Monday, April 6, 2015

पेराल ते उगवेल – Contact Us

६ एप्रिल २०१५ :  काल काही कामासाठी एका कंपनीची वेबसाईट शोधली, लॉग-ऑन केलं, त्यांच्या कामाच स्वरूप बघितलं व टीम बद्दलची माहिती वाचली, त्यांच्या ग्राहकांचे अभिप्राय वाचले, संपूर्ण वेबसाईट वरील माहिती फारच कल्पकतेने लिहिलेली होती.  मी म्हटलं चला एक चांगाली कंपनी सापडली, लगेच त्यांच्या Contact Usवर गेलो, क्लिक केल पूर्ण पत्ता वाचला, टेलिफोनचा नंबर घेतला आणि फोन लावला.  माझी साधारण ओळख सांगु लागलो, आणि मला काय हव ते सांगायचा प्रयत्न केला तितक्यात टेलिफोन ऑपरेटर माझ पुढे काही न ऐकता म्हणाली सर तुम्ही एक तासाने फोन करा ऑफिस मध्ये महत्वाची मिटीग सुरु आहे आणि मार्केटिंगचे कुणीही जागेवर नाही. 


त्या उद्दोगाच्या वेबसाईट वर त्यांच्या कामाची माहिती इतकी अचूक होती की मला माझ्या कामासाठी एखाद्या दुसर्या उद्दोजाकाला फोन करावा अस वाटलाच नाही.  म्हणून मी आठवणीने एक तासाने फोन केला तर, ही बया मला म्हणते सर तुमचा नंबर द्या, जरा वेळाने कुणालातरी मी फोन करायला सांगाते.  मी माझा नंबर दिला. साधारणपणे एक तास वाट बघितली, फोन आला नाही म्हणून पुन्हा फोन केला तर सिक्युरीटी गार्ड – कारण दुपारी लंच ! बर त्याला विचारलं की कुणी तरी मार्केटिंगचा माणूस आहे का? तर तो म्हणाला मी बदली वर आलेलो आहे मला इथलं काही माहित नाही.  मी मग नाईलाजाने त्यां कंपनीच्या जनरल इमेल आयडीवर इमेल पाठवला तर त्याला कंप्युटर जनरेटेड उत्तर आलं.   ही कंप्युटरचं उत्तर खुपच त्रोटक  होतं म्हणुन मी जरासा नाउमेद झालो. 

काही केल्या त्यां कंपनीशी हवा तसा संपर्क होत नव्हता.  मग थोड चिडून चार वाजता पुन्हा फोन केला आणि टीम मध्ये दाखवलेल्या एका वरिष्ठ अधिकार्याला फोन द्या अस मी ऑपरेटरला सांगितल तर तीने त्यां अधिकार्याच्या सेक्रेटरीला फोन लावुन दिला.  त्यां अधिकार्याच्या सेक्रेटरीने मी कोण, काय काम आहे याची माहिती घेतली आणि पुन्हा फोन करते म्हणून फोन बंद केला.  आणि काय चमत्कार पुढच्या पाच मिनिटात त्यां अधिकार्याचा उलटा फोन, माझा थेट फोन त्याने घेतला नाही म्हणून माफी मागितली आणि पुढची बोलणी सुरु केली .. खर सांगायचं तर आता माझा त्यांच्याशी बोलण्याचा उत्साह गेलेला होता.  तरी उसना उत्साह आणत मी त्यांना माझी ओळख दिली आणि काम सांगितल.  त्याने अगदी पुन्हा माफीच्या सुरात सांगितल ते फारच चीड आणि जास्त राग आणणार होत.  ते म्हणाले की त्यांच्या वेबसाईट वर दिलेली सागळे प्रोडकट्स अजून त्यांनी सुरु केलेले नाहीत.  वेबसाईट पूर्ण वाटावी म्हणून आम्ही ती तशी लिहिली पण आमचा व्यवसाय पूर्ण सुरु होण्यासाठी अजून निदान सहा महिने लागतील.  आम्ही चांगाली लोक घेत आहोत आणि लवकरच तुम्हाला पाहिजे ती सर्व्हिस सुरु होईल.

आपण आपल्या उद्दोगाची एक चांगाली वेबसाईट बनवतो, मोठी मार्केटींगची टीम नेमतो, आपल्या उत्पादनांच प्रोफाइल्स बनवितो, चांगल ऑफिस बनवतो, रिसेप्शन बनवतो, फोन ऑपरेटर्स नेमतो आणि पुढे काय होत? त्यांना साध्ये फोन घेता येत नाही?  कशी होणार यांची प्रगती?

काय कराल?  आपण मार्केटींगच्या टीमला वेळो वेळी ट्रेनिंग देतो, हजारो लाखो रुपयांच्या जाहिराती करतो, आणि हे विसरतो की आपल साधं बिझिनेस कार्ड जितक महत्वाच असतं, तितकंच महत्वाचं आपले टेलिफोन ऑपरेटर्स असतात. त्यांना योग्य ते संवाद साधण्याची कसब - ट्रेनिंग असायलाच हवंआपल्या उद्दोगाची, आपल्या उत्पादनांची किवा सर्व्हिसेसची, आपल्या टीमंची नीट माहिती ऑपरेटर्सनां असायलाच हवी कारण, लक्षात घ्या तुमच्या ऑपरेटरला येणारा एखादा फोन तुम्हाला हवा असणारा मोठा ग्राहक असू शकतो ! आपली टेलिफोन ऑपरेटर ही सुद्दा आपल्या मार्केटिंग टीमचीच एक मेंबर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.   

मर्केटिंगचा मुख्य मुदा जर आपल्याकडे एखाद उत्पादन किवा सर्व्हिस सुरुवातीला नसेल तर आपल्या वेबसाईटवर तसं स्पष्ट सांगितल पाहिजे.  आपल्याला चांगला व्यवसाय करायचा आहे नुसती चांगाली वेबसाईट नव्हे हे विसरता कामा नये.  चांगली वेबसाईट म्हणजे चुकीची माहिती नव्हे. 

शेवटी सगळ्यात महत्वाचं आपल्या वेबसाईट वर असलेलं Contact Usच पेजवर नुसता पत्ता आणि टेलिफोन नंबर न देता त्यावर आपल्या कंपनीची मुख्य टीम कशी भेटणार याची नीट माहीती दिली पाहिज. आणि त्यावरुन आपण पाठवित असलेली ऑटोमॅटिक उत्तर सुद्दा छान लिहिलेली असली पाहिजे. त्यात जिवंतपणा आणला पाहिजे तरच आपली कंपनी जिवंत राहिल.  जास्त काय लिहु?

No comments: