Monday, July 25, 2016

डिग्री ते डेस्टिनी व्हाया मार्कस ..

महाराष्ट्र टाईम्स २३ जुलै २०१६ : दहावी, बारावी, डिग्री, डिप्लोमा किंवा आज प्रत्येक अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी प्रवेश परिक्षा - या सगळ्यांना हवे आहेत फक्त मार्कस .. आज कुठयाही चांगल्या कॉलेजचा प्रवेश घ्या नव्वद टक्यापुढे मार्कस असल्याशिवाय अ‍ॅडमिशनचा फॉर्म देखील मिळेल का यात शंका आहे. आज आपल्याकडे शंभर डिग्र्या आणि हजारो कोर्सेस आहेत पण त्यांच्या प्रवेशासाठी हवे आहेत फक्त मार्क्स! नाहीतर लाखो रुपयांची देणगी. यात करिअर नियोजनाच्या या प्रयत्नात असलेले पालक आपल्या मुलांची बलस्थाने, स्वाभाविक कल,  व्यक्तिमत्व क्षमता व त्यांची आवड काय आहे याचा विचार देखील करु शकत नाहीत ही आजची खरी गंभीर समस्या आहे.  We all are victims of the age old education system.  म्हणून आपल्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा मिळतो पण आपल्या मुलांना हवी ती डेस्टिनी मिळतं नाही हे देशाचं मोठं दुर्दैव आहे.

Monday, July 11, 2016

ड्रीम करिअर साकारताना...

Image result for dream careerमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ :आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत .. जे शिक्षीत आहेत तेही सगळेच रोजगारास पात्र नाही. मेकॅंझीच्या एका अहवालानुसार तर देशातील इंजिनीअर पदवीधरांपैकी ८० टक्के इंजिनीअरकडे नोकरीसाठी आवश्यक ते कौशल्य नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेतील किंवा इतर देशातील शिक्षणव्यवस्थेबरोबर आपण काय तुलना करणार? जिज्ञासावृत्ती जागी करणारी, संशोधनास प्रवृत्त करणारी, प्रश्न विचारण्याची मुभा देणारी शिक्षणव्यवस्था आपल्याकडे नाही हे आपलं दुर्दैवं! इतका आमुलाग्र बदल येत्या काही वर्षात होईल किंवा नाही याची शंका आहे कारण पुलंनी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे आहे ती गप्प बसा संस्कृती.  एक चांगली बाब म्हणजे गेल्या काही वर्षात शिक्षणव्यवस्थेत धीम्या गतीने का होईना पण अभ्यासक्रमात बदल होत आहे, नवे प्रयोग राबवले जात आहेत. याचाच एक परिणाम म्हणजे दहावी-बारावीनंतर आज पर्यायांची रेलचेल आहे.  वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणार्‍यांसाठी करिअर नियोजन, अ‍ॅप्टिट्युड टेस्ट, नव-नविन अभ्यासक्रम, विविध व्होकेशनल कोर्सेस, त्यांच्या प्रवेश परिक्षा. एकुणचं शैक्षणिक क्षेत्रात मुलांची आणि पालकांची गरज ओळखून ह्या क्षेत्रात नव-नविन स्टर्टअप्सनी प्रवेश केला नसता तरचं नवलं. करिअरचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अशाच एका स्टार्टअप्सचा परिचय आपण करून घेणार आहोत.