Friday, July 5, 2013

संघटित व्हा; मोठे व्हा...

मुंबई सकाळ  5 जुलै 2013 Good Morning:   पुण्याच्या काही मराठी बांधकाम व्यावसायिकांनी 2001 साली एकत्र येऊन “मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन” (MBVA) स्थापन केली – त्यांच उद्दिष्ट मराठी बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणुन त्यांचे प्रश्न सोडवणे व एकमेकांच्या सहकार्याने आपला व्यवसाय यशस्वी करणे हे आहे.  MBVAने आयोजित केलेल्या एज कॉन नॉलेज मॅनेजमेंट 2013च्या शानदार परिषदेत मला विजन 2020 या विषयांवर मार्गदर्शन करायला आमंत्रित केल होतं.  Amby Valley मध्ये दोन दिवस ही परिषद अगदी एखाद्या मोठ्या मल्टिनॅशंनल कंपनी किंवा दिल्ली मुंबईत होणार्या परिषदांसारखी भव्य,  देखणी आणि प्रोफेशनली आयोजित केल्या बद्द्ल त्यांच्या पदाधिकार्र्यांचे अभिनंदन.  परिषदेची मांडणी, निवडलेले विषय, प्रेझेंटेशंस, प्रत्येक विषयांवर मुक्त चर्चा आणि प्रश्न उत्तरांमुळे परिषद नक्कीच यशस्वी म्हणावी लागेल.  या परिषदेत तरूणांचा सहभाग मोठा होता हे विशेष.  गेल्या वर्षी दादरच्या मराठी व्यावसायिक उद्दोजक व्यापारी मित्रमंडळाचे संमेलन देखिल असचं प्रोफेशनल आणि विचारांनी भरलेलं झालं होतं. हळु हळु इतर उद्दोगात देखिल आपण संघटित होत आहोत आणि हेच मोठं यश आहे.  आज गुजरती मारवाडी, कच्छी आणि सिंधी समाजासारखे इतर मराठी उद्दोजक आणि व्यावसायिक खास करुन आपले तरूण एकत्र येताना दिसतात आणि नुसतचं एकत्र नाही तर एकमेकांना मदतीचा हात ध्यायला पुढे होत आहेत ही फारच आनंदाची गोष्ट आहे.  आज जागतिकीकरणामुळे येणार्र्या देशी आणि विदेशी स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्यायच असेल तर संघटित होण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही हे आपण लक्षात घेतल पाहिजे. 

'जितो' ही जैन उद्दोजकांची संघटना, त्यांच्या संघटनेत त्यांनी जगभरातील जैन लोकांना एकत्र करुन खुपच चांगल काम केलं आहे.  त्यात विशेष म्हणजे अशा संघटना त्यांचा गरजु उद्दोजकांना पैशाची मदत करायला पुढे असतात.  अलिकडे इंफोसिसचे व्हाईस चेअरमन क्रिस गोपालक्रिशनने केरळाच्या मल्याळी तरूणांनी उद्दोजक व्हावं म्हणुन एक ऐंजल फंडची स्थापन केला.  मराठी समाजात अजुनतरी हवी तशी पैशाची ताकत आपण आपल्या होतकरु उद्दोजकांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी उभी करु शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. पण निराश होण्याचं कारण नाही.  इथं  मला  दोन गोष्टी नमुद करायला पाहिजे.  भाषेच्या आधारावर संघटित होणं म्हणजे संकुचीतपणा असं आपल्याला उगीच वाटतं असत आणि आपण अजुनही एकत्र यायला कारण नसताना घाबरतो.  मला वाटतं भाषेच्या किंवा प्रांताच्या आधारावर संघटित होणे म्हणजे संकुचीतपणा हा विचार आपल्याला सोडावा लागेल.  दुसरं आपण संघटित होतो म्हणजे इतरांच नुकसान करतो ही अपराधीपणाची भावना मनात बळगण्याचं काही कारणं नाही.  आज जगभरातील प्रत्येक उद्दोजक मग ते अमेरिकन असो वा जपानी, वेगवेगळ्या प्लॅफॉर्मवर एकत्र येतात, मिळेल त्या मार्गाने लॉबिंग करीत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. 
गेल्या काही वर्षात मराठी व्यावसायिक आणि उद्दोजक मग ते उत्पादन करणारे असोत, बांधकाम व्यावसायिक असोत की सर्विस सेकटर मधले, आज प्रत्येकाला त्यांच्या उद्दोगात आणि व्यवसायात खर्र्या अर्थाने मोठं व्यायचं आहे! त्यात तरूण उद्दोजकांची संख्या मोठी आहे.  ते शिकायला तयार आहेत, कष्ट करायला तयार आहेत पण त्यांना हमखास यश मिळवायच आहे!  जो पर्यंत आपण एकत्र येणार नाहीत आपल्या उद्दोगात आपल्याला भेडसावणारे प्रश्न आपण सोडवणार नाहीत आपण पुढे जाऊ शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरज आहे ती विश्वासाने एकत्र येण्याची!  आज कुणाकडे चांगल उत्पादन आहे तर कुणाकडे ब्रॅण्ड, कुणाकडे चांगले पैसे आहेत तर कुणाकडे मनुष्यबळ, एकत्र आल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय त्याच रुपांतर मोठ्या उर्जेत होणार नाही.  विविध प्रश्नांवर, विषयांवर विचारांची मनापासुन देवाण घेवाण पाहिजे.  जागतिकीकरणं आणि माहिती आणि तंज्ञानाच्या युगात जीवधेणी स्पर्धा अधिक जीवघेणी होत जाणार आहे.. याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. 
nitinpotdar@yahoo.com

No comments: