Saturday, March 26, 2016

ब्युटीपार्लर एक सिरीअस बिझनेस ..

महाराष्ट्र टाईम्स दी. 26 मार्च २०१६:  आपण विविध सेवांसाठी ‘ह्युमन रिसोर्सेस’ उपलब्ध करून देणे यावर आधारित असलेल्या स्टार्ट-अप बिझिनेस मॉडेलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील भागात आपण आधुनिक विज्ञानाची पदवी घेतलेले डॉक्टर्स तसेच प्राचीन शास्त्रांचे जाणकार असलेले भटजीही उपलब्ध करून देणारे स्टार्ट-अप्स बघितले. आज ब्युटीपार्लर या एका स्टार्ट-अप विषयी जाणून घेऊ या. 
Image result for wello wheel

आज स्त्रियांची कार्यक्षेत्रे विस्तारली आहेत.  जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला नुसतच काम नव्हे तर धडाडीने नेतृत्व करताना दिसत आहेत. स्त्रिया ऑफिस मीटींग्ज, विविध परिषदांमध्ये चर्चेत भाग घेतात, कामानिमिताने देश-विदेशाचे दौरे करतातलेक्ट्रोनिक व सोशल-मिडियातला त्यांचा वावर लक्षणीय असतो.  तसेच कौटुंबिक सामाजिक समारंभात त्या मोकळेपणाने स्वतंत्र विचार मांडताना दिसतात. त्या स्वत:च्या नकळत स्वयंमुल्यमापन करीत असतात आणि आपली स्वयंप्रतिमा देखल जपत असतात.

Saturday, March 12, 2016

भटजी ऑन क्लिक!


महाराष्ट्र टाईम्स दी. १२ मार्च २०१६:  मॅन्युफॅचरिंगपेक्षा सेवाक्षेत्रात स्टार्टअपची संख्या ही खूपच जास्त दिसते याला मुख्य कारणं म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आमुलाग्र बदल आणि सोशल-मिडियाचा दिवसागणिक होत असलेला मोठा प्रसार.  त्यातही ई-कॉमर्स व ई-बुक ह्या प्रकारात जसे अनेक नवे स्टार्टअप आहेत तसेच विविध सेवांसाठी ह्युमन रिसोर्स उपलब्ध करुन देणे ह्या बिझिनेस मॉडेलवर आधारीतही अनेक नवे स्टार्टअप आहेत.  ह्युमन रिसोर्स मग ते टेक्निकल असो की नॉन-टेक्निकल नवनवीन सेवाक्षेत्रात त्यांची मोठी मागणी आहे आणि ही दिवसागणिक वाढतंच जाणार आहे. 

गेल्या भागात आपण मेडिकलक्षेत्रातील 'प्रक्टो' या आशिया खंडातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपच्या विषयी जाणून घेतलं. आज आपण एका गंमतीशीर ह्युमन रिसोर्स म्हणजे भटजी याकडे बघूया.  शिक्षणाचा प्रसार, मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची उपलब्धता, बदलती सामाजिक प्रतिष्ठा अशा कारणांमुळे कित्येक घरातील भिक्षुकीची परंपरा आज जवळपास खंडित झाली आहे. सगळा भार पडत आहे तो काही मोजक्या भटजींवर. त्या बिचार्‍यांना महत्वाच्या मुहूर्तांच्यावेळी मर्यादित षटकांच्या सामन्यासारखी सर्वदूर धावाधाव करावी लागते.

ऑनलाईन किराणा ..

महाराष्ट्र टाईम्स दि. २७ फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप्स म्हणजे ‘ई-कॉमर्स – आणि वेबसाईट व मोबाईल द्वारे वस्तू विकणे हे समीकरणं सध्या झालेल आहे.  ई-कॉमर्स’ मागची तांत्रिक संकल्पना एकसारखी वाटली तरी त्यां प्रत्येकाचं बिझिनेस व रेव्हेन्यू मॉडेल हे वेगवेगळ आहे.  नवनवीन वस्तू, आकर्षक ब्रॅण्ड व पॅकेजिंग, आक्रमाक व इनोव्हेटीव्ह मार्केटिंग, स्टोरेज व डिलिव्हरी आणि मोठ मोठे सेलिब्रेटिज म्हणुन ब्रॅण्ड अ‍म्बॅसेडअर्स हे प्रत्येकाचे काही ठरलेले हुकमी एक्के आहेत.  या प्रत्येकाचा नीट अभ्यास होण गरजेच आहे.  

किराणा सामान एक अगदीच रटाळ खरेदी – पण ही दैनंदिन आयुष्यातील एक महत्वाची आणि अटळ जबाबदारी आहे. घरगुती किराण्याचं गणित आणि त्याची यादी करून ते घरी आणण्यापर्यंतचा ‘भार’ पेलताना गृहिणीना याआधी मोठी कसरत करावी लागायची. पण आता ही जबाबदारी नुसतीच ‘हलकी’ नाही तर फारच सोपी झाली आहे. याचे कारण घरगुती किराणा ‘ऑनलाईन’ उपलब्ध झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान एका जाहिरातीत झळकताना आपल्याला दिसतोय. त्याच्या घरातील किराणा सामान संपलय आणि नवीन सामान कसं आणायचं या विचारात असताना तो सगळं सामान एका क्लिकसरशी घरी मागवतो. आठवलं का? शाहरुखच्या या जाहिरातीत दाखवलेला किराणा सामानाची ऑनलाईन सेवा पुरवणारा स्टार्ट अप म्हणजेच www.bigbasket.com.