Sunday, June 19, 2016

स्मार्टसीटी हवी सेफसीटी

महाराष्ट्र टाईम्स १८ जून २०१६ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, पण दुर्दैवाने या मार्गावर होणार्‍या अपघांतामुळे या मार्गाची बदनामीच जास्त झाली.  महामार्ग बनविताना राहिलेल्या मुलभूत तांत्रिक त्रुटीमुळे आणि जास्त करुन आपल्याकडील वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे हे अपघात होतात हे आता सिध्द झालेल आहे.  लेनची शिस्त न पाळणे, द्रुतगती मार्गावर गाड्या थांबवणे, नियमितपणे टायर न बदलणे, सीट-बेल्ट न लावणे, दारु-नशा करुन गाडी भरधाव चालवणे, तसेच रात्री विश्रांती न घेता सलग कित्येक तास गाडी चालवणे या व अशा गोष्टींना आम्ही गुन्हा समजतच नाही.  वेग कमी कर, योग्य लेन मधुनच गाडीचालवं किंवा ओवर-टेक करु नको असं कुणीतरी सुचवलं जरी तरी  पुषकळं अपघात टाळता येतील .. पण हे काम कुणी करायचं? हे काम एखादी मशीन करु शकेल क? 

असे रस्ते अपघात होऊ नयेत किंवा निदान ते कमी कसे करता येतील यावर जगभरातच संशोधन सुरु आहे. वाहनांमध्येही तर नेहमीच या बाबत सुधारणा होत असतात. गुगलचा ड्रायव्हरशिवाय कार हा एक प्रकल्पही आहे.  कारव्ही (carvi) www.getcarvi.com ही रस्ते-सुरक्षा हाच व्यवसायाचा भाग असलेली एक स्टार्टअप कंपनी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत आहे तिचा आज परिचय करुन घेऊया.

Sunday, June 5, 2016

तरुणांनी सैराटचं झाल पाहिजे ..

सैराट हा माझा मते एक सिनेमा नसून आपल्या जगण्यातलं कटु आणि तितकंच भयाण वास्तव दाखवतो. कुणी म्हणत हा सिनेमा एक मनाला खोलवर चटका लावणारी प्रेमकथा आहे, कुणी म्हणत आपल्या जातीव्यवस्थेवर केलेलं कठोर भाष्य आहे, तर कुणी म्हणत हा सिनेमा ऑनर किलिंगवर आहे.
खरं तर सैराट सिनेमात दाखवलेली लव-स्टोरी स्टोरी हे निमित्तमात्र आहे. सैराट जातीच्या, धर्माच्या आणि वर्गाच्या खूपच पलीकडे जातो. गाव, खेडी, भाषा, राज्य, आणि खर तर देशांच्या ही सीमेपलीकडे तो जातो. आपण जन्मापासून ज्यां विचारांवर, आचारांवर, संस्कारावर आणि खर तर खोट्या अहंकारावार वाढतो ते आपल्याला ‘माणूस’ बनण्यापासून किती लांब ठेवतात याची प्रचीती आपल्याला सिनेमा बघताना वारंवार येतरहाते. आपल्या जुन्या रूढी परंपरांचा आपल्याला आपलाच राग येवू लागतो.