Friday, March 1, 2013

सर्वोत्तम मराठी सिनेमा ...

मुबंइ सकाळ 1st मार्च 2013: Good Morning  मराठी सिनेमा इंडस्टी 150 कोटींची होतेय अशी बातमी आली तर दुसरी कडे करन जोहर म्हणतो की हिंदी चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर एका हजार कोटींची मजल मारायला काय हरकत आहेमराठी सिनेमात आम्ही लोकांना आवडतं, ते देतोआम्हाला उत्तम वाटतं ते देतोजे चालतं ते देतो असं म्हणणारे या क्षेत्रात दिसतात आणि यांच्यापैकी प्रत्येकजण मराठी प्रेक्षक आम्हाला न्याय देत नाहीत म्हणून तक्रार करतात.  एक असमाधानाचं वातावरणं नेहमी असतं.   प्रत्येक कलाकाराला उत्तम कलाअविष्कार तर करायचा आहेच पण त्याच बरोबर कमर्शियली सुद्दा यशस्वी व्हायचं आहे.  म्हणजे शेवटी प्रेक्षक हाच माय बाप आणि बॉक्स  ऑफिसचा आकडा  हेच यश’!   

आज मराठी चित्रपटातून काय साधायचे याबद्दल मनात थोडा गोंधळ दिसतो, एक अनुत्तरीत संभ्रमावस्था दिसते.  मराठी सिनेमाची वाटचाल नेमकी कशी आहे आणि कशी असावी याबद्दलचा नेमका आराखडा, त्याच्या हेतूंबद्दल किंवा उद्दिष्टांबद्दलची ब्ल्यू- प्रिंट आज त्या क्षेत्रातील कुणाकडे आहे कात्या बद्दल निदान अनौपचारिक चर्चा तरी होते का? नसेल कदाचित,  म्हणुन घाबरायचं कारण नाही कारणं जवळपास अशीच अवस्था इतर उद्दोगक्षेत्रात देखिल असते.  सिनेमा ही इंडस्ट्री म्हंट्ल्यावर चढ उतार आलेच पण त्याच्या कडे बघण्याचा एकुणचं दृष्टीकोन वेगळा ठेवावा लागेल, कारण प्रोफिट शिवाय सगळं व्यर्थ आहे.



सर्वोत्तम मराठी चित्रपट पाहून किती वर्षं लोटली?’, ‘मराठी चित्रपटांची बाजारपेठ नेमकी कोणती?’, ‘तो काळाबरोबर चालतोय का?’, आपण फक्त अनुदानासाठी चित्रपट काढतो का?’ आणि जर मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत श्रीमंत असेल तर त्यांना प्रेक्षक का मिळत नाहीत?’ असे असंख्य प्रश्न गेली किमान ४० वर्षं विचारले जात आहेत.   वर म्हटंल्या प्रमाणे कुठलाही उद्दोगक्षेत्र हा काही काळापर्यंत असाच विस्कळीत असतो.  त्याला दिशा देण्याच काम प्रतिभा असलेली काही मोजकीच माणसं करीत असतात.  भारतीय आयटी क्षेत्राला जस इंफोसिसचे नारायण मुर्ती, टिसीयसचे रामदोराई आणि विप्रोचे अजिम प्रेमजी यांनी एक स्थान मिळवुन दिला.   खरं तर भारतीय चित्रपटाचे जन्मदाते चित्रमहर्षी दादासाहेब फाळके एक अस्स्ल मराठी माणुस पण तरी ही मराठी सिनेमा इतकी वर्ष  का रखडला दादासाहेबांनी आपल्या दूरदृष्टी, उत्तम संकल्पनाशक्ती आणि सर्वोत्तम प्रतिभाशक्ती या गुणांच्या जोरावर भारताला चित्रपटांच्या जागतिक स्तरावर फार मोलाचे स्थान प्राप्त करून दिले.  पण दुर्दैवं अस की दादासाहेबां नंतर बोटावर मोजण्याइतकेच प्रतिभाशाली मराठी माणसं या क्षेत्राला लाभली.  त्या मानाने हिंदीत पुष्कळ दिग्गज निर्माते, दिग्दर्शक व कलाकार झाले आणि त्यांनी हिंदी सिनेमा खरंच मोठा केला.  मी इथं तुलना करण्याचा प्रयत्न मुळीच करणार नाही, कारण हिंदी आणि मराठीची तशी तुलनाच होवू शकत नाही.

आजच्या  मराठी चित्रपटाचे एकूण गणित कला आणि व्यवसाय या दोन्ही पातळ्यांवर चुकते आहे का?  चित्रपटनिर्मिती व्यवसायासाठी करायची की स्वत:च्या आनंदासाठी करायची की केवळ कसलंच उद्दिष्ट न बाळगता करायची याविषयी त्यांच्या मनात घनघोर संभ्रम आहे.   एकुणचं प्रोड्कशन, पब्लिसीटी आणि डिस्ट्रिब्युशनमधे बॉक्स ऑफिस साठी लागणारी व्यावसाईकता – प्रोफेशनॅलिझ्म जी शाहरुख आणि आमिर खान दाखवतो ती आपल्या कडे आल्याशिवाय म्हणावा तस यश मिळणार नाही.  आश्चर्य म्हणजे मराठीतली मंडळी हिंदीत चांगल काम करु शकतात मग मराठीत का नाही
मोठ्या यशासठी मराठी सिनेमा आणि नाट्य व्यवसाईकांनी आऊट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा.  आज माहिती आणि तंज्ञानाच्या युगात मराठीतल्या प्रत्येक कलाकाराने भाषेच्या सर्व भिंत ओलांडुन सर्वप्रथम कमर्शियली यशस्वी व्हायला पाहिजेहिंदी, गुजराती अशा अनेक भाषेत आपली कला साकार केली पाहिजे.  कुठल्याही उद्दोगात मार्केटिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यात नवे प्रयोग करावे लागतील.  नाटक आणि सिनेमाच क्रॉस मार्केटिंग झाल पाहिजे.   नाटक आणि सिनेमाच्या आगोदर किंवा मध्यांतरात आगामी नाटक आणि सिनेमाची जाहिरात दाखवता येतील, तसेच चांगल्या उत्पदनाच्या जाहिराती नाटक आणि सिनेमात मिसळता येतीलसामाजिक आशायच्या कथानकाला त्या त्या क्षेत्रात काम करणार्र्या संस्थांशी जोडता येऊ शकतं.  

दादासाहेबांनी दाखवलेली कालसुसंगत कलादृष्टी, काळाचं आणि भविष्याचं भान व आज लागणारी कमर्शियल दृष्टी जोवर आपण दाखवत नाही तोवर बॉक्स ऑफीस वर हीट होणारा सर्वोत्तम मराठी चित्रपट कसा निर्माण होईल ?
nitinpotdar@yahoo.com  

No comments: