Friday, August 17, 2012

माझं Tweet.....शारुख खानच्या यशाचं रहस्य!

17 ऑगस्ट 2012:  आज शारुख खानं म्हटंल की आपल्या समोर येतो एक यशस्वी कलाकार! नुसताच यशस्वी नव्हे तर यशाच्या सगळ्या सीमा पार केलेला एका कलाकार!  He is an industry in himself! असं म्हटंल तरी ती अतिशयोक्ती मुळीच होणारं नाही.  त्याच्या यशाचं गमक त्याच्याच शब्दात काय असेल हे जाणुन घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.  म्हणुन आजच्या   Economic Timesच्या Corporate Dossier पुरवणीत त्याची सविस्तर मुलाखत आलेली आहे, ती खाली देत आहे. 

तु हे यश कस मिळवलं? ह्या प्रश्नाच उत्तर त्याने अगदी साध्या आणि सोप्या शब्दात दिलं - तो म्हणतो मला पैसा, प्रसिद्दी, उत्कृष्ठ काम, मागच्या पेक्षा आज चांगल काम करणं किंवा मला हेच करायचं होतं अशा मुलभुत गोष्टींपेक्षा मला ज्या गोष्टी मुळे आनंद मिळतो मी तेच करतो आणि यशस्वी होतो!  तस बघितल तर अगदी साधा आणि सोपा नियम!  हे जरी खरं असल तरी प्रत्येकालाच प्रेत्येकवेळी आपल्या मना प्रमाणे काम येईल का?  मुळीच नाही.  शारुखने सुद्दा त्याच्या उमेदवारीच्या काळात किती तरी कामे  त्याचा मना विरुध्द केले असतील, आणि ती करताना त्याला मरणप्राय यातना झाल्या असतील.  दु:ख झालेल असेल, मानहानी पत्करावी लागलेली असेल.  आनंदाच्या एका क्षणासाठी कित्येक वर्षाची तपश्चर्या करावी लागते!   होय यशासाठी तपश्चर्याच करावी लागते.  त्या एकाक्षणासाठी क्षणाक्षणाला आपण मरत असतो.   शारुखने त्याच्या सुरुवातीच्या काळात केलेले कष्ट मला माहित आहे.  खुप कठीण काळ त्याच्या वाटेला आला  म्हणुन त्याला यशाची खरी किंमत माहित आहे.  

शारुख पुढे म्हणतो की "यशासाठी सतत शिकत रहाणं हे फार महत्वाचं आहे".   उद्दोगाचे कुठलेही निर्णय घेताना तो 95 टक्के मनाचच ऐकतो, डोक्याचं नव्हे!  Nothing succeeds success!  ही म्हणं त्याच्या बाबतीत 100टक्के खरी आहे!   पुष्कळ दिवसांनी एका यशस्वी माणसाची मनपासुन दिलेली उत्तम मुलाखत वाचायला मिळाली.  शारुख आणखी जास्त यशस्वी होवो, मोठा होवो हीच माझी इश्वरचरणी प्रर्थना! मला वाटतं ही त्याची मुलाखत खुप शिकवुन जाते!   

टीप:  शारुखंची सही मला आवडली म्हणुन त्याच्या सही सकट त्याचा फोटो दिला आहे.  अस म्हणतात की 45 degree चा angle वर सही करणारी व्यक्ती यशस्वी होते;  पण सहीच्या खाली दोन टिंब म्हणजे त्याला कुणाचातरी emotional support ची गरज लगत असणारं! तिथं गौरी खानचा रोल सुरु होतो! 

Wednesday, August 15, 2012

माझं Tweet.....शोध नव्या भारताचा!

 14 ऑगस्ट 2012:  15 ऑगस्टची आठवण म्हणजे -  शाळेत असताना क़डक इस्त्रिचे कपडे घालुन झेंडावंदन करायचं, आणि घरी येउन दुरदर्शन वर लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांचे भाषण, नंतर होणारी आपल्या मिलिट्रीची रॅली......प्रत्येक रस्त्यावर लता दिदींच "ऐ मेरे वतन के लोगो...." हे गाणं एकायला मिळत असे.....सगळ कस भारावलेल असायचं.   आता 15 ऑगस्ट म्हटंल मला सर्वर्प्रथम दिसतात सिग्नल वर झेंडा विकणारी लहान लहान मुल!   प्रश्ना असा आहे की त्यांना बघुन आपल्याला काय वाटतं?  शाळेत जाणा-यां  मुलांपेक्षा मला शाळेत न जाणा-या या मुलांची जास्त काळजी वाटते.   ही मुलं सुद्दा ह्या देशाचे नागरिक आहेत, ह्या देशावर त्यांचा देखिल संपुर्ण अधिकार आहे.   आपण जो पर्यंत त्यांच भविष्य घडविणार नाही तो पर्यंत आपल्या देशाला  भविष्य असणार नाही! हे कटु सत्य आहे.  

