Monday, December 17, 2012

माझं Tweet.....यश लवकर कसं मिळणार?

17 डिसेंबर 2012:  मागच्या महिन्यात एक इमेल आला, पाठवणारा मला वाटतं पंचवीशीतला तरुण असावा म्हणुन नाव न घालता त्यातील काही मजकुर खाली देत आहे.  हा तरुण हुशार आहे, मेहनती आहे, पण झटपट यश कसं मिळणार हा त्याचा प्रश्न आहे?   बरं नुसतच यश नकोय, त्याला हवंय मोठं यश!  ते ही लवकरात लवकर, ताबडतोब, आता म्हणजे आता!

यशाच कसं असतं बघा, आपल्याला एक यश मिळाल की आपल्याला नविन यश हवं असतं, यशाची भुक वाढलेली असते, आणि ती तशीच असावी;  खरं तर माझ्या सकट सगळ्यांच्याच बाबतीत असं होत असणार.  खरं तर ही भुक नुसतीच यशाची नसते.  आपल्या आयुष्यात सारखं काहीतरी घडायला हव अस आपल्याला सतत वाटत असतं.  आता हेच बघा आपण  टिव्ही वर कुठलाही कार्यक्रम बघण्याआधे आपण किमान 4 ते 5 वाहिन्या सर्फ करतो, आणि नंतर कुठेतरी एखादा कार्यक्रम बघतो.  मधेच ब्रेक आला की आपण पुन्हा वाहिन्या सर्फ करायला लागतो.   आपण जो कार्यक्रम बघत असतो, तो खुपच चांगला रंगलेला आहे, तरी आपल्याला दुसरं बघायची उत्सुकता असते.  मधेच आपला मोबाईल वाजतो, आपण मधेच टिव्ही सोडुन बाहेर बोलायला जातो.  हे अस का होतय? आपल्याला प्रत्येक मिनीटाला  "बदल" का हवा असतो?  थोडं विषयांतर होतय मला माहित आहे, पण जगात सगळ्या गोष्टी इतक्या झपाट्याने बदलत आहेत की सारखं 'बदलत' राहणं हीच आपली जीवन शैली होत आहे, नव्हे ती झालेलीच आहे.  म्हणुन एक यश मिळालं की त्याचा आनंद न घेता आपण लगेच त्याच्यापुढे बघायला लागतो.  बरं आता आपल्या मित्राला काय पाहिजे ते आधी बघु या....

"Dear Sir,

I am born and brought up in a small village in Maharashtra . My dad is a Teacher in the same village with NO business background at all.  I was fortunate enough to work at age of 25 as Project Manager in XX until last 2 months.  I always had a dream to start my own Business. 

(certain portion deleted)

Sir, Here I am working as Head of International Business.  It’s totally new field for me ( Mechanical) I am currently learning the product and looking after International Business as well.   The decision to Quit IT and Join Mechanical industry came after me thinking on it for 3 months!! And as your book says “ Journey of thousand Miles begins with one step” I have taken that.

Sir, we are the BEST in ASIA its my job to grow the Business Globally. As soon as I joined the Business we got many international clients and things were smooth.

एक पण Business travel न करता we started getting Business in 2 months. आता its time for me to prove and grow more.   पण सर, I am able to reach the client by email….   बरेच  international आहेत पण ते  Business madhe convert होत नाही....

आता  when business convert होण्यासाठी  वेळ  लागत आहे ,  I am restless.  मला  things fast convert व्हायला पाहिजेत.

Sir काय कराव? Any thoughts how can I grow things fast and great speed at this Low time in industry. And sorry for my language and Length of email!!

आपल्या मित्राला हवयं 'यश'  तेही मोठं यश आणि झटपट!  हा आपला मित्र म्हटंल तर यशस्वी आहे, कारण, त्याने एक नोकरी सोडुन  काही तरी नविन करतोय?  परदेशात न जाता सुद्दा तो International Clients  पर्यंत तो पोहोचलेला आहे, पण त्यांच्या कडुन त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो अस्वस्थ आहे...

थोडं मार्केटिंग बद्द्ल सांगण गरजेच आहे.  मार्केटिंग मधे चार टप्पे असतात अस मला वाटतं; (1) सर्वप्रथम - नविन ग्राहक शोधणे, (2) दुसरं: त्यांच्याशी संपर्क साधणे, (3) त्यांच्याशी संवाद साधणे, आणि (4) त्यांना आपलं उत्पादन विकणे.  आपण जेंव्हा लोकांना भेटतो, तेंव्हा आपल्याला वाटतं की भेटलेला प्रत्येक माणसाने आपल नुसतच  घेतलं पाहिजे अस नव्हे, तर त्यांनी  आपलं उत्पादन विकत सुद्दा घेतलं पाहिजे.   विचार करा की आपण जेंव्हा ऎखाद्या दुकानात जातो तेंव्हा आपण काय करतो?  दुकानदाराच सगळं ऎकुन घेतो आणि त्याला सांगतो की आणखी चार दुकानात जातो आणि मग निर्यण घेतो.

चला सगळ्यात पहिले 'यशाची' व्यख्या करुया.  साधारणंपणे आपल्याला कुठल्याही परिक्षेत 60 % गुण मिळाले की आपण पहिल्या वर्गात पास होतो.  आता हेच प्रमाण आपण आपल्या मार्केटिंगला लागु करुया.  आपण जर 100 माणसांमधे आपल्याला हवे असलेले 60 ग्राहक शोधले तर आपण 60%  नविन ग्राहक शोधण्याच्या परिक्षेत पहिल्या वर्गात पास झालो अस समजा;  आता  त्यातील 36 ग्राहकांशी (60 ग्राहकांचे 60% = 36) आपण संवाद साधु शकलो तरी आपण  पहिल्या वर्गात पास झालो;  पुढे जाउन जर आपण 21.6 ग्राहकाना आपले उत्पादन विकु शकलो तरी 60% यश (36 ग्राहकांचे 60% = 21.6).  म्हणजे 100 लोकांमधे, 21.6 लोकांना जर आपण आपले उत्पादन विकु शकलो तरी आपण पहिल्या वर्गात पास झालो म्हणुन समजा.

हे झालं मार्केटिंग बद्दल पण खरं तर तुमचा व्यवसाय कुठलाही असेल आणि त्यात मग मार्केटिंग की म्यॅन्युफ्चरिंग - 'संयम' हा ठेवायलाच हवा.  आपल्याला साधी दहावी पास करण्याकरीता बारा वर्ष लागतात!  होय बारा वर्ष!  नंतर पदवी घ्यायला पुढे  पाच वर्ष.  म्हणजे नुसते काही दिवस किंवा महिने जात नाहीत तर वर्षां मागे वर्ष आपण मेहनत घेतो तेंव्हा कुठे आपण समाजात उभ रहायला शिकतो. मग एखाद्या व्यवसायात  एका वर्षात आपल्याला मोठं यश कसं मिळणार?  विचार करा......

अहो आपल्याला दोन पायांवर साधं उभं रहायला एक वर्ष लागलं होतं!  चालायला दोन आणि धावायला तीन वर्ष लागले होते.   पहिला शब्द 'आई' उच्चारायला सुद्दा साधारणंपणे एक वर्ष गेलं होतं.  आपल्याला व्यवसायातली बाराखडी, मग अक्षर ओळखं, जोडअक्षरे, व्यकरणं अशा ठप्यानेच आपण लिहायला आणि वाचायला शिकणार.  आधी नीट लिहता-वाचता आलं की मगच आपण गणित, भाषा, इतिहास, भुगोल असे विषय शिकणार.....म्हणुन यश मिळाल पाहिजे हे जितकं खर असलं तरी ते मिळवायला वेळ लागणारच.  We must remember that the word 'patience' comes prior to 'success' in any dictionary.....