Sunday, April 12, 2015

पेराल ते उगवेल – नवीन उर्जा कुठून आणणार ?

Image result for self learning is best learning१२ एप्रिल २०१५:  गेल्या काही वर्षात आमचा उद्दोग हवा तसा आणि म्हणावा तितका वाढवता आलेला नाही. खूप काम करतो पण म्हणावं तसं यशकाही दिसत नाही. काहीच पुढे जात नाही. रोज कमवायचं आणि रोज खायचं हेच चाललेलं आहे. घरातून म्हणावं तसं कुणीही साथ देत नाही. एका शब्दाची मदत तर सोडा साधी विचारपूस देखील नसते. काहीही नवीन करायचं म्हंटल की घरातूनच नकारघंटा - आता हे काय नवीन? आहे ते संभाळता येत नाही काहीही नवीन करायचं नाही बस झालं.म्हणजे घरात काही बोलायची सोय देखील उरलेली नाही. काय उद्योग करणार? अहो एक वेळी व्याजावर पैसे उभारता येतील, पण धीराचे दोन शब्द कुठून आणायचे? कुणाकडे मागायचे?  आई, बाबा, भाऊ, बहिण, नवरा, बायको व जवळचे मित्र अशी सगळी नाती कशासाठी आपण जपतो? जर आपल्याला आयुष्यात या कुणाकडूनही काडीचाही आदरकिंवा आधारमिळणार नसेल तर या नात्यांना काय अर्थ आहे? अशी काहीशी तुमची मानसिकता झालेली  असेल तर पुढे वाचा ..

सर्व प्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जगात वरील दिलेली परिस्थिती फक्त आपलीच नाहीय. जवळपास सगळ्याच क्रियाशील माणसांची अशी अवस्था असते.   पहिल्या पिढीतल्या उद्दोजाकांच्या घरात आयुष्यभर नोकरी केलेली माणस असतील, तर त्यांच्या कडून आपण एकदम व्यासायासाठी लागणारी मानसिकता आणू शकणार नाही.  बर जरी आपल्या घरी उद्दोगाच वातावरण असलं, आणि जर त्यांनी आयुष्यात अपयश अनुभवलेलं असेल तर त्यांच्या कडून प्रोत्साहनाची अपेक्षा कशी करणार?  घरात बरीच माणस अशी असतात की जी स्वत: काही करणारे नसतात, त्यांचा जोर फक्त त्यांच्या तोंडात असतो. तुम्ही काहीही करा त्यांचे प्रश्न तयार असतात हे का? असंच का? हे करून काय होणार? आमच आयुष्य गेलं, असे पुष्कळ बघितले. नुकसान किती होणार याचा हिशोब करून ठेवा? आम्ही काय तुझ्याबरोबर आहोत पण, जरा नीट विचार कर? थोड थांब, जरा इतरांचा सल्ला देखील घे. या सगळ्याचा एकच अर्थ तो म्हणजे काही करू नकोस, ठेविले तैसे अनंती रहावे हा या सगळ्यांचा 
बाणा! या सगळ्या प्रकाराने आपली खूपच घुसमट होते, मार्ग कसा काढणार
सर्व प्रथम एक लाक्षात घेतलं पाहिजे की आपण जसा विचार करतो तसा विचार आपल्या घरातल्या किंवा जवळच्या मित्रांनी केलाच पाहिजे किंवा करतील अशी अपेक्षा रास्त असेल, पण त्यांची तेवढी बौद्धिक क्षमता असेलच असं मुळीच नाही. हे म्हणजे प्रत्येक झाडाला आंबाच लागला पाहिजे आणि तोही हापूसच असला पाहिजे ही अपेक्षा करण्यासारखं आहे. आपण कितीही प्रगती केली तरी नारळाच्या झाडाला आंबा कसा येणार? अहो एकाच झाडाची सगळी फळ देखील एकसारखी नसतात.

मला वाटत की ज्या व्यक्ती आपल्याला प्रोत्साहित करू शकत नाहीत तर त्यांच्याकडून आपण प्रोत्साहानाची किंवा इतर मदतीची अपेक्षाच का करतो? ही आपली पहिली चूक. हा त्यांचा दोष नाही.   हे म्हणजे बालवाडीच्या शिक्षिकेला दहावीच गणित शिकवायला सांगण्यासारख आहे. बालवाडीनंतर प्राथमिक व माध्यामिक शाळेत आपले शिक्षक प्रत्येक विषयांसाठी बदलतात, तसं आपल्या आयुष्यात देखील होत असतं. आपले नातेवाईक मित्र हे एका मर्यादेपर्यंत आपल्या मदत करातील किंवा साथ देऊ शकतील, पुढे नाही.  आपण त्यांना नीट समजावून सांगितल पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे.  
काय कराल?  आज व्यवस्थापान शास्त्राची चांगाली पुस्तकं लेख मुलाखाती उपलब्ध आहेत आपण त्यां नियमित वाचल्या पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आज युट्यूबवर व्यवस्थापन शास्त्रावर खूपच चांगले विडिओजसं उपलब्ध आहेत, आपण ते जरी बघितले तरी त्यातून खूप काही शिकण्यासारख आहे. व्यवस्थापनशास्त्र शिकवणारे कित्येक चांगली माणसे आज उपलब्ध आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. खर तर आपणच आपल्याला मोटीवेट केल पाहिजे. Leaders don’t wait for others to motivate them, they motivate others!

Monday, April 6, 2015

पेराल ते उगवेल – Contact Us

६ एप्रिल २०१५ :  काल काही कामासाठी एका कंपनीची वेबसाईट शोधली, लॉग-ऑन केलं, त्यांच्या कामाच स्वरूप बघितलं व टीम बद्दलची माहिती वाचली, त्यांच्या ग्राहकांचे अभिप्राय वाचले, संपूर्ण वेबसाईट वरील माहिती फारच कल्पकतेने लिहिलेली होती.  मी म्हटलं चला एक चांगाली कंपनी सापडली, लगेच त्यांच्या Contact Usवर गेलो, क्लिक केल पूर्ण पत्ता वाचला, टेलिफोनचा नंबर घेतला आणि फोन लावला.  माझी साधारण ओळख सांगु लागलो, आणि मला काय हव ते सांगायचा प्रयत्न केला तितक्यात टेलिफोन ऑपरेटर माझ पुढे काही न ऐकता म्हणाली सर तुम्ही एक तासाने फोन करा ऑफिस मध्ये महत्वाची मिटीग सुरु आहे आणि मार्केटिंगचे कुणीही जागेवर नाही.