Sunday, March 22, 2015

पेराल ते उगवेल

पेराल ते उगवेल 

२१ मार्च २०१५ :  आज गुढी पाडवा ! नवीन वर्षाचा पहिला दिवस.  नवा उत्साह, नवी दिशा, नवा विचार, नवी उमेद व नव्या संकल्पनेचा दिवस,
एकत्र येण्याचा दिवस, प्रगतीचा दिवस !

गेल्या काही वर्षात मराठी व्यावसायिक आणि उद्दोजक मग ते उत्पादन करणारे असोत, की कुठल्याही सर्विस सेकटर मधले, आज प्रत्येकाला त्यांच्या उद्दोगात आणि व्यवसायात खर्र्या अर्थाने ‘मोठं’ व्यायचं आहे! त्यात तरूण उद्दोजकांची संख्या मोठी आहे.  ते शिकायला तयार आहेत, कष्ट करायला तयार आहेत पण त्यांना हमखास यश मिळवायच आहे!  जो पर्यंत आपण एकत्र येणार नाहीत आपल्या उद्दोगात आपल्याला भेडसावणारे प्रश्न आपण सोडवणार नाहीत आपण पुढे जाऊ शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गरज आहे ती विश्वासाने एकत्र येण्याची!

आज कुणाकडे चांगल उत्पादन आहे तर कुणाकडे ब्रॅण्ड, कुणाकडे मार्केटिंग आहे, कुणाकडे थोडं भांडावल तर कुणाकडे मनुष्यबळ, आपण एकत्र आल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय त्याच रुपांतर मोठ्या उर्जेत होणार नाही.  विविध प्रश्नांवर, विषयांवर विचारांची मनापासुन देवाण घेवाण पाहिजे.  जागतिकीकरणं आणि माहिती आणि तंज्ञानाच्या युगात जीवधेणी स्पर्धा अधिक जीवघेणी होत जाणार आहे.. याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.इथं  मला  दोन गोष्टी नमुद करायला पाहिजे.  भाषेच्या आधारावर संघटित होणं म्हणजे संकुचीतपणा असं आपल्याला उगीच वाटतं असत आणि आपण अजुनही एकत्र यायला कारण नसताना घाबरतो.  मला वाटतं भाषेच्या किंवा प्रांताच्या आधारावर संघटित होणे म्हणजे ‘संकुचीतपणा’ हा विचार आपल्याला सोडावा लागेल.  दुसरं आपण संघटित होताना इतरांचा द्वेष करता कामा नये.  मुख्य म्हणजे आपण एकत्र येतो म्हणजे इतरांच नुकसान करतो ही अपराधीपणाची भावना मनात बळगण्याचं मुळीच कारणं नाही.  आज जगभरातील प्रत्येक उद्दोजक मग ते अमेरिकन असो वा जपानी, वेगवेगळ्या प्लॅफॉर्मवर एकत्र येतात, मिळेल त्या मार्गाने ‘लॉबिंग’ करीत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

'जितो' ही जैन उद्दोजकांची संघटना, त्यांच्या संघटनेत त्यांनी जगभरातील जैन लोकांना एकत्र करुन खुपच चांगल काम केलं आहे.  त्यात विशेष म्हणजे अशा संघटना त्यांचा गरजु उद्दोजकांना पैशाची मदत करायला पुढे असतात.  अलिकडे इंफोसिसचे व्हाईस चेअरमन क्रिस गोपालक्रिशनने केरळाच्या मल्याळी तरूणांनी उद्दोजक व्हावं म्हणुन एक ऐंजल फंडची स्थापन केला.  मराठी समाजात अजुनतरी हवी तशी पैशाची ताकत आपण आपल्या होतकरु उद्दोजकांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी उभी करु शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. पण निराश होण्याचं कारण नाही... निदान एकत्र येण्याचा विचार तरी आज झाला तरी खूप मिळवलं.. सुरुवातीला किमान मोकळ्या मनाने बोलायला काय हरकत आहे.

काय कराल?  चला काही विचार न करता तुमच्या उद्दोग मित्रांना छानसां प्रोफेशनल इमेल लिहा आणि बोलवा त्यांना तुमच्या ऑ'फिसमध्ये.  काय लिहाल?  लिहा तुमच्या व्यवसायाची थोडक्यात माहिती.  आणि हो दोन मुद्द्यांचा एजेन्डा सुद्दा ठरवा.  चर्चा साधारणपणे एक ते दिड तास झाली पाहिजे.  आणि  हो .. घराच्या, सिनेमा, नाटक, चारोळ्या, जोकस शेअरिंग नको - आपल्या उद्दोगाविषयीच सिरीअस चर्चा झाली पाहिजे, त्यात पुन्हा आपलं रडगाण नको आपण आयुष्यात किती खस्ता खाल्या, किती त्रास भोगला हे सांगायची ही वेळ नव्हे! दोघांचा बिझिनेस कसला आहे, त्यात काय उणीवा आहेत आणि त्यांला पुढे कस न्यायचं आहे याची सखोलं चर्चा झाली पाहिजे.  तुम्ही तुमच्या मित्राला काय मदत करू शकता हे स्वत:हून सांगां आणि व्हा पुढे!  यश तिथंच आहे...  आणि हो पहिल्या भेटीत मदत करता आली नाही तरी चालेल, एकमेकांना समजून तरी घ्या.

तुम बेसहारा ह तो किसी क सहारा बानो!

टीप:  माझ्या परदेशी मित्रांना एक विनंती - तुम्ही सुद्दा तुमचे अनुभव विचार सुचना कळवलयात तर खूप मदत होईल.

No comments: