Friday, March 29, 2013

शिक्षणाच्या गाडीला ब्रेक!

मुबंइ सकाळ 29 मार्च 2013: Good Morning: अलिकडे दोन-तीन पाहणी अहवालांच्या निष्कर्षानुसार आर्थिक, सामाजिक, परदेशी गुंतवणूक, सामान्यांचे जीवन आणि स्त्रियांची सुरक्षितता या संदर्भात महाराष्ट्राचीच स्थिती चिंताजनक आहे.  यातील काही संदर्भात तर आजवरची काही मागास राज्येही महाराष्ट्रापेक्षा जास्त सरस आहेत.  महाराष्ट्र हे  कर्जबाजरी राज्य आहे आणि या पुढे विकासकामे होतील का?  हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.   ‘महाराष्ट्राचं काही खरं नाही !’ असं खात्रीपूर्वक सांगणाऱ्यांची संख्या एका उच्चतम वर्गात जशी लाखांचे आकडे ओलांडते आहे;  तशी भावना कोट्यावधी सर्वसामान्यांचीही आहे.  अलीकडील काळात चार संवेदनशील प्रौढच नव्हेत तर अगदी  कॉलेज मधे नुकताच प्रवेश घेतलेल्या तरूणांच्या कुठल्याही गप्पां ‘काय करायचं या महाराष्ट्राचं?’ ह्या प्रश्नावर येऊन थांबतात.     

Sunday, March 24, 2013

माझं Tweet.....भारत माझा देश आहे! कोणी लिहिलं?

PEDEMARI24 मार्च 2013: "भारत माझा देशा आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत" "India is my Country, all Indians are my brothers and sisters...."  हे वाक्य आपण वाचुन लहानाचे मोठे झालो.  हे वाक्य अजुनही आठवा तुम्हाला देशाबद्दल एक आतमीयता नक्कीच वाटेल.   आजही कुठलही पुस्तक उघडल की माझ मन ही राष्ट्रीय प्रतिज्ञा शोधतं असते.  माझ्या शालेय जीवनाच्या आठवणीतल एक सुंदर पान म्हणजे मी पाठकेलेली ही राष्ट्रीय प्रतिज्ञा.   माझ्या शाळेची प्रिंसिपॉल ही एक इस्राईली महिला होती कडक शिस्तिची, वेळेची, शाळेचा युनिफॉर्म, वह्यांना कव्हर्स आणि सगळ्यात आधी ही राष्ट्रीय प्रतिज्ञा.....अशा कडक शिस्तित मी वाढलो.   तेंव्हा तीचा खुप राग यायचा पण आज कित्येक वर्षांनी ह्या निमित्ताने तीची आठवण झाली! 
आज देशाची अवस्था बघितली तर आपण एकीकडे प्रगती केल्याच चित्र आहे, तर दुसरी कडे अजुनही हजारो लाखो माणसांना साधं पिण्याचे पाणी आपण देऊ शकलो नही.    हे अस का?  कारण आपण प्रगतीकेली पण त्यात आपण आपली  राष्ट्रीय प्रतिज्ञा विसरलो.....

Friday, March 22, 2013

महाराष्ट्राचे पहिले साहेब...

मुबंइ सकाळ 22 मार्च 2013: Good Morning:  गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने संपुर्ण महाराष्ट्रात होर्डिंग्स – पोस्टर्स वर बंदी आणली आणि गल्लो-गल्लीतले साहेब अचानक गायब झाले.   ज्याच्याकडे लक्ष्मीची माया मोठी आणि त्या जोडीला मनगटशाही मोठी तो आता पक्षात सहजच ‘साहेब’ या पदवीला जाऊन पोहोचतो.  आता कुठल्याही राजकीय पक्षाच्या चरित्राचा वेध घेतला तरी एकाच पक्षात पाच-पन्नास ‘साहेब’ सहज वावरतांना दिसतील... अर्थात हा आजच्या काळाचा आणि आजच्या राजकारणाची जी पत-प्रत  त्याचा परिणाम आहे.   आता राजकारण हा सेवाधर्म राहिला नसून तो एक व्यवसाय, एक बिनभांडवली धंदा किंवा संपूर्ण कुटुंबाने करायची एक लाभदायक गुंतवणूक झाली आहे.   काल महाराष्ट्र विधीमंडळात झालेल्या मारामारीत आजचे आमदार साहेब कुठल्या थराराला गेलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.

Friday, March 15, 2013

जेंव्हा संयम सुटतो.....


मुबंइ सकाळ 15 मार्च 2013: Good Morning:  ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा बॉक्सिंगपटू विजेंदरसिंगवर सध्या अमंली पदार्थ दलालाशी संबध असल्याचा आरोप आहे.  काही महिन्यापुर्वी सायकलवीर आर्मस्ट्राँग आणि ब्लेड रनर पिस्टोरियस या दोघेही असेच वादाच्या भोवर्र्यात सापडले होते.  हे दोघेही कल्पनातीत संपत्ती, अत्यंत दुर्लभ आणि जणू दैवायत्त वाटावी अशी प्रसिद्धी, जगभर पसरलेले चाहते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात उच्चतम कर्तृत्व करण्याची आकांक्षा बाळगणारे खेळाडू यांचे धनी आहेत.
सलग सात वेळा ‘टूर द फ्रान्स’ ही अतिशय मानाची आणि अत्यंत कष्टाची सायकल स्पर्धा जिंकणारा आर्मस्ट्राँग म्हणजे दोन चाकांवरून जग जिंकणारा अजिंक्य योद्धाच म्हणावा लागेल.  आज त्याचं वय आहे फक्त सव्वीस आणि त्याला प्राप्त झालेली दिगंत कीर्ती मिळवायला त्याच्यापेक्षा दुप्पट- तिप्पट वय खर्च करणारेही अगणित आहेत.  एवढं वय खर्च करूनही त्यांना आर्मस्ट्राँगची जागा आणि लौकिक प्राप्त करता आलेला नाही ; आणि येणारही नाही.

Friday, March 8, 2013

सर्वोत्तम एलिझा?

मुबंइ सकाळ 8 मार्च 2013:   Good Morning:   आज ८ मार्च जागतिक महिला दिन!  विविध क्षेत्रातल्या कर्तबगार महिलांचे आज कौतुक होईल.  म्हणुन मी आज त्यात एलिझा नावाच्या संगणकीय महिलेची तुमची ओळखं करुन देणार आहे.

मानवाची बुद्धिमत्ता अफाट आहे आणि तिची अंगभूत नैसर्गिक क्षमता ही अक्षरशः कल्पनातीत आहे!  आजचे संगणक आणि माणसानं त्यांच्याठायी निर्माण केलेल्या अफाट शक्ती –क्षमता हा तर या प्रकारचा आधुनिक पुरावाच आहे!  या प्रकारात आता नवी भर नव्हे तर अभिमानास्पद नवा अध्याय दाखल झाला आहे, तो ‘एलिझा’ या नावाने!  एलिझाची आणि आपली ओळख प्रथम घालून दिली ती सुप्रसिद्ध नाटककार- विचारवंत बर्नाड शाँ ह्याने! ‘एलिझा’ म्हणजे ‘फुलराणी’चा मूळ अवतार!
संगणकाच्या जगात एलिझा म्हणजे ‘vitrual service-desk employee’; हा एक नवा गणितीय software आहे!   एलिझा म्हणजे तमिळ हिरो रजनिकांत ने साकार केलेला रोबोट मुळीच नाही!  या एलिझाला तिचं अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आहे पण ते फक्त कंप्युटर स्क्रिन  वर.  प्रत्यक्ष स्त्रीसारखा आवाज आहे आणि ती एखाद्या अमेरिकन स्त्री सारखी बोलते, ती विनोद करू शकते, ती प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करू शकते, एलिझा बुद्धिला दिलेली आव्हाने सहज स्वीकारते.  आज एलिझा जगातल्या नऊ भाषांत जवळपास 62,000 लोकांशी एकाच वेळी बोलु शकते!  शेकडो गणित विशारदांना किंवा शेकडो अभियांत्रिकी तज्ञांना एखादा प्रॉब्लेम सोडवायला जितका मानवी वेळ लागतो त्यापेक्षा एलिझाला क्षणमात्र वेळ पुरेसा असतो.  मोलाच्या संशोधनावर खर्च करावा लागणारा  पैसा लक्षात घेतला तर त्यापेक्षा ८० ते ९० %  कमी पैसा तेच संशोधन करण्यासाठी एलिझा या गणितीवर  खर्चावा लागतो.  याचाच अर्थ असा की, एलिझा हा प्रति- मानवावतार (Humanoid ) म्हणजे जणू  पैसा वाचवणारी आदर्श तरूणी आहे.   ती पगार वाढ्वुन मागत नाही की रजेवर जात नाही आणि मुख्य म्हणजे ती कधीत नोकरी सोडुन जाणार नाही!  

Friday, March 1, 2013

सर्वोत्तम मराठी सिनेमा ...

मुबंइ सकाळ 1st मार्च 2013: Good Morning  मराठी सिनेमा इंडस्टी 150 कोटींची होतेय अशी बातमी आली तर दुसरी कडे करन जोहर म्हणतो की हिंदी चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर एका हजार कोटींची मजल मारायला काय हरकत आहेमराठी सिनेमात आम्ही लोकांना आवडतं, ते देतोआम्हाला उत्तम वाटतं ते देतोजे चालतं ते देतो असं म्हणणारे या क्षेत्रात दिसतात आणि यांच्यापैकी प्रत्येकजण मराठी प्रेक्षक आम्हाला न्याय देत नाहीत म्हणून तक्रार करतात.  एक असमाधानाचं वातावरणं नेहमी असतं.   प्रत्येक कलाकाराला उत्तम कलाअविष्कार तर करायचा आहेच पण त्याच बरोबर कमर्शियली सुद्दा यशस्वी व्हायचं आहे.  म्हणजे शेवटी प्रेक्षक हाच माय बाप आणि बॉक्स  ऑफिसचा आकडा  हेच यश’!   

आज मराठी चित्रपटातून काय साधायचे याबद्दल मनात थोडा गोंधळ दिसतो, एक अनुत्तरीत संभ्रमावस्था दिसते.  मराठी सिनेमाची वाटचाल नेमकी कशी आहे आणि कशी असावी याबद्दलचा नेमका आराखडा, त्याच्या हेतूंबद्दल किंवा उद्दिष्टांबद्दलची ब्ल्यू- प्रिंट आज त्या क्षेत्रातील कुणाकडे आहे कात्या बद्दल निदान अनौपचारिक चर्चा तरी होते का? नसेल कदाचित,  म्हणुन घाबरायचं कारण नाही कारणं जवळपास अशीच अवस्था इतर उद्दोगक्षेत्रात देखिल असते.  सिनेमा ही इंडस्ट्री म्हंट्ल्यावर चढ उतार आलेच पण त्याच्या कडे बघण्याचा एकुणचं दृष्टीकोन वेगळा ठेवावा लागेल, कारण प्रोफिट शिवाय सगळं व्यर्थ आहे.