Saturday, January 30, 2016

जेव्हा 'कॉम्पुटर मस्ती' गंभीर होते

दिनांक 30 जानेवारी 2016:   ई-कॉमर्स मधील फ्लिपकार्ट व बेवकूफचा रंजक प्रवास मागील दोन भागात आपण पाहिला.  आज आपण इ-बुक विषयी जाणून घेऊया.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात कॉम्पुटर सायन्स शिकवण्याची पद्धत अतिशय साचेबद्ध आणि केवळ तांत्रिक बाजूंवर भर देणारी होती.  परंतु त्याला छेद
दिलाय 'कॉम्पुटर मस्ती' नावाच्या इ-बुकने. आज जवळपास १३० देशांमध्ये, इंग्रजीबरोबर,हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगु, उर्दू, कन्नड, बंगाली अशा ८ भारतीय भाषा तसेच अरेबिक आणि फ्रेंच अशा २ परकीय भाषांमध्येही ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.  भारतातील ३०० हून अधिक खाजगी तसेच सरकारी शाळेतील पाच लाखांहून अधिक विद्यार्थी त्याचा वापर करत आहेत.  त्यासाठी जवळपास ४००० शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.


शैक्षणिक क्षेत्रात ऐवढी मोठी झेप घेणारी 'इन-ओपन टेक्नोलॉजी' ्या स्टार्ट अप कंपनीची ही रंजक कथा आहे. कंपनीचे संस्थापक रुपेश कुमार शहा हे आयआयटी मुंबईत येण्याआधी अनेक अपयशांना सामोरे गेले आहेत. दार्जीलिंगमधील सिलीगुडी येथे एका मारवाडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. टिंबर मर्चंट असलेल्या वडिलांना मदत म्हणून रुपेश कधी कधी ऑफिसात जात. रूपेशने ऑफिसात आलेल्या ग्राहकाला लाकडाऐवजी स्वस्त म्हणून प्लास्टिक वापरण्याचा सल्ला दिला.  शा उद्दोगविरोधी वागण्यामुळे हा मुलगा काही आपला व्यवसाय सांभाळू शकेल का या शंकेमुळे वडिलांनी रुपेशला आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करायला कोटा इथे पाठवले. पण दुर्दैवाने रूपेशाला या परीक्षेतही अपयश आले. शेवटी ५० हजार रुपये डोनेशन भरून अल्वरच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पे-सीट मध्ये वडिलांनी रुपेशला प्रवेश मिळवून दिला. त्यातही पहिल्याच वर्षी रुपेश नापास झाला.

त्याचवेळी एका मित्राचा भाऊ आयआयटी मुंबईत पास झाल्याचे समजले. मग रुपेशनेही आयआयटी-बी मध्ये येण्याचा निश्चय केला.  त्याने आपल्या वर्ग मित्रांच्या मदतीने इंजिनिअरिंगच्या ग्रज्यूएट्सना उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर विकसित केले. केवळ सहा महिन्यात तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण दिले गेले. शिवाय इंडियन एअरफोर्सचे कंत्राटही मिळाले. सहा महिन्यात ६० लाखांवर उलाढाल! पण यात आपण फसवले गेलोय हे लक्षात आल्यावर रुपेश यातून बाहेर पडला.

आओ फिर से दीया जलाये ..

स्टार्ट-अप इंडिया या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला अटल इनोव्हेशन मिशननावाने संशोधन विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० टिंकरींग लॅब म्हणजे उद्योग आणि कल्पना याबाबत विचार करुन त्यात बदल सुचवणे यासाठी प्रयोगशाळासार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून नवउद्योगांची जोपासना करणारी ३५ केंद्रे; राष्ट्रीय संस्थांमध्ये ३१ कल्पकता केंद्रे; ७ नवे रिसर्च पार्क; ५ नवे बायो-क्लस्टर (जैविक क्लस्टर) आणि या कार्यक्रमात ५ लाख शाळा आणि १० लाख विद्यार्थी यांचा समावेश करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. लवकरच याची कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे.  माननीय अटलजी आज पंतप्रधान असते तर तरुणांना उद्देशून त्यांच्या खास शैलीत आओ फिरसे दीया जलाये ही कविता त्यांनी अशी म्हटली असती - हम पडाव को न समझे मंजिल, लक्ष न हो आखो से ओझलं! वर्तमान के मोहजाल मे, आनेवाला कल न भुलाये, आओ फिर से दीया जलाये!”  