आता दुसरीकडे शाळेत जाणा-यां मुलांच भविष्य काय आहे ते पाहु या? सध्याचे युग ज्ञानावर आधारित अर्थकारणाचे आहे.  गेल्याच आठवड्यात डॉ. अनिल काकोडकरांचा "शोध लपलेल्या हिर:यांचा" हा लेख वाचला आणि तो तुमच्यासाठी खाली देत आहे.  त्यात ते म्हणतात: "तुमची झेप किती मोठी होतेहे तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या संधींवर ठरतेत्यामुळेच उपजत बुद्धिमत्तेची मशागत आणि संधींची उपलब्धता महत्त्वाची ठरते. संधी वाढवायचा पहिला पर्याय म्हणजे आर्थिक विवंचना दूर करणे."  

ज्या मुलांना शाळेत चांगल शिक्षणं मिळाल असं आपण समजतो, ते शिक्षणं त्यांना साधी नोकरी देउ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.....मध्यंतरी एका सर्वेत असं आढळल की जवळ जवळ 60 टक्के ईंजिनीयर मुलं नोकरी करायला लायक नसतात...त्यांना टेकनिकल ज्ञान नसतं.

डॉ. अनिल काकोडकर म्हणतात तसं अफाट लोकसंख्या असलेल्या भारताची ओळख विकसित देशांची हक्काची बाजरपेठ, इथवर सीमित राहता नये तर बुद्धिमान मनुष्यबळाच्या जोरावर नवनिर्मितीची ताकद असलेला देश म्हणून सा-यांनी त्याच्याकडे पाहायला हवे.  पण त्यासाठी संधींपासून वंचित राहिलेल्या या देशातील असंख्य हि-यांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी आपल्याला नव्या संधी निर्माण कराव्या लागणार आहेत...... आपल्याला एका नव्या भारताचा शोध करावा लागणार!
 

Friday, August 10, 2012

माझं Tweet.....बांसरीचे शब्दबद्ध केलेले सुर!

10 ऑगस्ट 2012:   आज जन्माष्टमी.... श्रीकृष्ण जन्म..  आज अचानक पं. हरी प्रसाद चौरसियांची आठवण झाली आणि त्यांच्या भेटी वर लिहीलेला मांझ Tweet आठवल ते खाली देत आहे....

१३ सप्टेंबर २०११:  तारिख १० सप्टेंबर २०११ वेळ सकाळी ७.३० मी जेट एअरवेजचे फ्लाईट क्रं. ४५७ या मुंबई ते हैदराबाद विमानात शिरताच माझी नजर  सीट क्रमांक 2A आणि 2B वर गेली - बांसरीवादक पं. हरी प्रसाद चौरसिया आणि संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा!  आणि माझी सीट होती 1B;  दोघांनाही बघुन खरचं खुप बरं वाटलं.  विमान तस रिकामं होतं म्हणुन वाटलं कुणीही एकच असतं तर त्यांच्या शेजारी बसुन छान बोलता आलं असतं.  मला  पं. हरी प्रसाद चौरसियांबद्दल तर आकर्षण आहेच पण जास्त आदर आहे.   श्रीकृष्णाची बांसरी वाजवताताना जेंव्हा ते तल्लिन होतात तेंव्हा कृष्णाविषयी त्यांची नेमकी काय भावना असेल?  हा प्रश्न मझ्या मनात  कित्येक वर्ष घर करुन होता.   तो त्यांना मला शांतपणे विचारायचा होता.   विमानाचं टेकऑफ झालं आणि ते दोघेही बोलण्यात गुंग झाले.   माझ्या मनातला प्रश्न मनातच राहून गेला.  वाईट वाटलं.   विमानातच नव्हे तर एकुणच कुठल्याही प्रवासात आपण कुणाशीही शांत बोलु शकतो, आणि ती संधी हुकली म्हणुन मान खाली घालुन गुलजारची गाणी माझ्या आयपॅडवरुन एकत बसलो.   हैदराबाद आलं ते दोघेही त्यांच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने निघुन गेलो.   दिवसभरची काम उरकुन मी माझ्या हॉटेलमधे आलो तरी डोळ्यासमोरुन पं. हरी प्रसाद चौरसिया आणि मनात असलेला प्रश्न काही केल्या जात नव्हता.  माझं श्रीकृष्णावर निसिम प्रेम, भक्ती आणि श्रध्दा आहे.  म्हटंल तुझी मर्जी!