार त्यात सहभागी झाले.   महेश मांजरेकरांच आणि मिफ्ताच्या संपूर्ण टिमच, त्यात सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांच आणि खास करुन दुबई आणि लंडन मधील समस्त मराठी रसिकांच कौतुक कराव तेवढ थोडं.   त्यांच त्रिवार अभिनंदन! आणि पुढच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा.

या पुढे मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय हा साता समुद्रापलीकडे नेण्यात मिफ्ताचं योगदान मोठं असणार आहे यात शंकाच नाही.   "श्वास" चित्रपटाच ऑस्कर साठी नॉमिनेशन झाल्यापासून मराठी चित्रपट आणि नाट्य व्यवसाय खऱ्या अर्थाने श्वास घ्यायला लागला अस मी मानतो.   त्याच्या नंतर बरेच चांगले दर्जेदार चित्रपट आले आणि अजून येत आहेत.   आज मराठी चित्रपटांचे बजेट काही कोटींमधे गेलेले आहे.   कलाकारांना चांगल मानधन मिळतं.   निव्वळ मार्केटिंगसाठीच काही कोटी रुपये खर्च होत आहेत.   म्हणजे आज मराठी नाट्य आणि चित्रपटांना चांगले दिवस नक्कीच आलेले आहेत किंवा येऊ घातलेले आहे अस म्हटंल तर चुकीच होणार नाही. चांगल्या पैशाबरोबरच चांगली दर्जेदार कलाकृती, व्यावसायिकता आणि कलाकारांना मानमरातब आणि एकूणच मराठी नाट्य-चित्रपटाचा पसारा दिवसागणिक वाढतो आहे.   मिळालेल यश ही क्षणिक लाट न ठरता एक भक्क्म उद्दोगक्षेत्र होवो ही सदिच्छा!