Saturday, July 19, 2014

महाराष्ट्राची धैर्य कन्या! तुला मनापासुन सलाम.

19 जुलै 2014: ज्या हातांनी सुंदर अक्षरं काढलं ते हात गेल्या नंतर देखिल आज ती विश्वासाने उभी आहे! जगाला सामोरे जाताना तिच्या मनाची अवस्था काय असेल याची कल्पना देखिल करवतं नाहीयं. .. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण रडत बसतो, हताश होतो.. त्या प्रत्यकाने मोनिका काय अग्निदिव्यातुन गेली हे पहायलाच हवं!  मला खात्री आहे की मोनिकाचे कृत्रीम हात देखिल जगातल्या लाखो मुलींच्या हातांना बळ  देतील... लाखो मुलींना धीराने जगायला शिकवतील .. इतर जे काम दोन्ही हातांनी करु शकणार नाही ते मोनिका तु हातांशिवाय करशील ..  तुला मनापासुन सलाम!  बाई तु खरचं खुप मोठी आहेस गं! 

मोनिका हॉस्पिटलमधुन घरी आली त्यावर महाराष्ट्र टाईम्सचा रिपोर्ट वाचण्याआधी झी24तास वर डॉ. उदय निर्गुडकरने तिची खास मुलाख्त घेतली, तीला धीर दिला..त्याची सविस्तर क्लिप आपण सगळ्यात आधी बघा.. आणि जास्ति-जास्त लोकांपर्यंत मोनिकाचं धैर्य गेल पाहिजे.. ही विनंती.


मोनिकाला डीस्चार्ज...

मटा: दिनांक 18 जुलैई: रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्याचा प्रचंड धक्का...मदतीसाठी पुढे आलेले मुंबईकरांचे हात...डॉक्टरांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा...त्यातून मिळालेले कृत्रिम हाताचे वरदान...स्वयंपूर्ण होण्याचे पूर्णत्वाला गेलेले स्वप्न....हा घटनाक्रम मोनिका मोरेच्या नजरेसमोरून सरकत गेला. हॉस्पिटलमधील सहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर पुन्हा घरी जाण्याच्या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू फुलले...पण हसता हसता अचानक डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. सहा महिने रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला होता!

जानेवारी महिन्यात घाटकोपर स्टेशनमध्ये झालेल्या अपघातात १६ वर्षांच्या मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार करून कृत्रिम हात लावण्यात आले. आज, शुक्रवारी मोनिकाला घरी पाठवण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी मोनिकाच्या हाताची अंतिम चाचणी घेण्यात आली. तिने कृत्रिम हातांच्या मदतीने स्वतःचे, हॉस्पिटलच्या डीन, उपचार करणारे डॉक्टर या सर्वांची नावे कागदावर ‌लिहिली. स्वतःच्या हाताने ती पाणी प्यायली. हाताचा वापर करताना चेहऱ्यावरचा आनंद तिला लपवता येत नव्हता. 'एकदम मस्त वाटते,' अशी उस्फूर्त प्रतिक्रिया तिने दिली. 'मला मदत करणाऱ्या सर्व मुंबईकरांचे व डॉक्टरांचे मी आभार मानते. सहा महिन्यांनी मी घरी परतणार आहे,' असे सांगताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला.. 'जबदरस्त इच्छाशक्तीच्या बळावर तू यातून बाहेर पडली आहेस, आता रडू नको,' असे सांगत डॉक्टरांनी तिला सावरले.

गेल्या सहा महिन्यांपासून हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये वावरणाऱ्या मोनिकाने गुरुवारी गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. कृत्रिम हाताच्या बोटांना गुलाबी रंगाचे नेलपेंट लावल्याने ते हातही हुबेहूब वाटत होते.

मोनिकाचे हात वापरण्याचे व लिहिण्याचे प्रशिक्षण पुढेही सुरू राहाणार आहे. हातावर आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावण्यात येणार असून हाताचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे तिच्यावर उपचार करणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रदीप भोसले म्हणाले.

श्रेय डॉक्टरांचे : मोनिकासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख रुपये खर्च केले आहेत. पण हे सर्व डॉक्टरांचे श्रेय आहे. भारतात अशा प्रकारचा कृत्रिम हात लावण्याची ही पहिलीच घटना आहे, अशा शब्दात यावेळी महापौर सुनील प्रभू यांनी 'केईएम'च्या डॉक्टरांचे कौतुक केले.

अशा होतात हाताच्या हालचाली : मोनिकाच्या कृत्रिम हातामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण लावले आहे. बोटाची हालचाल करण्यापूर्वी हाताच्या कोपऱ्यातील स्नायूद्वारे तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. मग मेंदूतून निर्माण होणारा संदेश इलेक्ट्रॉनिक्स सिग्नलद्वारे हातांच्या स्नायूंपर्यंत पोहोचवला जातो. नंतरच बोटाच्या हालचाली होतात, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

No comments: