Monday, May 18, 2015

‘मेक-इन-महाराष्ट्रासाठी’ तरुण उद्दोजाकांची एक नवीन पिढी तयार होण गरजेच

मुंबई दिनांक १६ मे २०१५ :   महाराष्ट्राच्या उद्योग, कॉर्पोरेट, इन्होवेशन व समाजसेवा जगात उत्तुंग भरारी घेऊन,  आपल्या कर्तृत्वाच्या याशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांना 'मॅक्सेल फाऊंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'मॅक्सेल – म्हणजे महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अवार्डस पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रात उद्योजकतेबाबत जागरुकता निर्माण करणे,  पुढील पिढीला त्यांची स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामधील क्षमतांना कार्यरुप देणे हा मॅक्सेल अवार्डमागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ मंत्री सुभाष देसाई उद्योग विभाग व शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.  या सोहळ्याला उपस्थित जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या उद्योजकांना सतत नाविन्यपूर्ण संशोधन करीत राहाण्याचा कानमंत्र दिला. तर मराठी माणसाने स्वतःचे ब्रँडिंग करायला पाहिजे, असे अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी या सोहळ्याला उपस्थित असलेलेल्या उद्योग क्षेत्रातील मराठी मंडळींना सांगितले.

Tuesday, May 12, 2015

उद्योगरत्नांचा ‘मॅक्सेल’गौरव - महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स: दिनांक २ मे २०१५ 
व्यवसाय आणि उद्योगक्षेत्रामध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या, तसेच चाकोरीबाहेरील नव्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योजकांना 'मॅक्सेल पुरस्कार २०१५' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १६ मे रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरिअममध्ये महाराष्ट्राचे उद्दोग मंत्री सुभाष देसाई तसेच शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मॅक्सेल फाऊंडेशनकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून दुबईतील 'आर्च ग्रुप कन्सल्टंट'चे आर्किटेक्ट अशोक कोरगांवकर यांना जीवनगौरव,
उद्योजक अशोक खाडे, मिलिंद बर्वे, मंगेश काळे, शिवानी दाणी, अक्षय वर्दे, डॉ. मेधा पुरव-सामंत यांना मॅक्सेल एक्सलन्स पुरस्काराची घोषणा करण्यात आली.