Image result for wello wheel
पुन्हा संघर्ष सुरु झाला. याकाळात आयआयटी मुंबईच्या प्रो. श्रीधर अय्यर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला, त्यांना कॉम्पुटर सायन्सचा एक अभ्यासक्रम इंटरनेटवर प्रसिद्ध करायचा होता. रुपेशला यातच व्यवसायाची मोठी संधी दिसली आणि २३ नोव्हें. २००९ साली 'इन-ओपन टेक्नोलॉजी'चा जन्म झाला. स्वतःकडचे २५ लाख आणि स्टेट बँकेकडून मिळालेले ५० लाखांचे कर्ज यातून व्यवसायाचे आर्थिक गणित बसवलं.  

या एज्युकेशनल स्टार्ट अपचे पहिले प्रोडक्ट
म्हणजे 'कॉम्पुटर मस्ती'पहिला ग्राहक मुलुंडची श्री श्री रवीशंकर विद्यामंदिर! नंतर बोरिवलीची शाळा मिळाली. सध्या 'इन ओपन' आसाम आणि बिहार राज्यातील सरकारी शाळांसाठी काम करत आहे.
कॉम्पुटरसारखा किचकट विषय सोपा करून माफक किंमतीत उपलब्ध केल्यानेच 'इन ओपन' चे बिझनेस मॉडेल यशस्वी झाले. 'साधेपणा' हा त्यांचा युएसपी आहे. त्याची टॅग लाईनच आहे, 'Adding simplicity to Sense'.  या इ-बुकची किंमतही अतिशय माफक म्हणजे एका विद्यार्थ्याला एका वर्षासाठी १६० रु. इतकी आहे. सीबीएससी, आयसीएसइ, आयजीसीएसइ तसेच एसएससीच्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये केजी पासून ते माध्यमिक (इयत्ता आठवी) वर्गापर्यंत त्याचा वापर होत आहे.  या पुस्तकातील तेजस व ज्योती (विद्यार्थी) आणि मोझ (उंदीर) अशा ३ व्यक्तिरेखांच्या माध्यमातून 'कॉम्पुटर सायन्स' हा विषय अतिशय कल्पकतेने शिकवला जातो. पुस्तकाची एकंदर रचना विद्यार्थामधील वैचारिक क्षमतेला आणि लॉजिकल थिंकिंगला चालना देणारी अशीच आहे.

शैक्षणिक स्टार्ट अपसाठी पैसा भा फार सोपे नसले तरी फार अवघडही नाही. गुंतवणूकदारांना यशाची हमी वाटली आणि भविष्यकाळ उज्ज्वल दिसला तर ते नक्कीच पैसे गुंतवतात. २०११ साली व्हेंचर इनव्हेस्टनेही 'इन-ओपन टेक्नोलॉजी'मध्ये पाच लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. नंतर जपानच्या बेनेसी होल्डिंग्जने 'इन-ओपन'मध्ये पैसे गुंतवले.  यामुळे अमेरिका आणि जपानची बाजारपेठ कंपनीसाठी खुली झाली असून तेथेही व्यवसायाचा विस्तार करणे सोपे झाले आहे. कॅलिफोर्निया आणि टेक्सास येथेही 'इन ओपन' चे ऑफिसेस सुरु झाली आहेत. गेल्या वर्षीचा कंपनीचा टर्न ओव्हर ६ कोटी रु. इतका होता. यावर्षी विविध संस्थांच्या सहकार्याने जगभरातील सुमारे १०००-१२०० शाळांपर्यंत  पोहोचत कंपनीने २० कोटींचे उद्दिष्ट गाठायचे लक्ष्य आपल्यासमोर ठेवले आहे. 

शैक्षणिक क्षेत्र ही भारतातील फार मोठी असंघटीत आणि विभाजीत अशी बाजारपेठ आहे. ह्या क्षेत्रातील काही कंपन्या कंटेंटमध्ये नाविन्य देऊ न शकल्याने बुडाल्या.  टेक्नोलॉजीसह उच्च प्रतीचा कंटेंट आणि विद्यार्थीप्रिय मार्गाचा अवलंब केल्याने 'कॉम्पुटर मस्ती' मात्र शाळाशाळांत लोकप्रिय झाली, स्वीकारार्ह बनली आहे. अनेक अपयशांना पचवून रुपेश शहा यांनी 'इन-ओपन टेक्नोलॉजी'चा मोठा वटवृक्ष केला – शिक्षणाचा प्रसार केला. महाराष्ट्रात विविध विषयात असे अनेक शिक्षणतज्ञ होते आणि आजही आहेत त्यांनी इन-ओपनच्या यशाचा नीट अभ्यास केला आणि हिमत दाखवली तर सरस्वतीला-लक्षमीची साथ लाभेल.  

पुढच्या भागात भेटूया २० हजारांहून अधिक डॉक्टरांबरोबर काम करणाऱ्या सर्च इंजिनच्या शोधकर्त्यांना
-
नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर - nitinpotdar@yahoo.com 
संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन


No comments: