Saturday, February 13, 2016

प्राक्टो - यशाची नेमकी 'नस'!

Image result for wello wheelदिनांक 13 फेब्रुवारी 2016 :  ई-कॉमर्स व ई-बुक नंतर विविध सेवाक्षेत्रात काम करणार्या स्टार्टअप्स मध्ये आज आपण भेटणार आहोत मेडिकलक्षेत्रातील 'प्राक्टो' या आशिया खंडातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनच्या शोधकर्त्यांना.  
झपाट्याने विस्तारणाऱ्या महानगरांमध्ये नोकरी-व्यवसाय-शिक्षणाच्या निमित्ताने कित्येक कुटुंबे स्थलांतरीत होतात आणि नित्य नवीन लोकसंख्येची भर पडत असते. नवीन परिसरात शाळा व कॉलेजेस बरोबर वाणी, दुधवाला, पेपरवाला, टेलर अशा अनेक सेवा-सुविधांचा शोध घेणे तसे कठीण नसते. खरी समस्या असते ती अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल इमर्जन्सीसाठी डॉक्टर कसा शोधायचा? त्यातच स्पेशालीस्ट कोण? त्यांची क्लिनिक्स कुठे आहेत? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स? पॅथलॉजी लॅब त्यांच्या वेळा-फी वगैरे वगैरे. याच्या उलट नविन शिकलेल्या डॉक्टरांचेही काही प्रश्न आहेतच त्यात मुख्य म्हणजे दवाखान्यासाठी लागणारी मोक्याची जागा, त्याच प्रमोशन.

मेक इन इंडिया’ बरोबर स्टार्ट अप इंडियाच नेतृत्वं देखिल महाराष्ट्राने करावं  ..

पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाया महत्वाकांक्षी मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राची निवड करण्यात आली या गौरवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आणि औद्योगिक मंत्री सुभाष देसाईंच अभिनंदन!

महाराष्ट्राला शिक्षणं व सहकाराची मोठी परंपरा आहे त्याचं पुढ्च पाउल म्हणुन स्टर्टअप्ससाठी देशातील तरूणांना आपण एक सक्षम व स्वयंपुर्ण व्यवस्था तयार करु शकलो तर उगवत्या स्टार्टअपच्या विश्वात महाराष्ट्राची जागतिकं स्थरावर एक नवी ओळखं निर्माण तर होईलच पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक व रोजगार देखिल उपल्बद होईल. या प्रक्रियेसाठी तंत्र / उच्च शिक्षणं, औद्योगिक अनुभव आणि वित्तिय संस्था यांना जोडणारं स्टार्टअप्साठी एक  स्वतंत्र विभाग असणं गरजेच आहे.   
 

पेशंट आणि डॉक्टर दोघानाही उपयोगी पडेल असे एक मल्टीपर्पज App 'प्राक्टो टेक्नोलॉजीज्' या आयटी कंपनीने विकसित केले आहे. डेनटीस्टपासून त्वचाविकार, वेगवेगळी ऑपरेशन्स, अगदी कुटुंबातून लपवल्या जाणाऱ्या मानसिक आजारांपर्यंतच्या जवळपास २५० प्रकारातील १ लाख २० हजारांहून अधिक स्पेशालिस्ट डॉक्टर्सची यादी त्यात आहे.  या यादीत त्यांच्या डिग्री, क्लिनिक्स, अल्पपरिचय, त्यांची फी असे सर्व तपशील या अ‍ॅपमध्ये आहेत.  या शिवाय प्रॅक्टो-रे डॉक्टरांसाठी एक सॉफ्टवेअर विकस्ति केले आहे. दिल्ली, गुरगाव, मुंबई, बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद इत्यादी महानगरांसह भारतातील १०० हून अधिक शहरातील ३५ हजारांहून अधिक डॉक्टर्स या सॉफ्टवेअरचा वापर करीत आहेत. सिंगापूर, मलेशिया, फिलीपाईन्स आणि इंडोनेशियामध्येही प्राक्टोApp आता उपलब्ध झाले आहे. लवकरच दक्षिण मध्य आशिया आणि उत्तर अमेरिकेत हे App लॉच केले जाणार आहे.
'गरज ही शोधाची जननी आहे' या धर्तीवर प्राक्टोचा जन्म झाला. प्राक्टोचा एक तरुण संस्थापक शशांक एन. डी. (वय वर्षे २७, हा २००८ साली सुरथकल, कर्नाटक येथील न्याशनल इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजि मध्ये बी. टेक. - कॉम्पुटर इंजिनीअरिंग)च्या शेवटच्या वर्षाला शिकत होता.  याच्या वडिलांच्या नी -रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरेकीतील तज्ञ डॉक्टरांचे सेकंड ओपिनिअन घ्यायचे होते. परंतु पेशंटची केस हिस्ट्री, मेडिकल रिपोर्ट, एक्सरे इत्यादी डिजिटल स्वरुपात उपलब्ध नसल्याने अमेरेकीतील तज्ञांचे मार्गदर्शन त्याला मिळू शकले नाही. त्यातूनच प्राक्टो प्रोडक्टची इनोव्हेटिव्ह आईडिया त्याच्या डोक्यात चमकली. मग अभिनव लाल या मित्राच्या मदतीने २००८ साली बंगळूरूमध्ये प्राक्टो टेक्नोलॉजीची रितसर स्थापना करण्यात आली. सुरुवातीला आईकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी डॉक्टर्सशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक डॉक्टर्सनी नाकं मुरडली. यामुळे शशांक आणि अभिनव नाराज झाले, पण त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांच्या सॉफ्टवेअरला मान्यता मिळत गेली.

