Saturday, March 28, 2015

पेराल ते उगवेल – मार्केटींग ही तीन ‘P' पायांची शर्यत!

Image result for basic marketing strategy२८ मार्च २०१५ :  माझ्या  कंपानीसारखं  उत्पादन आज उभ्या मार्केट मध्ये कुणाचही नाही,   इतरांच्या तुलनेत आमच उत्पादन एकदम परफेक्टआहे; पण अजूनही आमचा टर्नओवर हवा तसा नाही. कदाचित मला हव तसं मार्केटींग मला अजूनही जमलेलं नाही.  खूप प्रयत्न करून बघितले.  मार्केटींग हा फक्त पैशाचा खेळ आहे?  खरी वस्तुस्थिती अशी आहे की जाहिरातींवर हवा तितका पैसा खर्च करण्याची माझी ऐपत नाही.  लहान वावासायिक इथंच मार खातात.  जाहिरातीतर सोडा साध सेल्ससाठी हवी तितकी माणस ठेवू शकत नाही.  त्यांना कमिशन देऊ शकत नाही की जास्त पगार देऊ शकत नाही... मग मार्केटींगला मीच उभा राहतोमर मर कष्ट करतो. ग्राहक तर प्रत्येक वेळी आपली अग्नी परीक्षा बघतात. संयम सुटतो.  पैशाने मार्केटींग आणि मार्केटींग मधून पैसा हे एक दुष्ट चक्र आहे!  तुम्ही उत्पादनात असाल अथवा सर्व्हिस सेक्टर मध्ये, तुमच्या मार्केटींगची ही अस्वस्था आहे का? असेल तरच पुढे वाचा...

मित्रांनो मार्केटींग हा विषय आपण समजतो तितका सोपा राहिलेला नाही.  खरं तर तो कधीच सोपा नव्हता.  याला कारण म्हणजे मार्केटींगहा उत्पादनाइतकाच आपल्या उद्दोगाचा एक मुख्य गाभा आहे हे आपण समजतच नाही.  उत्पादन आणि मार्केटींगया दोन चाकांवर आपल्या उद्दोगाची गाडी धावत असते.

Sunday, March 22, 2015

पेराल ते उगवेल

पेराल ते उगवेल 

२१ मार्च २०१५ :  आज गुढी पाडवा ! नवीन वर्षाचा पहिला दिवस.  नवा उत्साह, नवी दिशा, नवा विचार, नवी उमेद व नव्या संकल्पनेचा दिवस,
एकत्र येण्याचा दिवस, प्रगतीचा दिवस !

गेल्या काही वर्षात मराठी व्यावसायिक आणि उद्दोजक मग ते उत्पादन करणारे असोत, की कुठल्याही सर्विस सेकटर मधले, आज प्रत्येकाला त्यांच्या उद्दोगात आणि व्यवसायात खर्र्या अर्थाने ‘मोठं’ व्यायचं आहे! त्यात तरूण उद्दोजकांची संख्या मोठी आहे.  ते शिकायला तयार आहेत, कष्ट करायला तयार आहेत पण त्यांना हमखास यश मिळवायच आहे!  जो पर्यंत आपण एकत्र येणार नाहीत आपल्या उद्दोगात आपल्याला भेडसावणारे प्रश्न आपण सोडवणार नाहीत आपण पुढे जाऊ शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरज आहे ती विश्वासाने एकत्र येण्याची!

आज कुणाकडे चांगल उत्पादन आहे तर कुणाकडे ब्रॅण्ड, कुणाकडे मार्केटिंग आहे, कुणाकडे थोडं भांडावल तर कुणाकडे मनुष्यबळ, आपण एकत्र आल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय त्याच रुपांतर मोठ्या उर्जेत होणार नाही.  विविध प्रश्नांवर, विषयांवर विचारांची मनापासुन देवाण घेवाण पाहिजे.  जागतिकीकरणं आणि माहिती आणि तंज्ञानाच्या युगात जीवधेणी स्पर्धा अधिक जीवघेणी होत जाणार आहे.. याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.