Wednesday, August 19, 2015

उद्योजकतेचे धडे शाळेपासूनच हवेत ..

Image result for maharashtra times logo
महाराष्ट्राने जर एक पाऊल पुढचे टाकून शालेय शिक्षणापासूनच देशात उद्योजकतेची सुरुवात केली, तर पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया बरोबर स्टार्ट अप मोहिमेला देखील एक निश्चित दिशा मिळेल...                                                                                       
 .. नितीन पोतदार  

Founder Trustee Maxell Foundation 

महाराष्ट्र टाईम्स दि. १९ ओगस्ट २०१५.

पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्याबरोबर 'मेक-इन-इंडिया' हा कार्यक्रम दिला. त्याचेच पुढील पाऊल म्हणजे यावर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडियाचा महत्वपूर्ण नारा दिला. या पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या वर्षात १२५ लाख बँकाच्या प्रत्येक शाखेने आपल्या क्षेत्रात किमान एका तरी दलित तरुण उध्द्योजकाला आणि एका महिलेला आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. नॅसकॉमने २०१४मध्ये स्टार्ट अपसंबंधीचा एक अहवाल प्रकाशित केला होता, त्यानुसार देशात ३१०० स्टार्ट अप आहेत आणि २०२०मध्ये ही संख्या ११,५०० होईल. नॅसकॉमचा हा अहवाल लक्षात घेतला, तर पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी घोषणेचे महत्व लक्षात येईल. 

Monday, August 10, 2015

एक आई सक्षम होण गरजेच आहे ..

'मटा हेल्पलाइन'च्या हृद्य कार्यक्रमात २५ गुणवंतांना समाजदेणे सुपूर्द
म. टा. वृत्तसेवा, ठाणे

कुणाचे खाऊचे पैसे, कुणाचे पेन्शनचे तर कुणाचे पॉकेटमनीतून बाजूला काढलेले...माध्यम अनेक उद्देश एकच. पैशाअभावीे कुणाचे शिक्षण थांबू नये हाच! बिकट परिस्थितीशी झगडत, अडथळ्यांची पर्वा न करता अथक प्रयत्नांती यश कमावलेल्यांना उच्चशिक्षण घेता यावे म्हणून समाजातून आर्थिक दातृत्व पुढे आले आणि त्यांनी २५ विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला साथ दिली. परिस्थितीशी झुंज देणाऱ्या आणि दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांना 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून दानशूर व्यक्तींनी केलेली मदत शनिवारी समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली. याच समाजदेण्याने त्यांच्या पंखांत नवी जिद्द भरली.

ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये हा दातृत्व सोहळा रंगला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा, मॅक्सेल फाऊंडेशनचे नितीन पोतदार यांच्या हस्ते मुलांना मदतीच्या रकमेचे चेक देण्यात आले. या मदतीलाच व्हॅल्युएबल ग्रूपने आणखी जोड देत, आपल्यातर्फे टॅब देण्यात आले. मागील वर्षीपर्यंत हेल्पलाइनमार्फत दहा मुलांसाठी मदत केली जात होती. यंदा तो आकडा २५पर्यंत गेला आणि त्याच बरोबरीने मदतीचा ओघही वाढला. यंदा वाचकांकडून २ कोटी ८० लाख रुपये मदत जमा झाली.

एक आई सक्षम होण गरजेच आहे ..

नितीन पोतदार, संचालक, मॅक्सेल फाऊंडेशन

आयुष्यातील आव्हाने पेलत 'मटा हेल्पलाइन'च्या गुणवंत मुलामुलींनी मिळवलेल्या यशाच्या गाथा ऐकून माझ्याकडे बोलायला शब्दच उरलेले नाहीत. 'मटा हेल्पलाइन' उपक्रमाला भरघोस मदत करणाऱ्या 'मटा'च्या वाचकांचे या निमित्ताने सर्वाधिक कौतुक वाटते. 'मटा हेल्पलाइन'सारख्या उपक्रमाला अमेरिका, युरोपमध्ये 'क्राऊड फंडिंग' म्हणतात. त्या देशात एखाद्या उद्योजकामागे 'क्राऊड फंडिंग'च्या रूपाने पैसा उभारला जातो. मात्र 'मटा'च्या वाचकांनी सामाजिक जाणिवेतून 'हेल्पलाइन'च्या प्रत्येक मुलामागे 'क्राऊड फंडिंग' केलेले आहे.९० टक्क्यांहून अधिक गुण हा शेवट नसून, करिअरची खरी सुरुवात आहे. देशातील कोट्यवधी मुलांना बिकट परिस्थितीमुळे आजतागायत शाळेचा दरवाजाही दिसलेला नाही, त्या मुलांसाठी 'मटा हेल्पलाइन'च्या मुलांनी नक्की प्रयत्न केले पाहिजेत.  प्रत्येक मुलीने सक्षम होणे गरजेचे आहे, म्हणूनच मॅक्सेल फाउंडेशनच्या वतीने विशेषत: मुलींना लॅपटॉप देत आहोत. कारण, एक आई सक्षम झाली तरच दोन घरं सक्षम होतात. भविष्यात अशाच सक्षमतेची अपेक्षा आहे.