Saturday, January 31, 2015

कळण्याची दृश्यं वळणे

आपण हौसेने एखाद्या चित्रकला प्रदर्शनाला जातो, चित्रकाराला भेटतो, त्याच्याशी संवाद साधातो, चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो. चित्राच्या नावापासून आपण सुरुवात करतो.  खर तर चित्राचं नाव कळल्याशिवाय आपण पुढे जाउच शकत नाही. नाव बघितल्यावर आपण त्याचे रंग, स्ट्रोकस, रेषा अगदी फ्रामे सुद्धा नीट बारकाईने बघतो.  विचार करतो आणि ते चित्र त्याला दिलेल्या नावास्वरूप आहे का याच आकलन करीत पुढे जातो. मग त्यां चित्राशी चित्रकाराच्या इतर चित्रांशी आपण तुलना करायला लागतो. मग त्यांचे नावं, रंग, स्ट्रोकस ...एक नविन प्रवास सुरु होतो.  

मी चित्रकार नाही म्हणून चित्र कस scientifically बघावं हे मी सांगुं शकणार नाही - मी माझी पद्धत मांडली. 

काल मी JJ Art Gallery मध्ये Michael Ryanny या एका अमेरिकन वयस्कर कलाकाराला त्याच्या paintings विषयी विचारलं तर तो म्हणाला माझ्या paintingsला मी नाव देत नाही.  तुम्हाला जे वाटेल ते द्या... त्याच्या एका paintingमध्ये मी म्हटलं हा सूर्योदय आहे का? तर तो म्हणाला तुम्हाला तो दिसत असेल तर आहे.           

कुठलही चित्र (Painting) कसं बघावं याच छान विषलेष्ण महेंद्र दामलेनी आज लोकसत्ता मध्ये दिलेल आहे ते माझ्या वाचकांसाठी देत आहे. "जेव्हा चित्रं 'कशाचं' आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे? कोणी काढलं? विषय काय? चित्र कशानं रंगवलंय? अर्थ काय? म्हणूनच सांगावं लागतंय! हाताची घडी, तोंडाला कुलूप (बोटाऐवजी) आणि डोळे उघडे ठेवून चित्र फक्त पाहा, डोळे भरून पाहा, अगदी सावकाश, चित्राचा कोपरान्कोपरा पाहा.."  अस ते लिहितात.. 

मला वाटत चित्र कस बघावं याच इतक सुंदर भाष्य कुणी केलेलं नसेल. धन्यवाद.  

कळण्याची दृश्यं वळणे
लेखक महेंद्र दामले - mahendradamle@gmail.com

'हाताची घडी आणि तोंडावर बोट' अशी सूचना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला मिळाली असेल. आपला सतत चालणारा संवाद बंद व्हावा व मन स्थिर व्हावं याकरता ही सूचना दिली जायची, जाते. मोठेपणी मांडी, पद्मासन घालून स्थिर बसा, डोळे हळूहळू मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना योग शिक्षक देतात.. त्यांचाही हेतू हाच. मन स्थिर व्हावं, मनात सतत चालणारा संवाद बंद व्हावा.  कुत्रा, मांजर आदी प्राण्यांचं निरीक्षण करा! ते डोळे मिटून पडून राहिले असले तरीही शेपटी, नाक, कान हलवून सभोवतालचा सतत वेध घेत राहतात.

Saturday, January 24, 2015

भाजून पक्कं झालेलं गाडगं - डॉ. कुमार सप्तर्षी


डॉ. कुमार सप्तर्षीनी लोकसत्ताच्या चतुरंगसाठी दिलेली मुलाखत माझ्या वाचक-मित्रांसाठी देत आहे....माझ्या तरुण मित्रांना आग्रहाची विनंती की त्यांनी हे विचार अगदी मना पासून वाचावे... जास्त काय लिहु !  
   
'मानवी जीवन समाजाशिवाय सिद्ध होत नाही. केवळ व्यक्तिजीवन अशक्य आहे. समाज आवडो वा न आवडो त्याच्या चौकटीतच जगावे लागते. माणसाचे जीवन तसे निर्थक, क्षणभंगूर असले, तरी त्याला सार्थक बनवता येते. माणसाने आपल्या जीवनाचा अर्थ शोधला आणि तीच आपल्या जीवनाला व्यापून टाकणारी शक्ती बनविली, तर आनंदमय जगणे शक्य असते. अन्यथा एकटे जगता येत नाही आणि दुसऱ्याशी पटत नाही ही माणसाची गोची आहे. भरभरून आणि आनंद घेत प्रसन्न जगायचे असेल तर कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल अशा परिस्थितीची कल्पना करावी लागते. मिळमिळीत आणि भिऊन जगण्यापेक्षा सक्रिय व चतन्यमय जगावे असा विचार तरुणपणी मनात येत असे.

वाचनातून, मित्रांबरोबर चर्चा करून 'जात' नावाची कल्पना भंपक आहे हे कळायला लागले. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना एक प्रेत दीड वर्ष रोज डिसेक्शन करावे लागते. एका शरीराची संपूर्ण माहिती घेऊन डॉक्टर दावा करतो की, 'कुठल्याही माणूसप्राण्याचे शरीर मी अंतर्बाह्य़ जाणतो.' याचा अर्थ विश्वात मानवी शरीराची रचना सर्वत्र एकच आहे. जातवार शरीररचना नाही. माझ्यापुढे प्रश्न पडला की, ज्या सत्याचे दर्शन प्रत्यक्षात झाले, तोच आपल्या वैचारिक बठकीचा आधार मानायचा की नाही?

Thursday, January 22, 2015

Open door vs One window

Open door vs One window

The essence of facilitation is in opening doorways of trust

There’s no doubt about the fact that Prime Minister Narendra Modi’s ‘Make in India’ call is the most powerful campaign launched in the post-independence era. This is the first instance of an undeniably precise governmental initiative to elevate India to a privileged position of pride on the global map.  It is reported  that the Modi government is working hard to cut the lead time of business registration in India from 27 days to just one day!  In fact by April 2015  over 200 state & central permits required by different industries are to be issued online.  Modi is keen that India be included in the coveted list of top 50 countries ranked on the World Bank’s ‘Ease of doing business’ Index 2014, which has currently slipped to an embarrassingly low position of 142 .   

The pm’s hotline invitation to  global investors to invest in India is circuitously a clarion call to the Indian business fraternity to enhance its value proposition to meet global benchmarks.   In the same breath, he’s highlighted the need to scrap the long list of obsolete laws that stand in the way of India’s global economic advancement.  In fact, his aspiration is to scrap one law every day! The Law Commission is working towards simplifying compliance requirements for doing business in India including the introduction of self-certification.  More importantly, the cleansing exercise should be extended to the rut of inter-ministerial departmental procedures and processes (informal or formal) – commonly known as ‘red tape’ – that has countless files move from department to department and desk to desk merely collecting layers of dust and opaque notes from secretaries and under secretaries.  We need to create agile and able systems to mitigate the arbitrary decision making.    

Saturday, January 3, 2015

Greetings for 2015

मित्रांनो २०१५साठी सुभेच्छा !