Saturday, March 28, 2015

पेराल ते उगवेल – मार्केटींग ही तीन ‘P' पायांची शर्यत!

Image result for basic marketing strategy२८ मार्च २०१५ :  माझ्या  कंपानीसारखं  उत्पादन आज उभ्या मार्केट मध्ये कुणाचही नाही,   इतरांच्या तुलनेत आमच उत्पादन एकदम परफेक्टआहे; पण अजूनही आमचा टर्नओवर हवा तसा नाही. कदाचित मला हव तसं मार्केटींग मला अजूनही जमलेलं नाही.  खूप प्रयत्न करून बघितले.  मार्केटींग हा फक्त पैशाचा खेळ आहे?  खरी वस्तुस्थिती अशी आहे की जाहिरातींवर हवा तितका पैसा खर्च करण्याची माझी ऐपत नाही.  लहान वावासायिक इथंच मार खातात.  जाहिरातीतर सोडा साध सेल्ससाठी हवी तितकी माणस ठेवू शकत नाही.  त्यांना कमिशन देऊ शकत नाही की जास्त पगार देऊ शकत नाही... मग मार्केटींगला मीच उभा राहतोमर मर कष्ट करतो. ग्राहक तर प्रत्येक वेळी आपली अग्नी परीक्षा बघतात. संयम सुटतो.  पैशाने मार्केटींग आणि मार्केटींग मधून पैसा हे एक दुष्ट चक्र आहे!  तुम्ही उत्पादनात असाल अथवा सर्व्हिस सेक्टर मध्ये, तुमच्या मार्केटींगची ही अस्वस्था आहे का? असेल तरच पुढे वाचा...

मित्रांनो मार्केटींग हा विषय आपण समजतो तितका सोपा राहिलेला नाही.  खरं तर तो कधीच सोपा नव्हता.  याला कारण म्हणजे मार्केटींगहा उत्पादनाइतकाच आपल्या उद्दोगाचा एक मुख्य गाभा आहे हे आपण समजतच नाही.  उत्पादन आणि मार्केटींगया दोन चाकांवर आपल्या उद्दोगाची गाडी धावत असते.


आपल्याला वाटत की चांगल उत्पादन म्हणजे हमखास यश’. तुम्ही अगदीच चुकत आहात असं मी म्हणणार नाही पण, आपण जितकी मेहनत उत्पादनावर घेतो तितकी त्याच्या मार्केटींगवर घेतो का? मुळीच नाही.  आज जमाना चांगल्या उत्पादना इतकाच आकर्षक Packaging, Pricing Promotion चा आहे. आता हेच बघा चांगला चहा हा एखाद्या फुटपाथवरच्या टपरीवर मिळतो म्हणून आपण तो चहा पितो का? तो चहा कितीही चांगला असला तरी त्याला त्यांचे किती पैसे मिळतात? म्हणजे नुसत चांगल उत्पादन करून मुळीच चालणार नाही हे निर्विवाद सत्य आहे हे आधी समजून घ्या.   

काय कराल? सर्व प्रथम हे लक्षातघ्या की मार्केटींग मार्केटिंग म्हणजे नेमक काय? तर ही तीन ‘P’ पायांची शर्यत आहे हे लक्षात घ्या - Packaging, Pricing व Promotion ! या तीन Pची भट्टी जमली पाहिजे. कदाचित तुमच्या उत्पादनाच Packaging चांगलं असेल पण त्याची Price Competitive  नसेल, कदाचित त्याच Promotion  नीट होत नसेल.  सेल्स कमी म्हणजे कुठल्यातरी एका P  मध्ये गडबड आहे हे समजा.  अगदी थोडक्यात Packaging म्हणजे नुसत उत्पादनावरचा Designer कव्हर नव्हे !  आणि Pricing म्हणजे नुसतीच कमी किमत नाही, आणि Promotion म्हणजे एकावर एक फुकट नाही हे लक्षात घ्या.  

म्हणून तुमच्या उत्पादनाच मार्केट सर्वे करा.   काही खास ग्राहकांशी संवाद साधा, आपण काय देऊ शकतो, या पेक्षा त्यांना नेमक काय हवंय याची तपासणी करून घ्या, त्यांना विश्वासात घ्या - पण सगळ्या ग्राहकांशी बोलू नका.   कदाचित तुमच उत्पादन योग्य असेल पण त्याची उपयुक्तता ग्राहकांना सांगाण्यात तुमचे सेल्समन कमी पडत असतील.  ग्राहकांशी आपला संवाद असला पाहिजे 'वाद' नव्हे.     त्यां पेक्षाही प्रत्येक उद्दोगाचा ग्राहक हा एक अविभाज्य घटक आहे त्याला आपलंस कारण गरजेच आहे.  शेवटी Customer इस King हे विसरून चालणार नाही.

मग तुमचे स्पर्धक काय करतात याचा नीट अभ्यास करा.  इतरांच्या तुलनेत तुमच उत्पादन कुठे कमी आहे का? तुमचे इतर देशातले स्पर्धक कोण आहेत? ते कस मार्केटींग करतात? आपण आणखी नवीन काय करू शकतो का याचा विचार करा.  

आपण कुठे चुकतो याचा मोकळेपणाने विचार करा.  आपली चूक असेल तर ती प्रामाणिकपणे समजून त्यात सुधारणा करता आली पाहिजे. चुकीच समर्थन करत बसू नका. पुढच्या तीन महिन्यात शांत राहून अभ्यास, काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि लागा कामाला बघा चमत्कार झाला म्हणून समजा.      
  
         

No comments: