Saturday, January 30, 2016

जेव्हा 'कॉम्पुटर मस्ती' गंभीर होते

दिनांक 30 जानेवारी 2016:   ई-कॉमर्स मधील फ्लिपकार्ट व बेवकूफचा रंजक प्रवास मागील दोन भागात आपण पाहिला.  आज आपण इ-बुक विषयी जाणून घेऊया.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात कॉम्पुटर सायन्स शिकवण्याची पद्धत अतिशय साचेबद्ध आणि केवळ तांत्रिक बाजूंवर भर देणारी होती.  परंतु त्याला छेद
दिलाय 'कॉम्पुटर मस्ती' नावाच्या इ-बुकने. आज जवळपास १३० देशांमध्ये, इंग्रजीबरोबर,हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगु, उर्दू, कन्नड, बंगाली अशा ८ भारतीय भाषा तसेच अरेबिक आणि फ्रेंच अशा २ परकीय भाषांमध्येही ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.  भारतातील ३०० हून अधिक खाजगी तसेच सरकारी शाळेतील पाच लाखांहून अधिक विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत.  त्यासाठी जवळपास ४००० शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Tuesday, January 19, 2016

नव उद्दोजाकांची एक पिढी घडवूया

दिनांक १६ जानेवारी २०१६  : स्टार्ट अप म्हणजे नेमकं काय, कसा सुरु होतो हा प्रवास, या संकल्पना काय आहेत, त्याक कोण सहभागी होवु शकतो? त्यांना येणार्‍या अडचणी आणि त्यांना मिळणारे यश-अपयश, त्याचबरोबर भारतात नव्याने विकसित होऊ घातलेली स्टार्टअपसाठी लागणारी उद्दोजकीय व्यवस्थाही आपण समजून घेणार आहोत,  कारण हा विषयच जगभर नविन आहे आणि म्हणुन त्यांच्या अनुभवातुनच आपल्याला शिकावं लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक-इन-इंडिया, स्किल-इंडिया आणि आज स्टार्ट-अप इंडियासाठी ठोस कार्यक्रम ते देणार आहेतशासकीय पातळीवर एकूणच उद्दोजकीय व्यवस्थेमध्ये मुलभूत बदल करण्यासाठी ते खूपच आग्रही आहेत.  परंतु ग्लोबलाईझेश्न आणि रोज बदलणार्या तंत्राज्ञानामुळे  (डीसर्पटीव्ह-इन्होवेशन) एका दिवसात किंवा एकाच धोरणाने आपण यशस्वी होणार नाही हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे.  एकीकडे परदेशी कंपन्यांना मेक-इन-इंडिया अंतर्गत आमंत्रण आणि दुसरीकडे आपल्या तरूणांच्या स्टार्ट-आपसाठी आग्रह यात विसंगती आहे का याचाही विचार आपल्याला करावा लागेल?  म्हणून स्टार्टअप्स भोवती आज जरी उत्साह दिसत असला तरी पुढे कदाचित त्यांना अनेक आव्हाने येवू शकतात.  तरीही अर्धायाहून अधिक गरिब आणि अशिक्षित असलेल्या 120 कोटीच्या देशाला तरुण उद्दोजकांची एक नवीन पिढी एका निर्धाराने आपल्याला उभी करावी लागेल.  

Saturday, January 2, 2016

फ्लिप युवर बिझिनेस आयडिया


 दिनाक 2 जानेवारी 2016 : गेल्या काही वर्षात 'स्टार्टअप' हा जगभरात एक चलनी नाण्याप्रमाणे परवलीचा शब्द झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अलीकडेच 'स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया' ही महत्त्वाकांक्षी घोषणा केली. गेल्या काही वर्षांतील स्टार्टअप संबंधीचा काही अहवाल बघितले, तर एकूणचं स्टार्टअप उद्योगांचे वाढते महत्व लक्षात येऊ शकतं.

सर्वसाधारणपणे 'स्टार्टअप' म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कसलाही अनुभव नसताना केवळ कल्पकतेच्या भांडवलावर तरूणांनी सुरु केलेला उद्योग-व्यवसाय. आज तरूणांनी त्यांच्या 'लॅपटॉप'ला मुख्य ऑफिस, 'मोबाईल फोन'ला सेल्समन आणि 'कॉलेज-कट्ट्याला' कल्पनांसाठीची २४x'लॅबोरेटरी' म्हणून कार्यरत केलेली दिसते. त्याच बरोबर घराघरांत पोहोचलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून घरातील लाखो गृहिणीदेखील जगभरातील हजारो-लाखो लोकांशी एका क्लिकद्वारे 'कनेक्ट' झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप सारख्या सोशल मीडियामुळे चक्कं पैसेही मिळवित आहेत. यात अगदी घरी बनविलेल्या दहा रुपयांच्या केकपासून कुठल्याही क्रिएटिव्ह वस्तूपर्यंत आणि ऑटो कार्स ते मोठमोठ्या क्रेन पर्यंत - कॅश किंवा क्रेडिट कार्डद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आज जगभरातून 'स्टर्टअप'ला सरकारी आणि मुख्य म्हणजे एकूणच समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर याचा बोलबाला झाला नसता तरच नवल.
Image result for wello wheel

स्टर्टअपमध्ये ज्या तरूणांनी यात यश मिळवलंय त्यांच्या कल्पक प्रयत्नांच्या प्रवासाचा नीट अभ्यास केला, तर त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. आजच्या तरूण-तरूणींनी बरोबर कुणालाही आणि कुठल्याही वयात कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वतंत्र विश्व उभं करता यावं या हेतूनेच 'स्टर्टअप' या लेखमालेचा प्रपंच.