Sunday, June 23, 2013

ऐका पुढल्या हाका...

मुंबई सकाळ  21 जुन 2013 Good Morning:  गेल्या दोन दशकात पोस्टकार्डाची जागा प्राईव्हेट कुरिअर ने घेतली, तारेची जागा फॅक्सने, फॅक्सची जागा ईमेलने,  ईमेलची SMSने, आणि SMSची जागा ट्विट्टर, फेसबुक आणि Whats Appने केंव्हा घेतली आपल्याला कळलचं नाही.  प्रत्येक नविन आविष्कार त्या त्या वेळी नाविण्यपुर्ण आणि खुप उपयुक्त होता आपण लक्षात घेतलं पाहिजे.  

दैनंदिन जीवनात वेळेची बचत करणारी आणि जगाशी जलदगतीने संपर्क साधायला हमखास उपयुक्त ठरणारी अनेक उपकरणे शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी जगाला दिली.    अशा शास्त्रज्ञांमध्ये सॅम्युअल मोर्स या अमेरिकन शास्त्रज्ञाने संदेश जलदगतीने पोहचविण्यासाठी एक संकेतभाषा तयार केली आणि त्यामार्फत कम्युनिकेशनच्या प्रणालीत एक आमूलाग्र क्रांती घडवून आणली.   ज्या काळात दूरध्वनीसेवा अगदी प्राथमिक अवस्थेत होती आणि ती सेवा केवळ ‘निवडक’ लोकांसाठी उपलब्ध होती त्या काळात सॅम्युअल मोर्स यांनी ‘टेलिग्राम’ उर्फ ‘तार’सेवा समाजातील सर्व लोकांसाठी उपलब्ध करून दिली.   रात्रीबेरात्री दार वाजवणारा ‘तारवाला’ हा जणू यमदूतच असल्याची ‘आम आदमी’ची भावना होती,  आजही आहे.  तारेचे अनेक प्रकार असले तरी मध्यरात्रीची तार म्हणजे आप्तांचा मृत्यू यांचे नाते गेली १७५ वर्ष कायम आहे.  आज कम्युनिकेशनच्या तंत्रज्ञानात इतकी विलक्षण प्रगती झाली आहे की आजच्या मध्यमवयीन आणि तरुण वर्गाला ‘तार ऽऽऽ‘ हा शब्द आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या हर्ष-शोकादी भावना यांचा अनुभवच येऊ शकत नाही.    आज १७५ वर्षे उलटल्यावर पोस्टाने ही ‘तारे’वरची कसरत बंद करणे कालानुरूप  जरी योग्य असलं  तरी या तारेने  प्रचंड प्रमाणात लोकसेवा केलेली आहे, हे विसरुन चालणार नाही. 


आज तार बंद झाली उद्या बॅंकाच्या RTGS Money Transfersचे महत्व वाढलं की मनी ऑर्डर्स सुद्दा बंद होईल शेवाटी पोस्ट-ऑफिसचंच  भवित्वय काय असेल?  Necessity is the mother of all inventions’ असं म्हट्लं जात; म्हणुन आज आपल्यला काय हवयं हे आपण पहिले नीट समजुन घेतलं पाहिजे.  जगण्याला उपयुक्त ठरणारी अनेक उपकरणे जशी शास्त्रज्ञांनी जगाला वेळोवेळी दिली त्याच प्रमाणे विविध संस्थानी समाजाची गरज बघुन आपले कार्य आणि स्वरुप बदलुन नव्याने काम केले पाहिजे.  गेल्या दोन द्शकात पोस्टच्या देशाभर पोहोचलेल्या यंत्रणेचा उपयोग पत्र, तार आणि मनीऑर्डर या पेक्षा आणखी काय असु शकतो हा विचारच कुणी केला नाही हे दुर्दैव!  एकीकडे देशाच्या प्रत्येक नागरिकाला बॅंकेची सेवा उपल्बद असली पहिजे म्हणुन RBI खासगी कंपन्यांना नविन बॅंक स्थापन करण्यासाठी परवाना देणार आहे, आणि दुसरी कडे ज्या पोस्टाच्या शाखा प्रत्येक खेडेगावात कित्येक वर्ष कार्यरत आहे त्या पोस्टाची बॅंक का होऊ शकत नाही हा साधा विचार सुद्दा कुणी करताना दिसत नाही.  
जी गत आज तारेची आहे ती उद्या एकुणच पोस्ट-ऑफिसची होवु आहे, आणि तीच गत आपल्याकडे असलेल्या जुन्या कित्येक संस्थानांची होउ शकते मग त्या सामाजिक असो वा शैक्षणिक, सरकारी असो वा खासगी.  कालच बारावी आणि दहावीचे निकाल लागलेले आहेत.  जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण यांच्या रेट्यात आपल्या मुलांना सिद्द करायला मोठ्या स्वप्नां बरोबर नविन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.  म्हणुन काळानुसार बदल करणे,  हे प्रत्येक शैक्षणिक आणि सहशैक्षणिक संस्थेची गरज नव्हे कर्तव्यच आहे.  आज अनेक शाळांच्या सुधारणा आणि प्रगतीच्या कल्पना म्हणजे शाळेचा स्व-मालकीचा (बॅंकेचे कर्ज घेऊन) एसी-हॉल असणे,  तो हॉल लग्नाला आणि इतर समारंभांना भाड्याने देउन बॅंकेचा हप्प्ता फेडणे.  आपला मुळ उद्देश काय होता आणि आपण आज काय करतोय याच भान किती संस्थांना आहे?  पायाभूत संपन्नता आणि पायाभूत गुणवत्ता या दोन भिन्न गोष्टी आहेत याची त्यांना जणू जाणीवच नसते.  अशांची ‘तार’ कापली जाणेच उत्तम!
... नाहीतरी केशवसुतांनी म्हटलेच आहे की, “ जुने जाऊद्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका”! ज्यांना ‘पुढच्या हांका” ऐकायला येत नाहीत त्यांना जगणे कठीणच होणार यात शंकाच नाही.

No comments: