Monday, November 4, 2013

दिवाळी 2013 - Let's Accept Change!

4 नोव्हेंबर 2013:  मित्रांनो खुप महिन्यांनी ब्लॉग लिहायला घेतला आहे....  हल्ली खरचं वेळ मिळतं नाही म्हणून निदान फेसबुक वरुन इमेजेस सकट मेसेजेस पाठवत असतो. दुधाची तहान ताकावर!  काल पासुन सुरु झालेली दिवाळी! नेहमी प्रमाणे यंदाही भरपुर दिवाळी ई-ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा पाठवल्या, काहींना न चुकता फोन केले,  टिव्ही वर काही खास कार्यक्रम पाहिले आणि ठरवलं आज हा ब्लॉग़ लिहायचाच. विषय तसा म्हटंल तर साधा आहे आणि म्हटंल तर  गंभीर!दिवाळी निमित्ताने टेलिव्हिजनच्या विविध चॅनेल्सावर आलेला जवळ पास प्रत्येक सेलिब्रेटी आमच्या वेळी आम्ही दिवाळी कशी साध्यापणाने साजरी केली ह्याच वर्णन करीत आहेत.   हे सांगत असताना ते पुर्वी रहात असलेली चाळ संकृती, त्यात एकाच प्रकारचे कंदिल बनवण्यासाठी घेतलेली मेहनत,  नविन कपड्यांकरीता टेलर कडे मारलेल्या चकरादिवाळीचा अभ्यास! काहींनी सांगितले की आम्ही चकली चिवडा अनारसे लाडू  असले प्रकार खात असू; CCD, Starbucks आणि Barista हे कल्चर तेंव्हा नव्हतं.  काही सेलिब्रेटींनी आजच्या मोबाईल फोन्स व आयपॅड्सट्विटरफेसबुक,   मॉल-मल्टिप्लेक्स वर टीका केली.  आम्हाला आई-बाबा-दादा-ताई-आजी-आजोबा अशां लोकांबरोबर गप्पा मारायला आणि मजा करायला खूप खूप वेळ होता... शेवटी सांगायचा मुद्दा हा की आताच्या पिढीला कुणाशीही बोलायला सुद्दा वेळ नसतो.  काय तर म्हणे करिअर, आणि करिअर साठी जीवघेणी स्पर्धा! काय होणार ह्या पिढीचं काही समजतं नाही. काळजी वाटते बसं इतकचं! अस सांगुन तरूण पिढीवर अविश्वास दाखवुन मोकळे...

माझा जन्म 1963 सालचा म्हणजे साधारणं माझी पिढी आणि माझ्या आधीची एक पिढी जी आज पन्नाशीपुढे आहे त्यांच हे मत आहे.   मित्रांनो आज मला इथं थोडा वेगळा विचार मांडायचा आहे म्हणून हे माझं Tweet…   मला असं वाटत माझ्या आधीच्या पिढीच माझ्या पिढी बद्दल सुद्दा हेच मत होतं.  नाही का?   मला क्रिकेटचं खूप वेड होतं. मला आठवत 1972 किंवा 1974 साली गोष्ट असेल तेंव्हा दुरदर्शन वर सहा दिवसांची संपुर्ण टेस्ट मॅच दाखवायचे.. चंद्रा, बेदी, प्रसन्ना आणि वेंकट ह्यांच्या फिरकी बरोबर सुनिल गावसकर आणि विश्वनाथंची बॅटिंग म्हणजे काय मजा होती.... तेंव्हा माझे बाबा म्हणायचे की जर सहा सहा दिवस  मुलं टेलिव्हिजन पुढे बसली तर त्यांच पुढे कस होणार?  तेंव्हा दर रविवारी संध्याकाळी एक चित्रपट दुरदर्शन वर दाखवायचे.   माझे  बाबा मला सांगत की महिन्याला
दोनच कित्रपट बघायचे, आणि त्यांच्या तरूणपणी त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे (माझ्या आजीला) फसवुन कसे चित्रपट बघितले हे माझी आजी मला सांगायची.    तेंव्हा बेल-बॉटमची फॅशन होती आणि मझ्या पॅन्टचा मोठा बॉटम बघितला की आजी इतकी हसायची की मला माझीच लाज वाटायची. असं वाटायच की मी काही तरी मोठा गुन्हा केलेला आहे. मित्रांनो हो प्रत्येकाला आपलं लहानपण गोड वाटतं आणि आजच्या पेक्षा कालबरा होता असचं वाटत आलय आणि या पुढेही हे असचं होत रहाणार.  आजच्या तरूण मुलांना मोबाईल्स फेसबुक मॉल मल्टिफ्लेक्स जवळची वाटणार आणि कदाचित उद्या येणार्र्या नविन ग़ोष्टीं त्यांना आवडणार  नाही...
याला एकमेवं कारणं म्हणजे आपण बदलस्विकरतं नाही.   No one accepts change!  मी कुणी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला नाही.  तरी मला वाटतं की जसजसं आपल वय वाढतं आपली नविन शिकण्याची मानसिकता आणि मानसिक-क्षमता ही कमी कमी होत जाते.  तरूणपणी नव-नविन  शिकण्याकडे स्विकारण्याकडे आपला कल असतो कारण तरूणपणी आपल्याकडे उर्जा (Energy) खुप असते;  काही तरी नवीन करण्याचे  मानसिकता असते नव्हे तर ती आपल्या त्या वयाची गरजअसते. आपल्याला आपलं अस्तित्वं निर्माण करायच असतं ते सिद्दं करायच असतंम्हणून आपण एका ध्यासाने पुढे जात जातो. आणि हे प्रत्येक पिढीत होणारच. आपण त्याला थांबवु शकत नाही. 

विजय मर्चंट आणि विजय हजारे नंतर कोण याची चर्चा करीत असताना, लिटिल मास्टर सुनिल गावसकरचा जन्म झाला. गावसकर नंतर कोण ही चर्चा आपली पिढी करीत असतानाच, एक चिमुर्डा सचिन तेंडुलकर आपल्या मेहनतीने स्वत:चं अस्तित्व निर्माण करीत होता...त्याचे फटकेच निराळे होते! आणि ते तसे नसते तर तो मास्टर ब्लास्टर म्हणून  ओळखला गेला नसता...प्रत्येक क्षेत्रात असं घडलेला आपल्या दिसेल!  येणारी पिढी नविन पद्दतीने विचार करणार, वागणार म्हणुन ती वाया गेली किंवा त्यांच काही खरं नाही असं म्हणणं त्यांच्यावर फारच अन्यायकारक होईल.    

रोज उगवणारा सुर्य हा एक नविन आशेचा किरण घेउन येणाराच... हे चक्र आपण थांबवुच शकणार नाही.  रात्रीचा काळाकुट अंधार दुर करीत नवीन सुर्य उगवतोच. आणि त्याच बरोबर तो घेउन येतो नव-नवीन कल्पना,  इच्छा,  आकांशा आणि  उर्जा!   म्हणून माझ्या पिढीला एकच सांगण आहे की बदलहा होणारचं. नवीन पिढी नव-नविन विचार घेउन येणार.  त्यांच चुकत देखिल  असेल,  नव्हे ते कुठेतरी चुकणारचं.  आपण चुकलो होतो तसे!!!!  आपल्या आजोबांनी आणि आई-वडिलांनी आपल्याला क्षमा नसेल  केलेली पण आपण क्षमाशील असू नये का?  चला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर आपल्या पुढच्या पिढीला स्वत:च असं एक नव विश्व उभारायला  मदत करुया... शुभ दिपावली 2013.

No comments: