Tuesday, February 4, 2014

माझं Tweet - गांधी फिल्म फौंडेशन

4 फेब्रुवारी 2014:  गेले तिन महिने खुपच म्हणजे खुपच धावपळीचे गेले; इतके की मला माझ्या ब्लॉगकडे बघायला सुद्दा वेळ मिळाला नाही. पण मना सारखं घडलं आणि ते मला आज आनंदाने तुमच्याशी शेअर करायला आवडेल म्हणुन हा हा ब्लॉग.   
महात्मा गांधीवर मी मागे दोन ब्लॉग लिहिलेले आहेत काही images माझ्या कोमेंटसकट मी माझ्या फेसबुक वर देखिल टाकले आहेत.  मला अब्राहम लिंकन, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या विषयी मनापासुन खुप आदर आहे.  All three enjoyed extreme moral authority! त्यातल्या त्यात गांधीजी विषयी मला जास्तच कुतुहुल आणि आदर वाटतो, पण मी ही गोष्ट कधीही इतरांजवळ जास्त कधी बोललो नाही... His simplicity, in terms of thoughts and daily life, was his greatest strength!  His connect with the comman man was real.  


साधारणंपणे सहा महिन्यांआधी माझे मित्र नरेंद्र प्रभु गांधी फिल्म फौंडेशनच्या सुभाष जयकरांना माझ्या कडे घेउन आले; जयकर हे गांधी फिल्म फौंडेशन बरोबर गेली 40 वर्ष काम करीत आहेत. त्यांनी मला गांधी फौंडेशनबद्दलची सविस्तर माहिती सांगितली.  त्यांना मी इतकचं म्हंटल की - Mahatma Gandhiji was relevant prior to independence, but I think he is more relevent now!  we need him today and may be in the next 50 years... to build India. म्हणुन गांधीजींचे विचार आजच्या आणि उद्याच्या पिढी पर्यंत पोहोचले पाहिजे.  ही त्यांची नव्हे तर आपली गरज आहे असं समजुया.  मग गांधी फिल्मसच्या  माध्यमातुन आपण काय करु शकतो याची मी साधारणं रुपरेषा मांडली.  जयकरांशी मग खुप चर्चा केली, बोलणं झालं आणि त्यांनी गांधी फिल्म फौंडेशन मधे मी यावं अशी विनंती केली. 

मी त्यांना इतकचं सांगितल की तुम्ही माझे विचार ऐकले; पण मला तुम्ही काम करु देणार असाल तरच मला फौंडेशनमधे घ्या कारण मला माझ्या मॅक्सेल फौंडेशनमधे अजुन खुप काम करायचं आहे.  मी म्हटंल् जरा स्पष्ट बोलतो - मला उगीच खुर्ची अडवायला बोलावु नका.  माझ्या माहीतीत आशा कित्येक जुन्या चांगल्या संस्था कार्यरत आहेत, पण तिथं काहीच घडतं नाही. कुणालाही काही करावसंच वाटतं नाही. उदासिनता आहे.  मी म्हटंल मला घ्यायच्या आधी आपण चर्चा करुया, एकदा चर्चा संपली की कामं! .....आणि मला सांगायला  आनंद वाटतो की जयकर आणि त्यांच्या इतर ट्र्स्टीजने माझ्यवर पुर्ण विश्वास टाकला,  आणि माझा गांधी फिल्म फौंडेशनचा प्रवास सुरु झाला....आम्ही पहिला कार्यक्रम 29जानेवारी रोजी केला त्याचा काही वृतांत देत आहे... गांधी फौंडेशनची स्थापना, त्यांचे कार्य आणि माझी पुढ्ची वाटचाल याची माहिती त्यात आलेली आहे. खुप काही करायची इच्छा आहे! बघुया..
IBN-Lokmat ने कार्यक्रमाच चांगल कव्हर केलं त्याची क्लिप देत आहे.  त्याच बरोबर महाराष्ट टाईम्स, Mid-Day, Mumbai Mirror, Hindustan Times, लोकमत, मुंबई सकाळ, जन्मभुमी इत्यादी वृतपत्रांनी चांगल्या बातम्या दिल्या.  त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद!

---------------------------------------------------------------------------------------------------------

मणिभवन‌मधील गांधी फिल्म्स एक्झिबिशन सेंटरचे उद्या उद‍्घाटन
मुंबई  दि: 29 जानेवारी 2014. (सौजन्य म.टा).


महात्मा गांधी यांच्या आठवणी जाग्या करणाऱ्या फिल्मफोटो जगभरातून एकत्र करण्याचे ऐतिहासिक कार्य गांधी फिल्म्स फाऊंडेशनने हाती घेतले होते. त्यातून महात्मा गांधी यांच्या जगभरातील चाहत्यांकडून फिल्मचा साठा फाऊंडेशनकडे जमा झाला. स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींशी निगडीत असलेल्या घटनांचा हा चित्रमय खजिना मणिभवन येथे गांधी फिल्म्स एक्झिबिशन सेंटरच्या रुपाने कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. बुधवार२९ जानेवारीला या सेंटरचे वि​धिवत उद‍्घाटन होत आहे.

पुतळे उभारण्यापेक्षा गांधीजींचे विचार त्यांच्या सान्निध्याने पवित्र झालेल्या संस्थांच्या माध्यमातून जपायचा निर्णय पंडित जवाहरलाल नेहरूसरदार पटेल आदी नेत्यांनी गांधी हत्ये नंतर 1949साली घेतला.  गांधी राष्ट्रीय स्मारक निधीच्या माध्यमातून अशा ४८ समित्या आणि संस्थांमध्ये त्यांच्या स्मृती जपण्यात आल्या. गांधी फिल्म्स फाऊंडेशन त्यापैकी एक. जगभरातील चाहत्यांकडे विखुरलेल्या महात्मा गांधी यांच्या स्मृती जमा करण्याच्या उपक्रमात गांधी स्मारक निधीचे उपाध्यक्ष देवदास गांधी यांनी पुढाकार घेतला होता. ज्यांच्याकडे अशा फिल्म आणि फोटो असतीलत्यांनी ते फाऊंडेशनला द्यावेतअसे आवाहन त्यांनी केले. अनेक लोकांनी आनंदाने या आठवणी फाऊंडेशनच्या हवाली केल्या. काही जणांकडून त्या खरेदी करण्यात आल्या. गांधी फिल्म्स कमिटीने या फूटेजच्या आधारे'महात्माही फिल्म बनवली.
जगभरात कोणत्याही राष्ट्रीय नेत्याच्या स्मारकात एक्झिबिशन सेंटरचा समावेश नक्की असतो. परंतु गांधीजींच्या स्मारकात मात्र याचा अभाव होता. ३० जानेवारीला गांधीजींची पुण्यतिथी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाच वाजता राज्यपाल के. शंकरनारायण एक्झिबिशन सेंटरचे उद‍्घाटन करणार आहेत. ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल यावेळी उपस्थित असतील. देशाच्या नव्या पिढीला गांधीजींचा इतिहास कळावापरदेशी पर्यटकांच्या माध्यमातून तो जगभरात पोहोचावाअसा आमचा प्रयत्न आहेअशी माहिती फिल्म्स फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन पोतदार यांनी दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Memorial centre at Mani Bhavan features rare footage.. Mid-Day dt. 1st February, 2014


On the evening of January 29, Mani Bhavan, Gandhiji’s residence in Mumbai from 1917-1934 welcomed its visitors with a red carpet, marigold flowers, traditional kokum drink and Gandhiji’s favourite bhajan, Vaishnav Jana To, being played in the background

The occasion was to mark the Mahatma’s 66th death anniversary with the inauguration of the newly developed Gandhi Films Exhibition Centre. The aim of the exhibition centre is to bring Gandhi to the public, tourists and students. “When we have rare and interesting footage on Gandhi, why should we depend on Richard Attenborough’s movie?

We have material that has been collected since 1948-49, and it’s time we use it. If Gandhi’s teachings were relevant then, they are more so relevant now,” says Nitin Potdar, corporate lawyer and chairperson of the Gandhi Film Foundation.
Impact

Nitin Potdar and Dr Jabbar Patel in the storage room at the Films Exhibition Centre
He continues, “Every memorial centre in the world has an exhibition centre and Mani Bhavan lacked that. These films are one of the best ways to learn about Gandhi’s teachings. I feel visuals are more interesting than books. All the material that we have has been categorically segregated. His thoughts on non-violence, truth and freedom struggles are just some of the categories available. The 300-square-feet centre can seat 25 people and it took only a week to develop it.

(L-R) Governor K Sankarnarayanan, journalist Kumar Ketkar, film director Dr Jabbar Patel, Gandhi Films Foundation director Subhash Jayakar, and Foundation chairperson Nitin PotdarThe Films Centre was inaugurated by K Sankarnarayanan, Governor of Maharashtra. Also present at the event were film director Dr Jabbar Patel, Sr. Journalist Kumar Ketkar, and Director of Gandhi Films Foundation Subhash Jayakar. At the event, the governor said, “The only thing people want nowadays is money. Though we are living in an independent India, we should ask ourselves about our contribution to the society.”

Use - According to Potdar, who was appointed the chairperson of the Film Foundation last month, a lot of film footage tracing important events in Gandhiji’s life were traced by Gandhi’s youngest son, Devdas Gandhi, from around the world. Since then the Foundation acquired a huge collection of films featuring Gandhi, and carefully restored and preserved these clips.

These clips were mainly used by the Films Division, Government of India, Doordarshan, Prasar Bharati, BBC London and other foreign news channels. Other than these clips, the public will have access to movies like Mahatma, Abhishap (film on untouchability), Badsha Khan (story of Sarahad Gandhi), Miracle of Non-Violence (film on surrender of dacoits from Chambal Valley) and Karenge-ya-Marenge (Quit India movement).

Ujwal Nirgudkar, technical director Ujwal Nirgudkar, who deals with the restoration of the films says, “Restoration of a clip can around two-three months. We first chemically test the films as most of them are in 35mm, 16mm or 8mm. The films have to be cleaned and scanned, and then frame by frame restoration takes place. Most of the films on Gandhi are in black and white, and these films can be easily restored, when compared to colour films.”
Future


Subash Jaykar, who has been associated with the foundation for more than 30 years and was felicitated by the governor at the event, says, “Today movie directors, instead of using this live footage for their movies, prefer working with actors. The essence of Gandhi is then lost. I hope now people will use these clips, to convey the life of Gandhi.” Potdar also added, “During the event, Dr Jabbar Patel suggested that we hold a Gandhi film festival. Though it’s too soon for that, we are considering it for the future. Our website, where people can view the clips online, is already under construction.”

No comments: