Sunday, September 27, 2015

म्हणे, आपण अर्थ साक्षर!

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो…

.. जयंत विद्वांस  
सौजन्य लोकसत्ता दी. 20 September 2015.

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला पतदेईल. मात्र यासाठी आपल्या पुढच्या पिढय़ांना प्रयत्नपूर्वक आíथक साक्षर बनविले गेले पाहिजे.

आपल्यावर पिढय़ान् पिढय़ा साक्षरतेचे संस्कार झाले आहेत. परंतु आíथक साक्षरता आपल्या डीएनएमध्ये आलेलीच नाही. त्यामुळेच मराठी माणसांमध्ये श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. या आíथक निरक्षरतेपायी मराठी समाज म्हणून आपल्याला पतनाही.

Monday, September 14, 2015

नाना-मकरंद मुंबईकरही तुमच्या पाठीशी…


प्रिय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे,
स. न. वि. वि.

मी मुंबई - मराठी माणसाचा श्वास, अभिमान आणि थोर सामाजिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्या आर्थिक राजधानी!  सर्वप्रथम तुमच्यातील संवेदनशीलतेला माझा मनापासून सलाम! मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त,  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी तुम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला सामान्य मुंबईकरांचाही हातभार लागो यासाठीच हा पत्रप्रपंच.

मकरंद आणि नाना तुम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाच्या निमित्ताने माझ्या मनात एकाच प्रश्न सारखा येतो तो म्हणजे मुंबईची नाळ खरंच महाराष्ट्राशी जोडलेली आहे का? इथला प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्राला 'आपलं' मानतो का? ग्रामीण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला किती जवळचे वाटतात? त्याच्या मदतीसाठी माझे मुंबईकर किती पुढे येतात, किती तत्परता दाखवतात?

Tuesday, September 1, 2015

Startups - Discussion on DD News 31st August, 2015

'स्टार्टअप' या विषयी दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन Live ....एकुणच मी तीन मुद्दे मांडले ते असे, 1. महाराष्ट्रात वेगळं "स्टार्टअप मंत्रालय" असायला पहिजे, 2. शाळा-कॉलेजांमधील अभ्यासक्रमात 'उद्दोजकता' हे ईतिहास, गणित, भुगोल सारखे विषय शिकवले गेले पाहिजे, आणि 3. यंदाच्या सार्वजनिक गणेशउत्सांवा मध्ये एक दिवस तरूणांसाठी स्टार्टअप वर चर्चा सत्र आयोजिक केले पाहिजे...संपुर्ण वृतांता साठी बघा.