Sunday, November 18, 2012

माझं Tweet.....साहेब गेले! ....तया यातना कठीण!

१८ नोव्हेंबर २०१२:  साहेब गेले .... महाराष्ट्र कसा असावा ह्याचे  स्वप्न दाखवून साहेब आपल्याला अखेरचा जय महाराष्ट्र करून गेले...  उभा महाराष्ट्र पोरका झाला.... अनाथ झाला! .... आज संपूर्ण देश दुखा:त आहे.   आता त्यांच्या प्रत्येक कृतींच आणि  शब्दांच  कौतुक होणार आहे..... कित्येक वर्ष आता त्यांची स्तुती होईल.  तसेच त्यांचे यश व अपयशाची मोजदाद  होईल.  त्यांनी काय करायला पाहिजे होत आणि काय नको, याची चर्चा, ज्यांनी आयुष्यात काहीही केल नाही अशी माणसे करतील.   साहेब चुकले कुठे हे दाखवण्याचा प्रयत्न  होईल.   पण इतक मोठं विश्व उभा करणारर्याचे दुख: काय होते याचा विचार  कुणी कधीच मांडणार नाही.   म्हणून त्यांच्याच शब्दात......मी असा का वागतो? ह्याच उत्तर बाळासाहेबानीच दिल होत ते खाली देत आहे....