Sunday, December 7, 2014

कोण करेल जात-धर्ममुक्त भारत? संजय पवार

कोण करेल जात-धर्ममुक्त भारत? 

लेखक - संजय पवार 

कालच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन झाला. त्यांना अभिवादन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून झाली. १९५६ नंतर अखंडपणे भीमसागर ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर बाबांना अभिवादन करायला जमतो. महाराष्ट्रभरातून सर्व वयोगटांतील लोक इथे येतात. पंढरपूरची वारी lok11आणि ६ डिसेंबर यांतलं सातत्य, भक्ती, आत्मिक समाधान व जगण्याची ऊर्जा हे सगळं जवळपास समान आहे. पंढरीत सरकारी महापूजा होते. नव्या सरकारने '६ डिसेंबर'ला सरकारी पुण्यस्मरणात जोडून घेतल्याने याही बाबतीतले साम्य आता झाले.

Thursday, November 6, 2014

उद्योगविकासासाठी निर्धार हवा

महाराष्ट्र टाईम्स दी. ६ नव्हेंबर २०१४ 


उद्योगविकासासाठी निर्धार हवा   .. नितीन पोतदार 


देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा खरी करत महाराष्ट्रात 'विकास' या एका शब्दाचे आश्वासन देत भाजपाने सरकार स्थापन केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या अपेक्षा नव्या मुख्यमंत्रांकडून जरा जास्तच वाढलेल्या आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राज्य आहे असे म्हटले गेले, तरी महाराष्ट्रावर जवळपास सव्वातीन लाख कोटींचे कर्ज आणि कुठल्याही मोठ्या विकासकामासाठी पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे. 

परदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीत महाराष्ट्र जरी पुढे दिसत असला, तरी अजूनही आपली कुठल्याही उद्योगक्षेत्रात जागतिक ओळख तयार झालेली नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एसइझेडला परवानग्या मिळाल्या, पण दुर्दैवाने एकही एसइझेड अजून सुरू झालेले नाही. तसेच एमआयडीसीच्या माध्यमातूनही आपण छोट्या छोट्या उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करू शकलो नाही. 'सहकार क्षेत्र' ही महाराष्ट्राची पहिली ओळख, पण त्याची आज काय अवस्था आहे? आत्महत्या करणारे शेतकरी, कर्जबाजारी सहकारी कारखाने आणि श्रीमंतीत लोळणारे त्यांचे संचालक! मुंबईच्या बॉलिवुडचा बोलबाला आहे, पण जगातला सगळ्यात मोठा रामोजी स्टुडिओ हैदराबादमध्ये साकार झाला आणि आपण आपला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचवू शकलो नाही. बघता बघता साऊथची फिल्मसिटी मुंबईच्या हिंदी सिनेमापुढे निघून गेली, तर आपल्या मराठी सिनेमाला अजूनही नीट श्वास (ऑस्कर वारीला पाठवूनदेखील) घेता आलेला नाही. 

आपण मराठी अस्मिता आणि इतर भावनात्मक विषयात अडकलो आहोत, पण जर उद्योग उभा राहिला, तरच राज्याच्या इतर विकासकामांना गती येईल. त्यासाठी काही निवडक क्षेत्रांत आपली मक्तेदारी उभारावीच लागेल. आज महाराष्ट्रात मिडिया अॅमण्ड एन्टरटेन्मेंट (मुंबई), पर्यटन (कोकण) आणि शिक्षणक्षेत्र (पुणे-नाशिक) यात चांगले काम होऊ शकते. रस्ते, बंदरे व वीज अशा पायाभूत सुविधांसाठी देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला लागणारी अवजड मशिनरींची निर्मिती (नागपूर-चंद्रपूर) विदर्भात होऊ शकते. या क्षेत्रांत होणारी प्रत्येक मोठी गुंतवणूक (देशी किंवा परदेशी) ही महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे असा आपला निर्धार असायला हवा. 

Sunday, September 28, 2014

Unseen Gandhi

Mahatma Gandhi's unseen images & how they are a better way to take him closer to new generations

Economic Times:  Dt. 28th September, 2014 (Sunday)
by: Suman Layak

January 30, 2014, was a particularly sad day at the Gandhi Film Foundation (GFF). The death anniversary of the father of the nation, Mohandas Karamchand Gandhi, is usually a celebration — of his life and his values.

The foundation's new chairman, Nitin Potdar, had taken over in October 2013 and then discovered for himself the treasure trove the GFF was sitting on — five and a half hours of footage on Gandhi. Most of it had hardly ever been seen.

Potdar got the Gandhi Films Foundation staff to prepare a 10-minute short film on Gandhi's death out of the footage and invited schools across Mumbai for a viewing on his death anniversary.

Sunday, August 31, 2014

अच्चुत गोडबोले.. simply genius!

31st ऑगस्त 2014:  तुम्ही अच्युत गोडबोले नावाच्या रसायना विषयी खुप एकलेले
असेल वाचलेल देखिल असेल; मला ही त्यांच्या विषयी खुप कुतुहुल होतं आणि ते नेहमीच रहाणार आहे... एखादी व्यक्ती इतकी मोठी कशी होवु शकते, झपाटल्या सारखं काम कशी करु शकते.. ग्रेट माणसं म्हणजे नेमकी कोणती? त्यांची विचारसरणी कशी असते, त्यांच्यावर प्रभाव कुणाचा असतो, त्यांची ध्येयं कोणती असतात,  ही माणसं कशी घडतात!  या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अच्चुत गोडबोलेंचा - महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज आलेला 'या वळणावर" हा लेखत मिळतील .. जरुर वाचा.... (तुमच्या सोयी साठी खाली देत आहे).


Saturday, July 19, 2014

महाराष्ट्राची धैर्य कन्या! तुला मनापासुन सलाम.

19 जुलै 2014: ज्या हातांनी सुंदर अक्षरं काढलं ते हात गेल्या नंतर देखिल आज ती विश्वासाने उभी आहे! जगाला सामोरे जाताना तिच्या मनाची अवस्था काय असेल याची कल्पना देखिल करवतं नाहीयं. .. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण रडत बसतो, हताश होतो.. त्या प्रत्यकाने मोनिका काय अग्निदिव्यातुन गेली हे पहायलाच हवं!  मला खात्री आहे की मोनिकाचे कृत्रीम हात देखिल जगातल्या लाखो मुलींच्या हातांना बळ  देतील... लाखो मुलींना धीराने जगायला शिकवतील .. इतर जे काम दोन्ही हातांनी करु शकणार नाही ते मोनिका तु हातांशिवाय करशील ..  तुला मनापासुन सलाम!  बाई तु खरचं खुप मोठी आहेस गं! 

मोनिका हॉस्पिटलमधुन घरी आली त्यावर महाराष्ट्र टाईम्सचा रिपोर्ट वाचण्याआधी झी24तास वर डॉ. उदय निर्गुडकरने तिची खास मुलाख्त घेतली, तीला धीर दिला..त्याची सविस्तर क्लिप आपण सगळ्यात आधी बघा.. आणि जास्ति-जास्त लोकांपर्यंत मोनिकाचं धैर्य गेल पाहिजे.. ही विनंती.

Tuesday, July 15, 2014

शिकागो - उद्योजक भिमाशंकर धाके यांचा ओबामांकडून सन्मान

उद्योजक भिमाशंकर धाके यांचा ओबामांकडून सन्मान ..

प्लिमथ, मिशिगन येथील धाके इंडस्ट्रीजला २८ मे २०१४ रोजी, वॉशिंग्टन डीसी येथे एका समारंभात निर्यातींकरिता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ई पुरस्काराने (President' s 'E' Award for Exports) सन्मानित करण्यात आले. या उद्योगाचे अध्वर्यू असलेल्या भीमाशंकर धाके यांची ही यशोगाथा...
अमेरिकन औद्योगिक क्षेत्रात ई पुरस्कार म्हणजे निर्यात व्यवसायातील उद्योजकांचा सर्वोच्च बहुमान म्हणून ओळखला जातो. या वर्षी धाके इंडस्ट्रीजने या पुरस्कारावर आपले नाव कोरले. या पुरस्कार समारंभास राष्ट्राध्यक्ष ओबामांना निमंत्रित केले होते. या यशामधे भीमाशंकर धाके यांच्यासह धाके कुटुंबाच्या दोन पिढ्यांचा सहभाग आहे.

Saturday, July 5, 2014

‘साणंद’ महाराष्ट्राला का जमू शकत नाही? - नितीन पोतदार

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबाबत नितीन पोतदार यांचा सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

फोर्ड मोटर्सचे सीईओ मार्क फील्ड्स यांना दिलेल्या दहा मिनिटांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फोर्ड'पुढे गुजरातच्या साणंदचे रेड कार्पेट अंथरले आणि साणंदला ग्लोबल नकाशावर आणावे, अशी इच्छा व्यक्त केली...जे साणंद आणि गुजरातला जमते, ते महाराष्ट्राला का जमू नये, आपण आपला शक्तिशाली ब्रॅन्ड महाराष्ट्र इतका फिका का ठरविला, असा परखड सवाल कॉर्पोरेट लॉयर व मॅक्सेल फाऊंडेशनचे ट्रस्टी नितीन पोतदार यांनी उपस्थित केला आहे.

अग्रेसर महाराष्ट्र राजकीय उदासीनतेमुळे आपली ग्लोबल ओळख निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरला, अशी टीका पोतदार यांनी केली. महाराष्ट्र सहकार क्षेत्रासाठी प्रसिद्ध, तरी सर्वात चांगला ब्रँड अमूल गुजरातमध्ये तयार झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, हैदराबाद काही माहिती-तंत्रज्ञानाची खाण नव्हते. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांना आमंत्रण दिले व त्याआधी इन्फोसिस, एचपी, इन्टेल, अशा विविध कंपन्यांना पाचारण करून हैदराबादचे आयटी हब बनविले. चेन्नईत तामीळनाडू सरकारने रेनॉ, निस्सान, ह्युंदाई आदी कंपन्यांना आमंत्रण दिले व चेन्नईला ऑटो उद्योगावर स्वार केले. आयटीच्या युगात अमेरिकेतील सॅन्ता क्लॅरा सिलिकॉन व्हॅली बनली, तसे महाराष्ट्राचे ग्लोबल ब्रँड का होऊ शकले नाही, याचा विचार कधीच झाला नाही. 

अलीकडेच मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात पोतदार यांनी मीडिया व मनोरंजन, मॅनेजमेन्ट व संशोधनासाठी उच्च शिक्षण क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडित अवजड उद्योग उत्पादने या तीन क्षेत्रात महाराष्ट्राला स्वतःची ओळख निर्माण करण्यास वाव आहे, असे म्हटले होते. याविषयी पोतदार म्हणाले की, मीडिया-मनोरंजन उद्योगात अॅनिमेशन व गेमिंग या वाढत्या उद्योगाचा समावेश होऊ शकतो. वॉर्नर ब्रदर्स, ट्वेन्टिएथ सेन्चुरी, युनिव्हर्सल अशा ग्लोबल जायन्ट्सना आपण महाराष्ट्राने बोलवावे. महाराष्ट्र ही उच्च शिक्षणाची पंढरी मानली जाते, त्यामुळे हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा अग्रगण्य संस्थांशी सहकार्य करून येथे ग्लोबल मॅनेजर्स किंवा रिसर्च इनोव्हेटर्स घडविण्याच्या संस्था उभारता येतील. येत्या पाच वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात १ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो, मोनो असे प्रकल्प येताहेत. या सर्वांसाठी जेसीबी, अर्थमूव्हर्ससारखी यंत्रणा लागते. विदर्भ आदी भागांमध्ये त्यांची निर्मिती महाराष्ट्राने करावी व इन्फ्रा उद्योगाचा कणा बनावे. या निवडक क्षेत्रात जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास जागतिक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकते, असे पोतदार म्हणाले. 
मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात दाखवलेली 'मॅक्स महाराष्ट्र' या ग्लोबल महाराष्ट्राची  वर उपल्बद आहे.

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स.

Tuesday, June 24, 2014

'मॅक्सेल' समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा पुरस्कार - शरद पवार

मुंबई दिनांक:  20 जुन 2014 :  महाराष्ट्रातील माणसं नको तेवढी चिकित्सक आहेत, काही नवीन करण्याचा प्रयत्न झाला तर शंका घेतल्या जातात. वर्तमात्रपत्रांतून रकानेच्या रकाने लिखाण केले जाते, ही नकारात्मकता घालवण्याची गरज आहे, मॅक्सेल पुरस्कार हा समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले

वरळी येथील नेहरू सेंटर येथे झालेल्या मॅक्सेल फाऊंडेशनच्या मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्ड शुक्रवारी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोल्हापूरचे उद्योजक बापूसाहेब जाधव, केपीआयटीचे रवी पंड‌ित आण‌ि क‌िशोर पाटील, सीमा वैद्य मोदीव्हॅल्यूएबल ग्रुपचे संजय गायकवाड, ग्रामीण शिक्षणासाठी काम करणारे प्रदीप लोखंडे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निर्मला कांदळगावकर,  एमसीईडी महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, औरंगाबाद  आण‌ि अमे‌रिकेतल्या केरा माटकचे अध्यक्ष अशोक जोशी यांचा मॅक्सेल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला की टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणातवावरताना मलाही ती सहन करावी लागलीच, आणि मी ती सहन केली असे पवार म्हणाले.   यावेळी दाभोळ मधील एन्रॉन प्रकल्पाचे उदाहरण देताना पवार म्हणाले की, महाराष्ट्राला विजेची गरज होती. या वीजनिर्म‌ितीसाठी सरकारी तिजोरीतून पैसा जाऊ नये म्हणून एन्रॉन कंपनीशी बोलून दाभोळमध्ये वीज प्रकल्प उभा केला. परंतु, या बाबत दाभोळ प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेचे नौदल भारत पादाक्रांत करण्यासाठी येईल, इथपर्यंत शंकाकुशंका घेण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्प चार वर्ष बंद पडून पुन्हा सुरू झाला. नवे काही स्वीकारले जात नाही याचा अनुभव लवासाच्या माध्यमातून पुन्हा आला. हा प्रकल्प साकारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रचंड विरोध झाला. परंतु, आज या प्रकल्पाला हजारो कुटुंबं भेट देतात. महाराष्ट्रात अशी ३० ठिकाणे आहेत, जिथे असे प्रकल्प साकारता येतील. पण त्यासाठी नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने विकसित करण्यात आलेल्या जीएम बियाणांना विरोध होतो, परंतु, याच बीजांपासून तयार केलेल्या डाळी आण‌ि तेल हजारो कोटी रुपये मोजून आयात केले जातात, असे सांगून त्यांनी या विरोधातला फोलपणा स्पष्ट केला. हवामान, माती, आण‌ि मानवी आरोग्यावर परिणाम करणार नाही, अशा संशोधनाला विरोध होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sunday, May 4, 2014

Maxell Awards 2014

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मॅक्सेल ऍवॉर्ड्स जाहीर

अमेरिकेतील प्रख्यात संशोधक-उदय़ोजक अशोक जोशी यांना जीवनगौरव; परशुराम एस. जाधव, रवि पंडित, किशोर पाटील, सीमा (वैदय़) मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर आणि प्रदीप लोखंडे यांच्या कॉर्पोरेट एक्सलन्सचा उचित गौरव
मुंबई, 1 मे, 2014, पायाभूत सुविधा, दूरदर्शी नेतृत्व, उदय़ोगाभिमुख आर्थिक धोरणे आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील उदय़ोगजगतात सदैव आघाडीवर राहिलेला आहे. पण, महाराष्ट्रात कला-क्रीडा-संस्कृतीच्या बरोबरीने आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे सुद्दा आपण गांभिर्याने बघणं आजच्या काळाची  गरज आहे.  उद्द्यचा महाराष्ट्र घडताना आपल्याकडे असलेल्या कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं आपल कर्तव्य नव्हे तर आपली  जवाबदारी आहे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मॅक्सेल ऍवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सची घोषणा आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून करण्यात आली.

Sunday, April 27, 2014

माझं Tweet...समाजकारणाचा प्रकाशमार्ग

sdfhk27 एप्रिल 2014: मागच्या ब्लॉग मध्ये समाजासाठी  नेमकं काय  करायच?  यावर  आलेली  माहिती मी दिली.  अजुनही कित्येकांना समाजासाठी काय करायच हा प्रश्न पडला असेल तर आजच्या प्रहार वृतपत्रात कोलाज मध्ये आलेला हा लेख जरुर वाचावा... लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण खुप भाषणं ऐकली, मुलाखती वाचल्या बघितल्या, चर्चा केल्या, मतदान देखिल केलं असेल तर आता हा लेख जरुर वाचा म्हणजे आपण ज्याला लोकशाही लोकशाही म्हणतो ती नेमकी काय आहे हे सुद्दा आपल्याला कळल पाहिजे.  आपल्या मराठीत ऐक म्हण आहे असत तस नसत म्हणुन जग फसत..  कुणावरही टीका करण्यासाठी हा लेख नाही हे इथं नमुद करतो.

..जास्त लिहित नाही कारण तुम्ही थेट विष्यांवर याव हा माझा प्रयत्न आहे..  प्रहारचे संपादक महेश म्हात्रेंनी हा विषय घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.  

समाजकारणाचा प्रकाशमार्ग

प्रहार :कोलाज - महेश म्हात्रे.

लोकसभा निवडणुकीच्या ९ टप्प्यांपैकी ६वा टप्पा २४ एप्रिल रोजी पार पडला. ७ एप्रिलपासून सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया १२ मे रोजी संपणार आहे. म्हणजे १२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात सरकार निवडण्यासाठी पाच आठवडे लागतात. या सबंध प्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाचे आकडे सध्या बाहेर येत आहेत. ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ या भारतीय थिंक टँकनुसार २०१४च्या निवडणुकीत पाच मिलियन डॉलर्स खर्च झाले आहेत. २००९ मध्ये विविध राजकीय पक्षांनी केलेला प्रचार असो किंवा मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी वापरलेले वेगवेगळे मार्ग असोत, त्या सगळ्या प्रकारापेक्षा वेगळे मार्ग यंदाच्या निवडणुकीत वापरले गेले आणि त्यात पैशाचा झालेला अफाट वापर सर्वच लोकशाहीप्रेमी नागरिकांना विचार करायला लावणारा आहे.
२००९ च्या निवडणुकीत जेवढा खर्च झाला होता, त्याच्या तिप्पट खर्च या निवडणुकीत झाल्याचा अंदाज ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने व्यक्त केला आहे. पाश्चिमात्य देशाप्रमाणे आपल्याकडे सुरू झालेली आक्रमक प्रचारपद्धती, सोशल मीडियाचा वाढता वापर आणि विविध उद्योगसमूहांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोंदवलेला सहभाग, यामुळे प्रचारातील पूर्वीची पारंपरिक पद्धत मोडीस निघालेली दिसली. या पूर्वी निवडणुका म्हणजे गाजणा-या प्रचारसभा, मिरवणुका आणि थेट लोकांपर्यंत जाण्याची प्रथा आता कालबाह्य ठरू पाहत आहे. एका नामवंत इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार सर्वच राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत जाण्यासाठी सर्वच प्रसारमाध्यमांचा वापर केलेला दिसतो. २००९ मध्ये सर्व राजकीय पक्षांचे जाहिरात बजेट ८३ मिलियन डॉलर्स होते. यंदा ते ३०० मिलियन डॉलर्सवर गेले असावे. एकूणच काय तर आपल्या निवडणूक प्रक्रियेत या सगळ्या बदलांमुळे पैशाला जास्त महत्त्व आले आहे. २०१२ मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेवढा खर्च आला होता, त्याच्या खालोखाल खर्च करून आम्ही आमचे मायबाप सरकार निवडणार आहोत.
या निवडणुकीत काही राजकीय पक्षांच्या बाजूने धनिकशाही मोठया प्रमाणात पुढे आल्यामुळे पैशाबरोबरच, दारू, अमली पदार्थ आणि सोने याचा अमाप साठा निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी देशभरातून पकडलेला आहे. २३ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ तारखेपर्यंत देशभरातून ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, एक लाख ३३ हजार लिटर दारू आणि तीन टनहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आपल्या महाराष्ट्रातदेखील तब्बल २५ कोटी रुपयांचा काळा पैसा पकडण्यात आला. गमतीचा भाग म्हणजे हा सारा काळा पैसा आमचा आहे, असे सांगण्याऐवजी तो आमचा नाही, असा आटापिटा सा-या राजकीय पक्षांकडून होताना दिसणे एकूणच लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुणाईचा उत्साह चर्चेत राहिला. या तरुणाईला भुलवण्यासाठी जर दारू आणि अमली पदार्थ वापरले गेले, तर त्याचे दूरगामी परिणाम खूप भयानक होऊ शकतात. एकूणच काय ज्या पद्धतीने आमची निवडणूक प्रक्रिया कार्यरत आहे, ती पद्धत आणि त्यातील पैशाचा खेळ आम्हाला प्रगतिपथावर नेणारा नक्कीच नाही.
जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या देशात सर्वसामान्य माणसांचा विचार केंद्रभागी असावा, असे अपेक्षित होते. परंतु आजवरचा अनुभव असा आहे की, सर्वच क्षेत्रांत सामान्य माणसांचा विचार मागे पडत चालला आहे. आपल्या निवडणुकीत सुधारणा व्हावी यासाठी सर्व स्तरावर चर्चा होत असते. आज आम्ही लोकसभेच्या उमेदवारांसाठी होत असलेल्या पैशाचा चुराडा पाहत आहोत. त्या सभागृहातील अकरा खासदारांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, हे आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिले आहे. विशेष म्हणजे, या लाचखोरीच्या प्रकरणात सर्वपक्षीय खासदार सहभागी झाले असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये सिद्ध झाले होते, मग आपण कोणत्या प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून देतो, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
२००४ च्या १४ व्या लोकसभेत ५४३ पैकी १५२ खासदार कोटय़धीश होते. १५ व्या लोकसभेत त्यांची संख्या ३०० वर गेली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्र्यांची सरासरी संपत्ती साडेसात कोटी असल्याचे ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ या संस्थेने एका अहवालात म्हटले होते. एकूणच काय तर आपल्या गरिबांच्या देशात सत्तेची सूत्रे एकूणच धनाढय वर्गाकडे गेलेली आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे तर या धनिक वर्गाचे प्रतिनिधीच मानले जातात. मोदी आणि त्यांच्या धर्म व धनदांडग्या समर्थकांनी आज राजकारणात जो पैशाचा प्रभाव वाढवला आहे, त्याचा समाजावर मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. आज आम्ही एकीकडे जागतिक महासत्ता होण्याच्या गमजा मारतोय, पण प्रत्यक्षात आमच्या देशातील गरिबीचा विचारच केला जात नाही. ज्या अमेरिकेच्या प्रगतीचा हेवा करतो तेथील नागरीसुविधा, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सरकारी सेवांची बरोबरी करण्याचा साधा विचारही भारतीय राज्यकर्त्यांच्या मनाला शिवत नाही, हे सारे चित्र उद्वेगजनक आहे. स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्य माणसांच्या दु:खाशी एकरूप होणारे महात्मा गांधी बॅरिस्टर असूनही एखाद्या खेडवळ माणसाच्या पोशाखासारखा पंचा नेसायचे. बॅरिस्टर असूनही त्याचा राजकीय जीवनात कधी उल्लेख न करणारे सरदार वल्लभभाई पटेल शेतक-यांप्रमाणे जाडे-भरडे धोतर नेसत असत. अफाट श्रीमंतीत वाढलेले पंडित नेहरू खादीचे सुती कपडे वापरताना दिसायचे. पंतप्रधान असूनही देशातील अर्धपोटी नागरिकांचा विचार करून आठवडयातील एक वेळ न जेवणारे लालबहादूर शास्त्री आम्हाला ठाऊक आहेत आणि म्हणूनच या बदललेल्या काळाची चिंता वाटते.
आजही देशातील गरिबीचे प्रमाण कमी होत नाही. शेजारच्या चीनने १९८१-२०१० या काळात केलेली अफाट प्रगती आपल्या डोळ्यांसमोर आहे. या काळात चीनमधील ९४ टक्के गरिबांचे जीवनमान सुधारले. त्या उलट आपल्याकडे मात्र सुधारणांचा वेग कायम मंदावलेला. गेल्या सात निवडणुकांमध्ये मतदारांनी आघाडी सरकारला दिलेल्या कौलाने हा सगळा गोंधळ झाला असावा, असे तज्ज्ञ सांगतात. १९८९ ते २००९ पर्यंतच्या सर्वच सरकारांमध्ये प्रांतीय पक्षांचे प्राबल्य वाढल्यामुळे राष्ट्रीय ध्येयधोरणांवर कायम परिणाम होत राहिला. पण तरीही कोणत्याच राजकीय पक्षाने व स्वयंसेवी संस्थेने ही बाब मतदारांच्या नजरेसमोर आणली नाही. या निवडणुकीतही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होताना दिसली नाही. सगळीकडे ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणांचाच कहर होता. त्या घोषणांच्या गदारोळात देशातील दु:खी-कष्टी, गोरगरिबांचे प्रश्न मागे पडले. 
जगातील तीन कुपोषित मुलांपैकी एक मुलगा भारतीय असतो. या देशात जन्मणा-या नवजात बाळांपैकी दर तिसरे बाळ मृत्युमुखी पडताना दिसते. या गोष्टीची फारशी चर्चा या निवडणूक प्रचारात होताना दिसली नाही. आपल्या देशातील जवळपास २६ टक्के लोक निरक्षर आहेत. जगाच्या तुलनेत बघाल, तर जगातील एकूण निरक्षरांच्या संख्येपैकी ३७ टक्के निरक्षर एकटय़ा भारतात पाहायला मिळतात. अडाणी लोकांच्या बाबतीत जसे आपल्या देशाचे नाव चर्चेत आहे, तेवढेच माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीतील आपले योगदानही जगप्रसिद्ध आहे. हे दोन ध्रुव साधण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे भारत अब्जाधीशांचा देश म्हणून जगात गाजत असतो, तर दुसरीकडे आमच्या भुकेकंगालांची स्थिती जगाचे लक्ष वेधून घेत असते. जगातील प्रगत देशांत मोटारीपासून मोबाइलपर्यंत विविध वस्तूंच्या आधारे लोकांच्या जीवनमानाची तुलना केली जाते, त्यानुसार पाहिले तर आपल्याकडील ५० टक्क्यांहून अधिक घरात संडास-बाथरूमसकट सोयी-सुविधांचा अभाव दिसतो. युरोपीय देशांमध्ये दर हजार लोकांपैकी ५००पेक्षा जास्त लोकांच्या घरात मोटारकार असते. चीनमध्ये ते प्रमाण ५८ तर आपल्याकडे दर हजारी फक्त १८ जणांकडे कार असलेल्या दिसतात. अगदी युद्धग्रस्त अफगाणिस्तान किंवा सुदानसारख्या देशांतही जास्त लोकांकडे कार असतात. आपण मात्र सर्वच क्षेत्रांत मागासलेले दिसत आहोत आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजाचे हे मागासलेपण दूर करण्यासाठी जे समाजसेवक धपडताहेत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे. 
आजवर आम्ही विदेशातील बिल गेट्स किंवा वॉरन बफे यांच्यासारख्या दानशूर श्रीमंतांच्या कथा ऐकल्या होत्या. आता ‘विप्रो’च्या अझीम प्रेमजी यांच्यामुळे भारतीय कोटयधीशांच्या खजिन्यातील पैसा गरजू लोकांपर्यंत जाण्याची सुचिन्हे निर्माण झाली आहेत. अझीम प्रेमजी यांनी बारा हजार दोनशे कोटींहून अधिक रक्कम ग्रामविकास, आरोग्य, शेती, पर्यावरण आणि समाज विकासासारख्या विविध क्षेत्रांत खर्च केली आहे.  मंदिरे बांधणा-या मठांना देगण्या देणा-या धर्मभोळ्या श्रीमंतांपेक्षा समाजाभिमुख विचार करणा-या श्रीमंतांची आज जास्त गरज आहे. सामाजिक कामासाठी देणगी देणा-या दानशुरांची यादी ‘हुरुन इंडिया फिलान्थ्रॉफी लिस्ट’द्वारे जाहीर होत असते. गतवर्षीच्या यादीत दहा कोटींतून अधिक रुपये सामाजिक कामासाठी दान देणा-या उद्योजकांची नावे प्रसिद्ध झाली होती. त्यात अझीम प्रेमजी यांच्याखालोखाल ‘एचसीएल’ ग्रुपचे शीव नाडर यांचा नंबर लागतो. त्यांनी आपल्या ‘शीव नाडर फाउंडेशन’च्या माध्यमातून तीन हजार कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बदलून गेले आहे. उद्योजक जी. एम. राव हे दानशूरतेच्या यादीत तिस-या क्रमांकावर, तर दक्षिण बंगळूरुतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले नंदन निलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी पाचशे तीस कोटी रुपये विविध कामांसाठी खर्च करून समाजष्टऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजभान असलेला उद्यमशील विचारवंत ज्याने ‘आधार’च्या माध्यमातून भारतीय व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न केला असे निलेकणी यांच्यासारखे लोक राजकारणात येत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आज स्वत:च्या विश्वात रंगलेल्या आम्ही लोकांनी आमच्या अवतीभवतीच्या दु:खी आणि वंचितांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. अन्यथा हा सर्वच क्षेत्रांत मागे राहणारा दुबळा वर्ग कोणत्याही क्षणी बंड करून उठेल आणि ते होणे कोणाच्याच फायद्याचे नसेल, फार दूर कशाला जायचे आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली-चंद्रपूर परिसरातील वाढत्या नक्षल कारवाया बघा. आजवर जंगलापुरत्या सीमित असलेल्या या हिंसक कारवाया आता पुणे-मुंबई आणि डोंबिवलीत येऊ घातल्या आहेत, तरीही आम्हाला समाजातील गोरगरिबांचे आपण काही देणे लागतो असे वाटत नाही, म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक काम करणा-या निरलस आणि सेवाभावी कार्यकर्त्यांकडे सर्वच समाजाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
सुमारे सात दशकांपासून सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या ‘आनंद’वनाचा परिचय नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी आमटे दाम्पत्याने आपल्या आयुष्याचा होम केला. अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या बाबांनी वैयक्तिक सुख आणि स्वार्थाला तिलांजली देऊन झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांना नवजीवन दिले. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. 
prakash amte & familyपु. ल. देशपांडे यांच्यापासून नाना पाटेकर यांच्यापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांतील लोकांनी बाबांच्या या समाजकार्यात आर्थिक योगदान दिले. अगदी कोणताही गाजावाजा न करता. पुलं किंवा नाना यांच्याप्रमाणे अनेक लोक आनंदवनाशी जोडलेले आहेत. बाबांचे सुपुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश हे आपल्या संपूर्ण परिवारासह हा समाजसेवेचा यज्ञ धगधगता राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आनंदवनात डॉ. विकासदादांबरोबर त्यांची पत्नी डॉ. भारती, चिरंजीव कौस्तुभ, त्यांची पत्नी पल्लवी यांच्यासह सर्व सहकारी बाबांचे काम पुढे नेण्यासाठी झटत आहेत. तर तिकडे गडचिरोलीच्या जंगलात हेमलकसा परिसरात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचे १९७३ साली सुरू झालेले काम आज चार दशकांनंतरही सुरू आहे. आता तर प्रकाशदादांचा मुलगा डॉ. दिगंत, त्याची पत्नी डॉ. अनघा, दुसरा मुलगा अनिकेत, त्याची पत्नी समीक्षा हे सारे या सामाजिक कार्यात उतरले आहेत. दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजार गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा दिली जाते. 
प्रकाशदादांच्या या संपूर्ण प्रकल्पात जे सेवाकार्य चालते ते लोकांच्या देणग्यांवर, त्यामुळे त्यांच्याकडे येणा-या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा इच्छा असूनही चांगल्या सुविधा देता येत नाहीत. आधीच अंधश्रद्धा, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अभावांनी ज्यांचे आयुष्य ग्रासले आहे, त्या जंगलातील आदिवासींना माणूस म्हणून जगवावे आणि वागवावे असा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण त्यांच्या जवळचा होऊन जातो. तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेलात तर दिसेल, बनियनवर असलेले डॉ. प्रकाश एका वेळी अनेक रुग्णांच्या आजाराची मोठया आस्थेने आणि प्रेमळपणे तपासणी करतात. तिथे येणारे रोगी कसे असतात, याचा शहरातील लोक विचारदेखील करू शकत नाहीत. हिंस्र् श्वापदांच्या हल्ल्यात चेहरा फाडलेला एखादा माणूस असू शकतो, कुणी झाडावरून पडलेला आणि जबर जखमी झालेला तरुण असू शकतो, तर एखादी बाळंतपणात अडलेली बाई असू शकते. आमटे कुटुंबीय दिवस-रात्र त्यांना विनामूल्य सेवा देण्यासाठी झटत असतात. त्यांचे हे काम फक्त दु:खी, कष्टी माणसांपुरते मर्यादित नाही, तर जखमी झाल्यामुळे किंवा जंगलातील बदलत्या भौगोलिक स्थितीमुळे मरणप्राय जीवन जगणा-या पशुपक्ष्यांनाही प्रकाशदादांनी ‘आमटेज अ‍ॅनिमल पार्क’मध्ये अभय दिलेले आहे. हे प्राणी एरव्ही हिंस्त्र वाटत असले, तरी प्रकाशदादांशी असणारी त्यांची सलगी ब-याचदा थक्क करणारी असते. विषारी साप असो किंवा वाघ, सिंह यांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणे किंवा त्यांना लळा लावणे हे कसे शक्य आहे, असे मी प्रकाशदादांना विचारले होते, त्यावर उत्तर न देता प्रकाशदादांनी सर्पगरुडाचा पिंजरा उघडला. ते आत जाताच तो भलामोठा पक्षीराज त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी हात पुढे करताच तो हातावर बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून दादांनी त्याच्याकडे एक क्षण पाहिले आणि हात वर फेकला तसा तो गरुड उंच उडाला. पुन्हा थोडय़ा वेळाने तो येऊन हातावर बसला आणि दादांनी हाताला झटका देताच पंख फडफडवत उडून गेला. त्याच्याकडे स्नेहार्द नजर टाकत प्रकाशदादांनी पिंजरा बंद केला आणि म्हणाले, ‘हा जो सर्प-गरुड आहे याचं वैशिष्टय़ असं आहे की, हातात पंजात आलेली कोणतीही सजीव गोष्ट तो आकाशात घेऊनच उडतो, त्याच्या पंजाची पकड अशी असते की, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सहजासहजी सुटू शकत नाही. तो तुम्हाला इजा करणारच, पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्राणी व पक्षी कोणताही असो त्यांच्या संवेदना खूप तीव्र असतात. त्यांना भलेही नीट दिसणार नाही किंवा ऐकू येणार नाही, पण आपल्या रक्तदाबावरून त्यांना परिस्थितीचा अंदाज येतो. साधारणत: माणसाला जेव्हा राग येतो, तेव्हा त्याचा रक्तदाब वाढतो आणि जेव्हा आपण भयभीत होतो, तेव्हाही रक्तदाब वाढतो. जेव्हा आपल्याला त्या प्राण्याची भीती वाटते तेव्हा ते समजण्याएवढी जाणीव नसल्यामुळे त्याला असे वाटते, समोरचा माणूस आपल्यावर हल्ला करायला आला आणि त्यामुळे तो प्राणी प्रतिहल्ला करायला सिद्ध होतो. सापाचा दंश किंवा बिबटयाचा हल्ला या गोष्टी त्यामुळेच होतात.’ आमटेंचे हे वन्यप्राणीप्रेम आता त्यांच्या नातवंडांतही उतरलेले दिसते. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या कुठल्याही कोप-यात असलात तर ही पशुपक्ष्यांची मांदियाळी कधीच तुम्हाला एकटे सोडत नाही. 
१९७३ मध्ये सुरू झालेले हेमलकसातील हे काम आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तेथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवरेपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे, ज्या इमारतीने आजवर लक्षावधी आदिवासी रुग्णांना उपचार दिले ती नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. निवडणुकीच्या या सगळ्या गदारोळात तीस हजार कोटींचा चुराडा होतो, पण डॉ. प्रकाश आणि विकास यांच्या समाजकार्यासाठी पाच कोटी जमवताना दमछाक होते, ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. दिल्लीत ‘नमो’ येवो किंवा ‘रागा’, जो कोणी समाजातील स्थिती बदलेल, त्याला अवघा देश साथ देईल.
ऑनलाइन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येईल.
S. B. Account Name : Maharogi Sewa Samiti, Warora
S. B. Account No. : 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch)
IFSC : MAHB0001108
पत्ता : लोक बिरादरी प्रकल्प, मु. : हेमलकसा, तालुका-पोस्ट : भामरागड, जिल्हा : गडचिरोली, पिनकोड : ४४०७१०. महाराष्ट्र.
सौजन्य प्रहार आणि लेखक संपादक महेश म्हात्रे.

Sunday, March 30, 2014

माझं Tweet...समाजासाठी नेमकं काय करायचं?


 31 मार्च 2014:  उद्या गुढीपाडवा... साडे-तीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त.  काहीतरी चांगल काम करायचा हा शुभ दिवस... मला कित्येक लोक भेटतात आणि नेहमी एक हमखास सांगतात की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायची खुप इच्छा आहे, पण नेमकं काय करावं हेच सामजत नाही.   कुणाला पैसे द्याव म्हटंल तर चांगल्या संस्था नाहीत सगळीकडे भ्रष्टाचार?  आणि आपण काही करावयाच म्हटंल तर रोजच्या कामातुन सवडचं मिळत नाही.  काही सुचतच नाही.   मित्रांनो मला ईथं टीकेचा सुर लावयचा नाहीय.  आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली खरचं खुप दमछाक होते, आणि रोजच्या रामरगाड्यात निवांत मिळतच नाही.  बरं आपल्या समाजात काही करायचं म्हटंल की त्याच कौतुक सोडा, साधी चर्चा सुद्दा कुणी सहसा करायला तयार नसतो. आगदी घरातले सुद्दा? असो.

समाजासाठी काहीतरी करावसं वाटतं अशा लोकांनी या आठवड्याचा लोकप्रभेचा अंक जरुर वाचावा.  जाऊदे तुमचा त्रास कमी करतो आणि, जास्त काही लिहिण्यापेक्षा लोकप्रभेची मुख्यस्टोरीच खाली देतो.  लोकप्रभेने मोठं काम केल आहे.  त्यांचे  खास धन्यवाद.   निदान गुढीपाडव्याच्या या शुभदिवशी आपण लोकांनी काय केलय त्याच तोंडभरुन कौतुक करुया... आणि हो जमलं तर त्यांना मदत करुया, आणि त्यांच्या सारखं काही तरी आपणही करुया ...

देण्यातला आनंद...
सौजन्य लोकप्रभा.

Social worker
"समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवाव्रतींना 'लोकप्रभा'चा मानाचा मुजरा...

वाचन संस्कृतीचा प्रसार
वाचन संस्कृतीचा प्रसार करायचा असेल तर त्याचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या वाचनालयांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे, या विचाराने प्रेरित होऊन बदलापूरच्या श्याम जोशी यांनी सर्वस्व पणाला लावून त्यांच्या स्वप्नातील ग्रंथालय उभारले. कल्याणच्या ज्ञानमंदिर शाळेत चित्रकला शिक्षक असणाऱ्या श्याम जोशींना वाङ्मयाची गोडी त्यांच्या वडिलांनी लावली. त्यांच्या वडिलांचा दहा हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर वाचनालयाच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारावे या हेतूने श्याम जोशींनी बदलापूर स्थानकाजवळ दहा वर्षांपूर्वी जागा विकत घेऊन 'ग्रंथसखा' वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी त्यांनी त्यांचा दोन हजार चौरस फुटांचा बंगला नऊ लाख रुपयांना विकला. घरातील सर्व पुस्तके ग्रंथालयात ठेवली. आणखी १५ हजार पुस्तके त्यांनी विकत घेतली. त्यानंतर ते स्वत: भाडय़ाच्या घरात राहू लागले. फर्निचर तसेच इतर खर्चासाठी आणखी पैसे हवे होते. त्यामुळे २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून पीएफ आणि ग्रॅच्युइटीपोटी मिळालेले साडेसहा लाख रुपयेसुद्धा त्यांनी ग्रंथसखासाठी खर्च केले.

उद्याच्या गुढी पाडव्यापासून 'ग्रंथसखा' एक स्वायत्त विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे. आधुनिक काळातील नव्या संकल्पनांना सुयोग्य मराठी प्रतिशब्द सुचविणे, ते मराठी जनमानसात रुजविणे, मराठी भाषेतील घुसखोरी बंद करणे, मराठी भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन घडविणारी दुर्मीळ पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देणे, नियमित प्रशिक्षण कार्यशाळा, पुस्तक पर्यटन आदी उपक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

आता 'ग्रंथसखा'चे वातानुकूलित अभ्यास दालन असून तिथे वाचकांना संदर्भासाठी पुस्तके दिली जातात. तसेच सहा संशोधकांच्या निवासाची सोयही येथे आहे. अभ्यासकांना येथे जास्तीत जास्त तीन दिवस राहता येते. त्यांच्यासाठी इंटरनेट तसेच झेरॉक्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतेक वाचकांना आवडणारी ललित, कथा, कादंबरी आदी वाङ्मयसंपदा ग्रंथसखामध्ये विपुल प्रमाणात आहेच, शिवाय तब्बल एक लाखांहून अधिक विविध विषयांची माहितीपर पुस्तकेही आहेत. त्याच जोडीने श्याम जोशी यांनी विश्वसखा प्रकाशन संस्था सुरू केली आहे. मराठी भाषेतील महत्त्वाच्या सर्व लेखकांची समग्र लेखन सूची तयार करण्याचे कामही 'ग्रंथसखा' करीत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा मदत न घेता केवळ लोकवर्गणीच्या आधारे श्याम जोशी यांनी बदलापूरमध्ये आशिया खंडातील पहिले भाषा संग्रहालय उभारले आहे. ज्ञान आणि रंजन यांची योग्य सांगड घालून वाचन संस्कृतीचा अतिशय चांगल्या रीतीने प्रसार करता येतो, हे श्याम जोशी यांनी 'ग्रंथसखा'द्वारे दाखवून दिले आहे.

कागदी पिशव्यांचं प्रशिक्षण

पुण्यातली कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांचं महत्त्व खूपच वाढलं आहे. मुळात, कागदी पिशव्या हा कॅरिबॅगला उत्तम आणि भक्कम पर्याय आहे हे किती तरी मंडळी पूर्वीपासून सांगत होती. सुरेंद्र श्रॉफ हेही त्यापैकीच एक. एक प्रथितयश उद्योजक ही त्यांची ओळख असली, तरी कागदी पिशव्यांच्या प्रचारासाठी गेली दहा-पंधरा र्वष तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या मदतीने सुरू केलेल्या कागदी पिशव्यांचा प्रचार, प्रसार एवढय़ावरच श्रॉफ थांबलेले नाहीत, तर कागदी पिशव्या कशा तयार करायच्या याचं शास्त्र आणि प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रमही त्यांनी विकसित केला आहे.

पर्यावरणाचं रक्षण, प्लॅस्टिकवर नियंत्रण, कागदाचा पुनर्वापर, पर्यावरणाला हातभार आणि गरजूंना रोजगार असे अनेक फायदे श्रॉफ यांच्या या प्रयोगात आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो वर्गामधून हजारो महिलांना, युवकांना आणि गरजूंना कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी ते कोणतंही शुल्क आकारत नाहीत. उलट, प्रशिक्षणार्थीना आवश्यक असलेलं कात्री, पट्टी, डिंक वगैरे साहित्य तेच स्वखर्चाने देतात. अवघ्या अडीच-तीन तासांचं हे प्रशिक्षण असतं. कागदी कॅरिबॅगचा वापर वाढवायचा आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळवून द्यायचा या ध्यासातून श्रॉफ यांचे हे काम सुरू आहे. रद्दी कागदांना साध्या घडय़ा घालून तयार केल्या जाणाऱ्या या पिशव्या पंधरा किलोपर्यंतचं वजन सहज पेलू शकतात आणि त्यांचा दरही अगदी माफक असतो. घरबसल्या रोज शे-दोनशे रुपये मिळवून देणारा रोजगार या शिक्षणातून पुण्यातील शेकडो महिलांना मिळाला आहे. बचत गटातील महिलांसाठीदेखील श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक प्रशिक्षण शिबिरं आणि अनेक गावांमध्ये कार्यशाळा घेतल्या आहेत. श्रॉफ यांच्याकडून शिक्षण घेऊन बचत गटातील महिला कागदी पिशव्या तयार करून त्या दुकानदारांना विकतात. एका माणसानं पिशव्यांच्या प्रशिक्षणाचं दान शेकडो जणांना दिलं आणि त्यातून जे एक मोठं काम उभं राहिलं ते पाहिलं, की आपणही चकित होऊन जातो.

रद्दीतून समाजसेवेचा वटवृक्ष!

गिरगावातील झावबावाडीत राहणारे दीपक नेवासकर हे एका खासगी कंपनीतील नोकरदाऱ वय वर्षे पस्तीस़ दैवाने दिलेले अंशत: अंधत्वाचे व्यंग सोबत घेऊन जगणाऱे मात्र इतरांच्या डोळ्यांना दिसणार नाही ते समाजसेवेचे स्वप्न त्यांनी पाहिल़े घरात जमा होणारी रद्दी अगदी टाकून द्यायला नको म्हणून लोक ती रद्दीवाल्याकडे देतात आणि दोन- पाच रुपये घेतात़ या रद्दीचाच सत्कार्यासाठी उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटू लागल़े त्यानुसार सुरुवातीला त्यांनी चाळीतील शेजारपाजारच्या घरांत फिरून काही रद्दी जमा केली आणि त्यातून येणाऱ्या पैशांतून परिसरातीलच शाळांमध्ये कधी शुद्ध पाण्याचे यंत्र देणे, कधी बसायला बैठक देणे, असे उपक्रम सुरू केल़े

या जिद्दी जिवाची धडपड चाळीतल्या तरण्याबांड मुलांच्या लक्षात आली़ त्यातून विशाल आपटे, आदित्य गोखले, गीता गुरव, गौरी निमकर आदी काही तरुणांच्या पुढाकाराने २००६ साली 'युवा मोरया' ही संघटना जन्माला आली़ सुरुवातीला त्यांनी झावबावाडीतील घरांमध्ये फिरून रद्दी जमा केली़ त्यातून तब्बल चार हजार रुपयांची रक्कम जमा झाली़ हे पैसे जव्हार या आदिवासीबहुल भागातील दुर्गम गावांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्यासाठी खर्च करण्याचे ठरल़े त्यानुसार जव्हारमधील काही गावे निश्चित करून कार्यकर्ते वर्षांतून काही वेळा तिथे जाऊ लागल़े तिथल्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करू लागल़े

आजही 'युवा मोरया' ही नोंदणीकृत संघटना वगैरे नाही़ हा तरुणांचा एक गट आह़े 'रद्दीदान' हा या संघटनेचा पाया आह़े त्या पायावर संघटनेने समाजकार्याचा मनोरा उभा केला आह़े दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हे तरुण कार्यकर्ते घरोघर फिरतात आणि रद्दी जमा करून त्या पैशातून जव्हारमध्ये शैक्षणिक कार्य करतात़ सुरुवातीला १२-१५ असणारी कार्यकर्त्यांची संख्या समीर लेले, विशाल कुलकर्णी, तन्वी पराडकर अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आता ५० वर पोहोचली आह़े त्यामुळे गिरगावातील ३५०, दादरमधील २०-२५ आणि बोरिवलीतील १०० घरांतून या कार्यकर्त्यांना रद्दीदान जमा करता येत़े 'दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी रद्दीदान,' या कार्यक्रमात सुरुवातीपासून आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नाही़ लोकांनाही आता त्यांची सवय झाली आह़े त्यांच्यासाठी घरातील रद्दी, पठ्ठय़ाचे खोके अशा गोष्टी वेगळ्या बांधून ठेवल्या जाऊ लागल्या आहेत़ विशेष म्हणजे या चळवळ्या तरुणांच्या कार्याची माहिती रद्दी विकत घेणाऱ्यालाही झाली आह़े त्यामुळे तोही आता त्यांच्याकडून बाजारभावापेक्षा एक-दोन रुपये अधिक देऊन रद्दी विकत घेऊ लागला आह़े परिणामत: महिन्याकाठी संघटनेकडे १२ ते १५ हजार रुपये जमा होऊ लागले आहेत़

जव्हारमधील मोख्याचा पाडा, कौलाळे, कोगदे आणि जंगलपाडा या गावांमध्ये 'युवा मोरया'चे कार्य सुरू आह़े गावातील शाळांमधील तब्बल ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना वर्षांच्या सुरुवातीला बॅग, वही, अंकलिपीसहित सर्व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येत़े वर्षांतून ६ ते ८ वेळा कार्यकर्ते गावात जातात़ आणि प्रत्येक वेळी काही तरी वेगळा उपक्रम घेऊन जातात़ दिवाळीनिमित्त रांगोळी स्पर्धा, कधी पुस्तक हंडी, कधी मुलांना शिकविण्यासाठी विविध वस्तू, अशा एक ना अनेक गोष्टी युवा मोरया गावांमध्ये करत़े संघटनेने दोन स्थानिक महिलांना हाताशी धरून एक अंगणवाडीही मोख्याचा पाडा या गावात सुरू केली आह़े या अंगणवाडीत विविध प्रकारची खेळणी आणि इतर शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ शैक्षणिक कार्यासोबतच या गावांत होणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांना मनुष्यबळ पुरविण्याचे कामही कार्यकर्ते करतात़ तसेच शबरी सेवा समिती या संस्थेकडून या भागामध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यातही मोरयाचे कार्यकर्ते सहभाग घेतात़ सामूहिक विवाहातील गरीब जोडप्यांच्या नव्या संसारासाठी भांडीकुंडी आणि इतर काही वस्तू प्रायोजकांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देतात़ घरातली अडगळ समजल्या जाणाऱ्या रद्दीच्या पैशांतून आज एका समाजकार्याचा वटवृक्ष बहरू लागला आह़े

सेवाव्रती घडवण्याचा वसा


निवृत्ती हा आयुष्याची संध्याकाळ खुणावणारा कालखंड. निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी अनुभवण्याची हुक्की बहुतेकांना येते. परंतु समाजाप्रती काही तरी करण्याचा ध्यास ध्येयवेडी मंडळी घेतात आणि त्यातूनच रुजते दातृत्वाची चळवळ. चॅरिटी, दान अशा गोंडस शब्दांचे गोडवे न गाता समाजातल्या उपेक्षित मंडळींसाठी काम करण्याचा निर्धार अविनाश कुलकर्णी यांनी केला आणि आज या विचारातून निर्माण झालेली संस्था असंख्य भरकटणाऱ्या पावलांना मार्गदर्शनाचे काम करत आहे. ठाणे जिल्ह्यत शिक्षक म्हणून कार्यरत अविनाश कुलकर्णी माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून २००४मध्ये निवृत्त झाले. मागे वळून बघताना शिक्षण आणि जगणं या दोन परस्परपूरक गोष्टींतला समन्वय हरवल्याची जाणीव त्यांना झाली. लहानपणी कोल्हापूरजवळच्या गारगोटी गावात एपी नाईक या वंचितांना शिक्षण उपलब्ध करणाऱ्या ध्येयव्रतींचे संस्कार आपल्यावर झाल्याचे कुलकर्णी सांगतात. दहावीचा निकाल ८० % लागतो, परंतु नापासाचा शिक्का बसणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे याची जाणीव त्यांना झाली. यामध्ये मुलींची संख्या जास्त होती. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या नापास टॅगमुळे व्यवहार्य जीवनात रोजगाराच्या संधी मिळताना मोठय़ा प्रमाणावर मर्यादा येतात. या मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण-प्रशिक्षण देता येईल का, असा विचार कुलकर्णी यांच्या मनात आला. आणि नर्सिग इन्स्टिटय़ूटसाठी मानद तत्त्वावर काम करताना कुलकर्णी यांच्या विचारांना ठोस दिशा मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची देखभाल अर्थात नर्सिग (पेशंट्स असिस्टंट) क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या निधीतूनच त्यांनी नर्सिग इन्स्टिय़ूटची स्थापना केली. कल्याण ते बदलापूर परिसरातील शाळांतून दहावी नापास मुलांना या उपक्रमाची माहिती दिली. प्रशिक्षणाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची संलग्नता मिळवली. प्रशिक्षणाचे शुल्क आर्थिकदृष्टय़ा मागासांना परवडेल असे ठेवले. पहिल्या वर्षी फक्त पाच जण होते. या मुलांना पाच दिवस प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ऑनजॉब ट्रेनिंग आणि उर्वरित दोन दिवस थिअरी अभ्यास असे स्वरूप होते. स्टायपेंडची व्यवस्था असल्याने या मुलांना कमावण्याची संधी मिळाली. डॉ. परितेकर, डॉ. माहेश्वरी तसेच देवडकर कुटुंबीय अशा समविचारी स्नेह्यंची त्यांना साथ मिळाली. विद्यार्थ्यांची जेमतेम संख्या, निधी उभारणीत येणाऱ्या अडचणी यातूनही त्यांनी हा विचारयज्ञ सुरूच ठेवला. आज दहा वर्षांनंतर संस्थेतून शिकलेले १३८ सेवाव्रती कार्यरत आहेत.

दोनशे जणांना नवी दृष्टी


१९८० साली रीडर्स डायजेस्टमध्ये श्रीलंकेतील नेत्रदान चळवळीवर एक लेख आला होता. लेखातील एका उल्लेखाने श्रीपाद आगाशे यांना मात्र अस्वस्थ केले. श्रीलंका हा देश जगातील तब्बल ३६ देशांना नेत्र पुरवितो. त्या ३६ देशांत भारताचादेखील समावेश होतो. हे वाचल्यानंतर आगाशेंना लाजीरवाणे वाटले. श्रीलंकेसारखा एक छोटासा देश जगाला दृष्टी देऊ शकतो आणि प्रचंड लोकसंख्या असलेला आपला खंडप्राय देश आपल्याच देशातील लोकांची डोळ्याची गरज भागवू शकत नाही ही लाजिरवाणी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आगाशेंनी विचार केला. तेव्हा ते कल्पकम येथे अणू प्रकल्पात काम करत असत. एक दिवसाची रजा टाकून त्यांनी चेन्नई गाठलं. तेथील नेत्रपेढीला भेट दिली. नेत्रदानाची सारी प्रक्रिया समजून घेतली. दुसऱ्या दिवशी कार्यालयाच्या सूचना फलकावर त्यांनी एक सूचना लावली. ऊल्लं३ी ४१ ए८ी२ कार्यालयातील सहकाऱ्यांचा प्रतिसाद वाढत गेला.

१९८१ ला झेरॉक्सची सोय फारशी सोयीस्कर नव्हती. मग मूळ फॉर्म सायक्लोस्टाइल करून वाटायला सुरुवात केली. तेथील दहा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी सुमारे १२०० लोकांचे नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले. सुरुवात तर चांगलीच झाली होती. ठाण्यात आल्यावर त्यांच्या कामाला आणखीनच वेग आला. नेत्रदानावरील आणखीन माहिती जमा केली, तज्ज्ञांची व्याख्याने ऐकली, ठिकठिकाणच्या नेत्रपेढय़ांची माहिती जमा केली. विविध वृत्तपत्र, मासिकं, आकाशवाणी, व्याख्याने असे ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी नेत्रदानाविषयी लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली. लोकांना नेत्रदानाचे अर्ज आणून देणे, भरलेले अर्ज नेत्रपेढीपर्यंत पोहोचवणे, त्यानंतर नेत्रपेढीकडून मिळणारे डोनर कार्ड नेत्रदात्यांपर्यत पोहोचवणे असा कामाचा धडाकाच लावला. सुरुवातीला त्यांनी नेत्रदानाचा अर्ज भरलेल्या सर्वाच्या नोंदी ठेवल्या होत्या. मात्र आता वाढत्या व्यापामुळे त्यांना हे शक्य होत नाही.

आगाशे सांगतात की, ''आपल्याकडे नेत्रदानाविषयी उदासीनता तर आहेच, पण लोकांना जागरुक करण्याची गरज आहे. केवळ अर्ज भरून काम संपत नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी नेत्रपेढीशी संपर्क साधून योग्य वेळेत नेत्र काढले जातील हेदेखील पाहणे गरजेचे असते. अर्ज भरलेला असला तरी जवळच्या नातेवाइकांची परवानगीची कायदेशीर गरज असते.'' तसेच एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला नसेल आणि अशी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याच्या नातेवाइकांची परवानगी असेल तरीदेखील नेत्रदान करता येऊ शकते हे पटविण्यासाठी त्यांनी अनेक वेळा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची भेट घेतली आहे. प्रसंगी मानहानीकारक प्रसंगदेखील सोसले आहेत. तर कधी कधी अशा प्रयत्नांना यश येऊन नेत्रदान झाले आहे.

आज ३३ वर्षे आगाशे नेत्रदानाबद्दल समाजात प्रचार प्रसाराचे काम करत आहेत. जवळपास दोनशेहून अधिक व्याख्याने, सव्वालाख माहिती पत्रकांचे वाटप त्यांनी केले आहे. ही इंग्लिश, मराठी, हिंदी या तीन भाषांत माहितीपत्रकं करून घेतली. त्यांच्या या उद्योगाचे यश आकडय़ात सांगायचे तर आजवर तब्बल ८ हजार लोकांनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत आणि त्यापैकी सुमारे १०० लोकांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान केले आहेत. अर्थात आगाशेंच्या प्रयत्नामुळे आज २०० लोकांना नवी दृष्टी लाभली आहे.

आपल्या देशात किमान तीस लाख लोकांना नेत्ररोपणाची गरज आहे. आपण फक्त १५ हजार लोकांची गरज भागवू शकतो अशी परिस्थिती आहे. श्रीलंकेतून आजही आपल्याकडे दहा हजार नेत्र पुरवले जातात. या आकडेवारीवरूनच या क्षेत्रातल्या आव्हानाची कल्पना येईल.

नाटकाच्या माध्यमातून रुग्णसेवा


कोल्हापुरात राहणारे प्रशांत जोशी हे नाटय़कर्मी गेली २०-२५ वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत. सुरुवातीला त्यांनी व्यावसायिक नाटकं केली, पण त्यात जीव रमेना. एक दिवस त्यांच्या स्वत:च्या हॉटेलाच्या गल्ल्यावर बसलेले असताना हातात एक चिठ्ठी घेऊन एक बाई आली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की या बाईचा नवरा आजारी आहे आणि तिला पैशांची गरज आहे. प्रशांत जोशींनीही तिला थोडेसे पैसे दिले, पण ती निघून गेल्यावर त्यांना असं वाटलं की या बाईची गरज खरी होती कशावरून आणि खरी असेल तर तिला असे सगळ्यांकडून एकदोन रुपये मिळून काय फरक पडणार आहे? मग त्यांनी त्या चिठ्ठीत उल्लेख होता त्या डॉक्टरांना फोन केला. त्या डॉक्टरांकडून समजलं की त्या बाईची गरज खरीच होती. डॉक्टर म्हणाले की मला शक्य तेवढं मी करतो, पण मला मर्यादा आहेत. हे ऐकल्यावर प्रशांत जोशी यांना असं वाटलं की आपण अशा लोकांसाठी नाटकाच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे.

मग त्यांनी २००० साली एका किडनी पेशंटसाठी एका नाटकाचा प्रयोग जाहीर केला. ३७ हजार रुपये जमले. ते त्या रुग्णाच्या उपचारांसाठी वापरले गेले. मग असं करून गरजू रुग्णांना मदत करायची असं त्यांनी ठरवलं. पण दरवेळी लोकांना असं गरजू रुग्णांसाठी दोनेकशे रुपयांचं तिकीट घ्या असं आवाहन करणं त्यांना प्रशस्त वाटेना. मग नाटय़गृहाची क्षमतेऐवढे पास वाटायचे आणि उपस्थितांना गरजू रुग्णांसाठी तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये ऐच्छिक मदत करा असं आवाहन करायचं असा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांचा असा अनुभव आहे की ७०० पास वाटले की साधारण २०० माणसं येतात. पण हजार बाराशेच्या वर रुपये जमत नाहीत. मग ते त्यांच्या इतर कामांमधून मिळालेल्या पैशातून भर घालून पाच हजार रुपये उभे करतात आणि मग ते पैसे गरजू रुग्णांना दिले जातात. मिशन मम्मी डॅडी या एक तासाच्या नाटकाचे या पद्धतीने १४७ प्रयोग झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अशी ३०-३५ नाटकं केली आहेत. दर महिन्याला ते तीन रुग्णांना तरी प्रत्येकी पाचेक हजारांची मदत मिळवून देतात. हे काम करणं आव्हानाचं आहे. कारण मुळात नाटक मोफत करायचं असल्यामुळे त्यात काम करायला कलाकार मिळणं सुरुवातीला खूप जिकिरीचं होतं. नाटक मोफत द्यायला लेखक तयार नसतात. सुरुवातीला उत्साहाने आलेले कलाकार नंतर कंटाळून निघून जातात. त्यांच्या या कामासाठी वेगवेगळे सहकारी आले आणि गेले; पण गोपी वर्णे हे एकच सहकारी आजवर त्यांच्याबरोबर कायम आहेत. याबरोबरच 'एकच प्याला' नाटकाचे प्रयोग करून नवऱ्याच्या दारूचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांना मदत करायची या पातळीवरही सध्या त्यांचं काम सुरू आहे.

वृद्धांसाठी आनंदघर


कोल्हापूरचे शिवाजी पाटोळे पाच महिन्यांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि त्यांच्या आधीच्या आठ भावंडांना त्यांच्या आईने काबाडकष्ट करून वाढवलं. परिस्थितीने फटकारलेल्या अशा लोकांना आपण काही ना काही मदत करायची ही खूणगाठ शिवाजी पाटोळे यांनी मनाशी बांधली. त्यांनी एका गुजराती शाळेत शिपाई म्हणून काम केलं खरं, पण आयुष्यात स्थैर्य आल्यावर त्यांनी आणि त्यांच्या आईने मिळून मातोश्री नावाचा एक वृद्धाश्रम काढला. याच नावाने सरकारचे राज्यभर वृद्धाश्रम आहेत. पण पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमाचा त्या सरकारी वृद्धाश्रमांशी काहीही संबंध नाही. कोणतीही सरकारी मदत न घेता ते आपला वृद्धाश्रम चालवतात. त्यांच्या वृद्धाश्रमात आज जवळजवळ १०० वृद्ध राहतात. त्यात अनाथ, अपंग असे वृद्धही आहेत.

शंभरपैकी पन्नासेकजण आपल्या राहण्या-जेवण्या-खाण्याचा काहाही खर्च देऊ शकत नाहीत. जे देतात तेही साताठशे रुपये देऊ शकतात. पण पाटोळेंना त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. त्यांनी स्वत:च्या दोन एकर जमिनीवर हा वृद्धाश्रम उभारला आहे. त्यांची दरमहा १३ हजारांची पेन्शनही ते याच कामात खर्च करतात. त्यांच्या मालकीच्या घरातून येणारं भाडंरूपी उत्पन्नही याच कामात घालतात. समाजासाठी काहीतरी करू इच्छिणारी काही मंडळी त्यांना आर्थिक मदत करतात, बाकी सगळं त्यांच्या वैयक्तिक बळावरच चालतं. वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी ५० खाटांचं एक हॉस्पिटलही उभं केलं आहे. त्यांची मुलं, सुना आपापली कामं सांभाळून या कामात मदत करतात.

वृद्धांसाठी हक्काचा निवारा

वृद्धापकाळ म्हणजे मानलं तर जिवंतपणीचे मरण अन् मानलं तर सुखाचा काळ. कुटुंबातील सदस्यांची साथ त्यांना किती मिळते, यावर सारं काही अवलंबून असतं. असमर्थ आबालवृद्धांना आधार देणारा हा डोलारा ७ फेब्रुवारी १९९७ ला डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा रामटेके यांनी स्वबळावर नागपुरात उभारला. वृद्धाश्रमापलीकडच्या या संकल्पनेनं आतापर्यंत अनेकांना आधार दिला आहे.
बदलत्या काळात आई, वडील आणि मुलं एवढीच कुटुंबाची व्याख्या, मग अशा वेळी घरातल्या वृद्धांचे काय, असा प्रश्न सहजच पडतो. कित्येकदा या घरातल्या वृद्धांचं आजारपण सांभाळायला त्यांना वेळ नसतो, तर कधी वेळ असला तरीही ती सांभाळण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. अशा सर्व असमर्थ वृद्धांना या विजया परिवार केअर सेंटरमध्ये सामावून घेतलं जातं. बाबा आमटेंच्या आश्रमात गेल्यानंतर डॉ. शशिकांत रामटेके यांनी बाबांपुढे ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नागपुरात परतलेल्या डॉ. रामटेके यांनी ही बाब मनावर घेतली आणि स्वबळावर विजया परिवार केअर सेंटर उभारलं.

या परिवारात सहभागी होणारा सदस्य कधी पाच मिनिटांचा असतो, तर कधी तो अर्धा तास जगणारा असतो. मात्र, या पाच मिनिटांतही त्यांना या सेंटरमधून मिळालेली आपुलकीची वागणूक मृत्यूची वाट सुखद करून देते. एचआयव्ही, टीबी, अल्झायमर, स्किझोफ्रेनिया अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण येथे आणून सोडले जातात. कुणाला रुग्णालयात येणारा खर्च झेपत नाही, तर कुणाला नोकरीमुळे वेळ मिळत नाही, अशी त्यांची कारणे असतात. अशा वेळी त्यांच्या परिवारातील वृद्धांना या ठिकाणी सामावून घेऊन, त्या सर्वाची काळजी इथं घेतली जाते. त्यांना खाऊ घालण्यापासून तर सर्व नैसर्गिक विधी, त्यांची स्वच्छता, त्यांची देखभाल, तपासणी, वेळेवर औषधं देणं ही सर्व काळजी या परिवाराकडून घेतली जाते. डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा या दाम्पत्यांनी स्वत:ला त्यासाठी वाहून घेतलं आहे. आजपर्यंत या दाम्पत्यानं सुमारे २०० हून अधिक वयोवृद्धांची सेवा केली आहे. त्या सर्वासाठी त्यांनी हुडकेश्वर मार्गावर एक छोटेसं घरकुल उभारलं आहे. त्यासाठी त्यांना सरकार वा कुणाकडूनही पैशाची मोठी अपेक्षा नाही, तर स्वबळावर आणि या रुग्णांच्या नातेवाईकांकडून जे मिळेल त्या बळावर या परिवाराचा डोलारा उभा आहे. नागपुरात आज तरी वृद्धांसाठी आणि आजारी व्यक्तींसाठी विजया परिवार केअर सेंटर हक्काचं घर झालं आहे.

दान.. वेळेचं..

'दान' या शब्दाला अनेक शब्द जोडले जाऊ शकतात. विद्यादान, धनदान, गोदान.. अशी अनेक दानं आपल्याला माहिती आहेत. यातल्या प्रत्येक दानाला महत्त्व आहे. मुळात दानाचंच महत्त्व अनन्यसाधारण आहे. वेळेचं दान हेही असंच. त्याचंही मोल फार मोठं आहे आणि कुमुदिनी आठल्ये यांचं काम आपण बघितलं, की वेळेच्या दानाचं महत्त्व मनावर अधिकच ठसतं.

भारतीय हवाई दलातील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाल्यानंतर एक दिवस त्या पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात गेल्या आणि निवाराच्या सर्वेसर्वा असलेल्या निर्मलाताई सोहनी यांना भेटून म्हणाल्या की, मला इथे येऊन काही तरी काम करायचंय. कुठलंही काम चालेल. अगदी जेवण वाढायचंही काम करायला मी तयार आहे. सोहोनी आजी म्हणाल्या, हरकत नाही, मग पंगत वाढायला मदत करा.  या वाक्यातून वैयक्तिक स्वरूपातील एक सेवाकार्य दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालं. वेळेचं दान अशा स्वरूपाचं काम आठल्ये आजी गेली चौदा र्वष अखंडपणे, अगदी एकही दिवस न चुकता अखंडपणे करत आहेत. त्यांचं वय आज त्र्याहत्तर आहे; पण निवारामध्ये जायची वेळ कधीही चुकत नाही. आजी आल्या की, तिथल्या सर्व वृद्धांना अगदी 'आपलं' कोणी तरी आलंय असं वाटतं, कारण आजी फक्त पंगतच वाढत नाहीत, तर पंगतीला बसलेल्या प्रत्येकाशी त्या आपुलकीनं संवाद साधतात, प्रत्येकाचं हवं नको पाहतात. वाढता वाढता गप्पाही मारतात. आग्रहानं पदार्थ खायला लावतात. किती मस्त वास येतोय, घेऊन तर बघा.. असं म्हणत म्हणत भाजी वाढतात. आनंदी वातावरणात मग पंगत रंगते. पंगत झाली, सगळे जण उठले, की आजी परत सर्व आवरून त्यांच्या घरी परततात. आठल्ये आजींचं हे झालं एक काम. याशिवाय वृद्धाश्रमात त्या भजन वर्ग घेतात. सिप्ला केंद्रात जाऊन तिथल्या रुग्णांना हस्तकलेच्या वस्तू तयार करायला शिकवतात. त्यांच्याकडून आकाशकंदील तयार करून घेतात, चित्रं काढून घेतात. आजी म्हणतात, मी फार करत्ये असं नाही, पण आपल्या जाण्यामुळे तिथल्या काही मंडळींना आनंद मिळतोय, ही गोष्ट आपल्यालाच खूप आनंद देते. म्हणून स्वीकारलेल्या या कामात खंड पडू द्यायचा नाही एवढंच मी ठरवलं आहे आणि काम करत राहिले आहे.

आठल्ये आजींचं हे वेळेचं दान एका तपाहून अधिक काळ अगदी निष्ठेनं सुरू आहे आणि म्हणूनच त्याचं मोलही फार मोठं आहे

ज्येष्ठांसाठी आनंदसोहळा


१९७३ मध्ये पदवी घेतल्यावर कायद्याचादेखील शिक्षण घेतलेल्या पुरुषोत्तम चिंधु पवार (पाटील) यांना स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा होती. हाती भांडवल नसतानासुद्धा साधा कांदे बटाटय़ाचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर एक-एक करत वसई मध्ये अन्य अनेक व्यवसायात आपले हातपाय पसरले. पण उद्योगाबरोबर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून त्यांनी १९९३ मध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी संघटना काढली. ज्येष्ठ नागरीकांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर उपाय काढणे, त्यांना एकत्र आणून त्यांच्या सुख-दु:खात समावून जाणे, त्यांनी एकाकी वाटू न देणे यासाठी त्यांनी दर गुरुवारी आपल्या मालकीच्या एक हॉल त्यासाठी विनामुल्य उपलब्ध करून दिला. वर्षांतून तीन चार वेळा ज्येष्ठ नागरीकांना स्वखर्चाने गणेशपुरी येथील आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जाऊ जातात. तेथे गेल्यावर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सोईचे खेळ खेळणे. त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ रहाणे हे ते सातत्याने करीत आले. एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी त्यांनी 'वधु-वर' मेळावापण आयोजित केला होता व वैशिष्ठय़ म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद पण लाभला.

आपल्या व्यवसायाचा वाढलेला व्याप सांभाळून जेवढा वेळ समाजकल्याणासाठी खर्च करता येईल तेवढा करणे हे त्यांचे नित्यांचे होऊन बसले. त्यांची मुलं मोठी झाल्यावर व्यवसाय त्यांच्यावर सोडून ते आपला वेळ ज्येष्ठ नागरीकांसाठी देऊ लागले आहे. त्यासाठी होणारा खर्च ते स्वत: करू लागले.
'देह मुक्ती मिशन' अभियान सुरु करुन त्यामार्फत देहदान व अवयव दानाचा ते प्रचार करतात. आतापर्यंत जवळ-जवळ २०० जणांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ह्य पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. दवाखान्यातील ऑपरेशन किंवा उपचारानंतरही काही काळापुरता काही साधने लागतात व ती विकत आणणे भाग पडते. या वस्तूंचा नंतर काही उपयोग नसतो. हाच भार हलका करण्यासाठी 'होम हॉस्पिटॅलिटी सव्र्हिस'मधून रुग्णासाठी घरी लागणारे साहित्य अनामत रकमेवर स्वखर्चाने विनामूल्य वापरासाठी देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
पुरुषोत्तम पवार यांच्या आजवरच्या या उद्योगाबद्दल विचारले असता ते म्हणतात 'ज्येष्ठांच्या सुख-दु:खात जेवढं जमेल तेवढं समावून जावे आणि त्यांना एकाकी वाटू नये असा प्रयत्न करणे हे माझे उदिष्ट आहे'.

अनोखी दिवाळीदिवाळी पहाट म्हणजे गेल्या काही वर्षांत डोंबिवलीकरांसाठी फडके रोडवरचा जल्लोष असेच समीकरण झाले आहे. मात्र त्याच डोंबिवलीतील काही सुजाण लोक मात्र या फडके रोडवरच्या या गोंधळात रममाण न होता शहराच्या वेशीवरच्या अमेय पालक संघटनेच्या घरकुलात त्यांची दिवाळी पहाट वेगळ्याच अनुभवाने रंगवतात. अमेय पालक संघटनेच्या घरकुलातील गतिमंद मुलांबरोबर सबंध दिवस ते तेथेच व्यतीत करतात. गेली सात र्वष स्वप्निल हळदणकर आणि त्यांचे मित्र एकत्र येऊन ही अनोखी दिवाळी साजरी करत आहेत. तेथील गतिमंद मुलांशी खेळण्यातून मिळणारा आनंद हीच त्यांची दिवाळी असते. सुमारे ५० समविचारी लोकांचा हा ग्रुप दिवाळीनिमित्ताने फराळाचे नेतोच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे असते तब्बल ४००-५०० किलो धान्य, जे तेथील मुलांच्या एक दीड महिन्याची गरज भागवणारे असते. शिवाय चादरी, कपडे अशा अनेक भेटवस्तूंनी या मुलांची दिवाळी साजरी होते.

गेली सात वर्षे नित्यनेमाने अशी दिवाळी साजरी करणारे स्वप्निल हळदणकर सांगतात की, ''आम्हा काही मित्रांना सामाजिक कार्याला मदत करायची इच्छा होती. म्हणून आमच्या सोसायटीतील चार-पाच कुटुंबांनी एकत्र येऊ न धान्य, काही गरजेच्या वस्तू जमा केल्या. त्या गरजूंपर्यंत पोहचाव्यात त्यासाठी आम्ही बदलापूर, जव्हार, मोखाडा परिसरात बरीच शोधाशोध केली. मोखाडय़ात कपडे वाटपदेखील केलं. मात्र त्यातून आम्हाला समाधान मिळत नव्हतं. अमेय पालक संघटनेबद्दल माहिती कळली. आणि गेल्या सात वर्षांपासून आमची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होऊ लागली.''

सुरुवात जरी पाच जणांपासून झाली असली, तरी आज एकमेकांच्या ओळखीने या दात्यांचा ५० जणांचा ग्रुप तयार झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते थेट पैशांच्या स्वरूपात मदत नाही करत. तशी आर्थिक मदत अनेकांना मिळत असते. म्हणूनच आम्ही धान्य आणि वस्तुरूपात मदत करू लागलो. असे स्वप्निल सांगतात. मागील वर्षी कोणी चादरी दिल्या, कोणी सर्व मुलांना कपडे शिवून दिले. यामध्ये केवळ धान्य आणि वस्तूंचे वाटप इतकाच हेतू नसल्यामुळे आमचा संपूर्ण दिवस त्या मुलांबरोबर घरकुलातच जातो. त्यामुळे त्या मुलांना एक वेगळाच आनंद मिळताना दिसतो. किंबहुना हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहणे, हाच आमचा त्या दिवाळीचा खरा आनंद असतो.

त्याचबरोबर स्वप्निल आणखी एक उपक्रम करतात तो म्हणजे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन. दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे त्यांचे जे मित्रमंडळ तयार झालं आहे, ते या कामी त्यांना मदत करते.

सौजन्य लोकप्रभा: