Saturday, March 12, 2016

भटजी ऑन क्लिक!


महाराष्ट्र टाईम्स दी. १२ मार्च २०१६:  मॅन्युफॅचरिंगपेक्षा सेवाक्षेत्रात स्टार्टअपची संख्या ही खूपच जास्त दिसते याला मुख्य कारणं म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आमुलाग्र बदल आणि सोशल-मिडियाचा दिवसागणिक होत असलेला मोठा प्रसार.  त्यातही ई-कॉमर्स व ई-बुक ह्या प्रकारात जसे अनेक नवे स्टार्टअप आहेत तसेच विविध सेवांसाठी ह्युमन रिसोर्स उपलब्ध करुन देणे ह्या बिझिनेस मॉडेलवर आधारीतही अनेक नवे स्टार्टअप आहेत.  ह्युमन रिसोर्स मग ते टेक्निकल असो की नॉन-टेक्निकल नवनवीन सेवाक्षेत्रात त्यांची मोठी मागणी आहे आणि ही दिवसागणिक वाढतंच जाणार आहे. 

गेल्या भागात आपण मेडिकलक्षेत्रातील 'प्रक्टो' या आशिया खंडातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या स्टार्टअपच्या विषयी जाणून घेतलं. आज आपण एका गंमतीशीर ह्युमन रिसोर्स म्हणजे भटजी याकडे बघूया.  शिक्षणाचा प्रसार, मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची उपलब्धता, बदलती सामाजिक प्रतिष्ठा अशा कारणांमुळे कित्येक घरातील भिक्षुकीची परंपरा आज जवळपास खंडित झाली आहे. सगळा भार पडत आहे तो काही मोजक्या भटजींवर. त्या बिचार्‍यांना महत्वाच्या मुहूर्तांच्यावेळी मर्यादित षटकांच्या सामन्यासारखी सर्वदूर धावाधाव करावी लागते.

Image result for wello wheelधार्मिक सण-उत्सव प्रसंगी महिलांची आणि एकूणच समाजाची उडणारी तारांबळ लक्षात घेऊन सौम्या वर्धन या तरुणीने स्टार्ट अप क्षेत्रात पाऊल ठेवले आणि सुरु झाले www.shubhpuja.com हे पोर्टल.  दिल्ली विद्यापीठाची ‘स्टटीस्टीस्क (Statistics) मधील पदवी संपादन करणाऱ्या सौम्याने इंग्लंडधील एम्परल कॉलेजमधून एमबीए व नंतर Lancaster Universityमध ऑपरेशन रिसर्चमधील एम.एस्सी. पूर्ण केले. याच क्षेत्रातील सल्लागार म्हणून ती करिअरमध्ये चांगली स्थिरावलीही. पण त्याच सुमारास अधूनमधून भारतात येणाऱ्या सौम्याच्या असे लक्षात येऊ लागले की,  केवळ विशिष्ट प्रासंगिक पुजेसाठीच नव्हे तर अगदी अंत्यविधीसंदर्भातही असे एकही ठिकाण नाही की जेथे या विधीसंबंधी शास्त्रशुध्द व खात्रीशीर माहिती मिळेल. ही उणीव कशी भरून काढता येईल याविषयी मित्रांबरोबर वेळोवेळी केलेल्या चर्चांमधून शुभ पुजाची कल्पना आकार घेत गेली. डिसेंबर २०१२ मध्ये जम बसलेल्या करिअरला तिलांजली देऊन सौम्याने www.subhpuja.com या व्यवसायाची सुरुवात केली. यावेळी सौम्याला फायदा झाल शाळेत असताना आत्मसात केलेल्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाचा. त्याचा उपयोग करून ती वेदविद्या शिकली. शुभ पूजा डॉट कॉम साईटवर आज गर्भसंस्कारापासून बारश्यापर्यंत आणि तेथून पुढे मूंज, साखरपुडा, विवाह, वास्तुशास्त्र, एकसष्ठी, सत्यनारायण, मंगळागौर, श्रावणातील सर्व पुजा, दिवाळीतील लक्ष्मीपूजन या आनंदाच्या क्षणाप्रमाणे अंत्यविधी, श्राद्ध अशा जीवनातील सर्व प्रकारच्या पूजा विधी उपलब्ध आहेत.  

स्टेप्स फॉर सक्सेस

1.   सर्वोत्तम सर्व्हिस जर आपला ब्रॅण्ड असेल - नव्हे तो असायलाच हवा तर आपल्या मनूष्यबळाकडे मग तो प्लंबर, सुतार, ईलेक्ट्रिशयन असो की भटजी त्यांच्याकडे पुर्ण टेक्निकल ज्ञान हे असायलाच हवं. आपल्या व्यवसायाच थेट यश हे त्यांच्याच हातात असतं. कारण ग्राहकांना आपण देऊ केलेली टेक्निकल सर्व्हिसही सर्वोत्तम आणि एक सारखीचं असायला हवी. यासाठी त्यांना नियमित चांगल ट्रेनिंगला पर्याय नाही. हा खर्च नसून ही एक गरजेची इंव्हेटमेंट आहे असं समजा.

2.      चांगल्या ह्युमन रिसोर्ससाठी सुरुवातीलाच त्यांचं शिक्षणं+अनुभव, कठोर टेक्निकल मुलाखत, रेफरंस, सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांचा इतरांशी वागण्याचा त्यांचा कल नीट तपासायला हवं.  टेक्निकल माणसांना सुरुवातीला काही काळासाठी प्रोबेशनवरच ठेवावं. तसेच अयोग्य माणसं मग ती नातेवाईक वा वशिल्याची असली तरी काढण्यात मुळीच चालढकल करु नये. यश तिथंच आहे.

3.      चांगली माणसांना भरमसाठ पैसा नाही तरी ठरलेल्या वेळी करिअर ग्रोथच्या संधी आणि योग्य सन्मान ही देणं महत्वाचं आहे.
धार्मिक सण, कौटुंबिक समारंभ, उद्योग व्यवसायातले मुहूर्त अशा प्रत्येक गरजेसाठी ऑनलाईन पद्धतीने पुजेची सुविधा येथे आहे.

सर्व प्रकारच्या पुजेसाठी सौम्याच्या टीममध्ये वेदविद्या निपुण भटजी आहेत. यातल्या काहीजणांनी वैदिक विषयात डॉक्टरेट (PHD) केलेली आहे.  अमुक एखादा पुजाविधी का करायचा? त्यावेळी म्हटल्या जाणारया मंत्राचा अर्थ काय,  अशा सर्व शंकाचे निवारण हे उच्चविद्याविभूषित गुरुजी करतात.  काही अंशी मोफत सल्ला मसलत हे शुभ पूजाच्या यशातील एक गमक आहे. पूजेच्या प्रकारानुसार संपूर्ण पुजा सामानाचे किटही ते उपलब्ध करुन देतात. मुख्य म्हणजे यजमानांची श्रीमंती पाहून येथे दक्षिणा सांगितली जात नाही. प्रत्येक प्रकारच्या पुजेसाठीची दक्षिणा ठरलेली आहे.

पुजा विधीसाठीचे पुरोहित, ज्योतिषी यांची योग्यता तपासण्याच्या फंदात सर्वसामान्य माणूस पडत नाही. पण अत्याधुनिक ऑनलाईन पध्दतीने हा व्यवसाय करायचे ठरवल्यावर शुभ पूजाने जाणीवपूर्वक अत्यंत निष्णांत अशा जाणकारांचीच निवड केली. शुभ पुजाची मुहूर्तमेढ जरी दिल्लीत रोवली गेली असली तरी गेल्या दोन वर्षात भारताची सीमा पार करून रशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका या देशात तिने शिरकाव केलाय. यापैकी रशिया व अमेरिकेतून सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आगामी काही महिन्यात परस्परविरोधी विचारसरणीच्या या दोन देशांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सौम्याने ठरवले आहे.

भारतातील पूजा-धार्मिक विधींची बाजारपेठ ही वार्षिक काही लाख कोटी रुपयांची असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. ‘ऑनलाईन पूजा’ या नाविन्यपूर्ण कल्पनेला भारतासारख्या देशात मिळालेला प्रतिसाद चकित करणारा आहे. नाशिक, उज्ज, हरिद्वार, वाराणसी इत्यादी धर्मपिठाच्या ९०हून अधिक विद्वान, पंडित पुरोहितांचा समावेश शुभ पूजाच्या संचात आहे.
  
एकीकडे आपण ग्लोबलाझेशन आणि इनफर्मेशन टेक्नॉलॉजीचा भारतीय समाजाच्या सर्व स्थरात वाढता प्रभाव आणि झालेली आर्थिक प्रगती बघतो, आणि दुसरीकडे आपण मुलांच्या मुलभुत शिक्षणापेक्षा धार्मिक कार्यक्रमावर जास्त खर्चही होताना दिसतो. पूजा डॉट कॉमची सौम्या एक गोष्ट आवर्जून नमूद करते ती म्हणजे देवावर विश्वास हवा, परंतु त्याहीपेक्षा जास्त व्यक्तीचा स्वतःच्या कामावर आणि कर्तृत्वावर विश्वास असायला हवा. कारण त्याशिवाय अडथळे पार करून इथपर्यंत पोहोचता येत नाही. शेवटी झपाटलेल्या व्यक्तीच हे जग बदलू शकतात.’’ सौम्याचे हे विचार मला कुठल्याही पुजेपेक्षा नक्कीच जास्त आश्वासक वाटतात.  स्टर्टअप सुरु करणारे तरूण सौम्याच्या याच विचारांना लाईक करतील यात मला शंका नाही. 

- नितीन पोतदार                        

संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन

No comments: