Saturday, February 13, 2016

प्राक्टो - यशाची नेमकी 'नस'!

Image result for wello wheelदिनांक 13 फेब्रुवारी 2016 :  ई-कॉमर्स व ई-बुक नंतर विविध सेवाक्षेत्रात काम करणार्या स्टार्टअप्स मध्ये आज आपण भेटणार आहोत मेडिकलक्षेत्रातील 'प्राक्टो' या आशिया खंडातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनच्या शोधकर्त्यांना.  
झपाट्याने विस्तारणाऱ्या महानगरांमध्ये नोकरी-व्यवसाय-शिक्षणाच्या निमित्ताने कित्येक कुटुंबे स्थलांतरीत होतात आणि नित्य नवीन लोकसंख्येची भर पडत असते. नवीन परिसरात शाळा व कॉलेजेस बरोबर वाणी, दुधवाला, पेपरवाला, टेलर अशा अनेक सेवा-सुविधांचा शोध घेणे तसे कठीण नसते. खरी समस्या असते ती अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल इमर्जन्सीसाठी डॉक्टर कसा शोधायचा? त्यातच स्पेशालीस्ट कोण? त्यांची क्लिनिक्स कुठे आहेत? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स? पॅथलॉजी लॅब त्यांच्या वेळा-फी वगैरे वगैरे. याच्या उलट नविन शिकलेल्या डॉक्टरांचेही काही प्रश्न आहेतच त्यात मुख्य म्हणजे दवाखान्यासाठी लागणारी मोक्याची जागा, त्याच प्रमोशन.