आज प्राक्टो टेक्नोलॉजी २ महत्वाच्या सेवा पुरवते. डॉक्टरांच्या प्राक्टिस व्यवस्थापनात सूत्रबद्ध सुधारणा घडवून आणण्यासाठी 'प्राक्टो रे' हे ऑनलाईन मानेजमेंट सॉफ्टवेअर आहे, तर आपल्याला हव्या असलेल्या डॉक्टर्सच्या संपर्कात येण्यासाठी पेशंटना उपयोगी पडावे यासाठी www.practo.com ही वेबसाईट या दोन्ही कामासाठी विकसित करण्यात आली आहे.  पेशंटचे मेडिकल रिपोर्ट, हिस्ट्री, त्याला दिल्या जाणाऱ्या औषधांची यादी, त्यांचे प्रमाण व रुग्णाला दिल्या गेलेल्या सूचना याच्या नोंदी यात साठवता येतात. महत्वाचे म्हणजे पेशंटच्या बिलाचा तपशील त्यात असतो. प्रतिमाह ठराविक वर्गणी भरून डॉक्टर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. डॉक्टर्सच्या परवानगीने पेशंटही त्याचा उपयोग करू शकतात. तर प्राक्टो डॉट कॉमच्या माध्यमातून महिन्याला १ लाखांहून अधिक अपॉएन्टमेंट कोणत्याही शुल्काशिवाय बुक केल्या जातात.

२०११ साली सेक्यूओइया कॅपिटल (Sequoia Capital) या खाजगी गुंतवणूक कंपनीने २५ कोटी रुपये प्राक्टो टेक्नोलॉजीत गुंतविले आणि कंपनीला आपला विस्तार करता आला. याशिवाय कंपनीला रशियन अब्जाधीश युरी मिलनर आणि गुगल कॅपिटल यांच्याकडून ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. डॉक्टर्स शोधण्यापलिकडे भविष्यात डायग्नोस्टीक सेंटर्स, फार्मसी, फिटनेस- योगा सेंटर्स, जीम, हेल्थ स्पा या सुविधांची भर त्यात पडणार आहे. 

जेमतेम ५-६ वर्षांच्या काळात 'प्राक्टो'ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद थक्क करणारा आहे. गुंतागुंतीच्या आजारांचे डॉक्टरांनी केलेले निदान, त्यांची उपचार पद्धती, एक्सरे, स्क्यानिंग, रक्त - लघवी तपासणीचे रिपोर्ट पाहून देशातीलच नव्हे तर जगभरातील डॉक्टर्स इथल्या डॉक्टरांशी आज ऑनलाईन सल्ला-मसलत करू शकतात. समोर आलेल्या अडचणीचे संधीत रुपांतर यातच शशांक यांच्या कल्पकतेचे यश दडलेले आहे. याविषयी ते म्हणतात, ''पेशंटच्या डिजिटल रेकॉर्डची समस्या ही भारतातच नव्हे तर जगभरात दुर्लक्षित राहिली होती. आम्ही हाच घटक केंद्रस्थानी ठेऊन आमच्या उद्योगाची उभारणी केली आणि आम्हाला यश मिळाले.''

अनुभवातून मिळालेले व्यावसाईक-शहाणपण स्टार्ट अप क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या तरुण मित्रांना शशांक नेहमी सांगत असतो – त्याच्या मते एखादी इनोव्हेटिव्ह कल्पना क्लिक झाली तरी तेवढे पुरेसे नसते, सुरुवातीला मिळालेल्या यशात सातत्य राहण्यासाठी कायम सावध रहावे लागते. तो म्हणतो की प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालण्यापेक्षा तज्ञ सल्लागारांची मदत; बाजारपेठ विक्री याबाबतीतले जाणकारांचा सल्ला तसेच तांत्रिक सहकार्य घेणं गरजेच आहे. आणि शेवटी तो म्हणतो की कोणताही व्यवसाय जीव ओतून केल्याशिवाय त्यात अभूतपूर्व यश मिळत नाही.  डॉक्टरांशी संबधित व्यवसायाच्या यशाची 'नस' अचूक हेरत 'प्राक्टो'जी आगेकूच करत आहे ती तरुणांमध्ये उत्साह नक्कीच निर्माण करणारीच आहे. 
- नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर

संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन

No comments: