Saturday, August 6, 2016

शिक्षण की शिक्षा ?

महाराष्ट्र टाईम्स ६ ऑगस्त २०१६ : शिक्षणाला हिंदीत शिक्षाका म्हणतात या पु.लं.च्या कोटीचा अर्थ काही वर्षा पासून सुरु असलेल्या ऑनलाईन अकरावी प्रवेशाचा गोंधळ बघून नक्कीच लागेल.  ऑगस्ट महिना उजाडला तरी अजून सगळ्या मुलांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळालेले नाहीत.  एकीकडे संपूर्ण जगाचं बॅकं ऑफिस आपल्या आयटी कंपान्या सांभाळू शकतात आणि दुसरी कडे आपण साधा कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा  प्रवेश मुलांना मानास्तापाशिवाय देवू शकत नाही.  हा दोष कंप्युटर-सिटिम नसून; ही पद्धती राबवणाऱ्यांच्या नाकर्तेपाणाचा आहे अस म्हटलं तर गैर होणार नाही. 


खरं तर आपली मुल त्यांना पाहिजे त्यां कॉलेज मध्ये चांगले मार्क मिळवून देखील प्रवेश मिळू शकत नाही ही आपल्या एकुणच शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका आहे!  म्हणूनच आज ऑनलाईन कोर्सेसकडे  मुलांची जास्त कल दिसतो.  आपली चांगली कॉलेजेस हेच ऑनलाईन कोर्सेस का सुरु करू शकत नाही? म्हणजे प्रत्येकाला मना सारख्या चांगल्या कॉलेज मध्ये निदान ऑनलाईन शिक्षण तरी घेता येईल. तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड उलाढाल असलेल्या -लर्निंग क्षेत्रात अजूनही आपल्या मोठ्या शैक्षणिक संस्था का उतरत नाही हे मला न उलगडलेलं कोड आहे. पण याच ई-लर्निंग मध्ये काम करणार्या एका स्टार्टअपचा थक्क करणारा प्रवास बघुया

ई-लर्निंग ..

कौशल्यात सतत वाढ-विकास करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच ऑनलाईन प्रशिक्षणाचे स्थान अनन्यसाधारण ठरत आहे.  जुन्या शिक्षणपद्धती शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्दोगविश्वासाला लागणार कौशल्य यातील विसंगती हाच खरा आज चिंतेचा विषय आहे. आपला देश माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्रस्थान ठरत असताना अशी स्थिती असावी हे उपहासात्मकच म्हणायला हवे. तरुणांबरोबर मध्यम पातळीवरील व्यावसायिकांना त्यांचा करिअर विकास कुंठीत झाल्यासारखा वाटतो. यातून बढती पेक्षा कित्येक ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा  प्रश्न निर्माण झालेला आहे.  आज सोशल व डिजिटल मार्केटिंग,  क्लाउड कॉम्प्युटींग यांसारखी नवी तंत्रे त्यांना शिकावीच लागाणार.  अशांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन कौशल्ये विकसित करावी. हे कोर्सेस उद्योगाच्या मागणीशी सुसंगत असतात.
सिम्पली लर्नhttp://www.simplilearn.com  ही व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र देणारी आता भारतातीलच नव्हे तर जगातील एक अग्रगण्य स्टार्टअप कंपनी आहे! ४० हून अधिक जागतिक अधिस्वीकृती मिळवणारे हे स्टार्ट अप दोन हजारांहून अधिक तज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने जगभरातील १५० देशांमधून ४०० हून अधिक अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबवते. विशेष म्हणजे  प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल याबाबत इथे कसलाही गोंधळ नाही.  

ऑनलाईन व्यावसायिक शिक्षणाच्या व प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील 'पायोनिअर' असल्याने ही कंपनी व्यावसायिकांच्या करिअर वाढीवर थेट प्रभाव टाकते.  याचे भान ठेवून कंपनीचा भर अधिकृत मान्यता असलेल्या अल्प मुदतीचे प्रशिक्षण देण्यावर आहे आणि यामुळेच कंपनीचे अदि्वतीयत्व टिकून आहे. सिम्पली लर्न व्यक्तीला तिचे नेमके उद्दिष्ट गाठण्यास मदत करते. यामुळे चांगल्या नोकरीची संधी आणि आहे त्यापेक्षा जास्तीचा पगार ते मिळवू शकतात.

सिम्पली लर्नची स्थापना कृष्णा कुमार यांनी २००९ सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींसाठी (पीएमपी) ब्लॉग स्वरुपात केली.  सुरुवातीला उपयुक्त सल्ला देणे, सूचना देणे एवढाच भाग होता.  हळू हळू त्यांनी स्टार्ट अपच्या आकाशात झेप घेतली. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध केले.  बंगलोर स्थित या स्टार्ट अपने आयटी ने पुढे सर्व्हिस मॅनेजमेंट, आयटी सिक्युरिटी मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट (हे पदवी अभ्यासक्रम) आणि टेक्नोलॉजि व फायनान्स मॅनेजमेंटमधील (पदविका) प्रमाणपत्र असे आणखी पाच अभ्यासक्रम सुरु केले.

याविषयी कृष्णा कुमार सांगतात, ‘‘टेकयुनिफाइडहे माझे पहिले व्यावसायिक धाडस होते. ते विकून मी ब्लॉग सुरु केला. पीएमपी विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य इ-अध्यापन सुरु केले. त्याला जगाच्या विविध भागातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या ९ महिन्यात मी ३० देशांतील ३ हजार जणांना प्रशिक्षित केले. त्यातूनच मला ऑनलाईन माध्यमाची ताकद समजली. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कोणत्या तरी महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देणे हे कंपन्यांसाठी अतिशय महत्वाचे असते. त्यातूनच व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्याची गरज किती तीव्र आहे हे माझ्या लक्षात आले.’’

अल्पावधीतच स्टार्ट अप क्षेत्रात स्थिरावण्यास कृष्णा कुमार यांच्या कंपनीला फारसा वेळ लागला नाही. यातच इंटरनेट आणि मोबाईलचा वाढता वापर यामुळे केवळ व्यक्तिगत स्तरावरील नव्हे तर कंपन्यांनासुद्धा त्यांच्या नोकरदारांना प्रशिक्षित करणे गरजेचे वाटू लागले. याचा फायदा घेत सिम्पली लर्नने गुगल, बिंग, फेसबुक आणि लिंकएडइन व इमेल द्वारा आपल्या स्टार्ट अपला प्रशिक्षणार्थींमध्ये नाव मिळवून दिले. या यशामुळे सिम्पली लर्नकडे गुंतवणुकीचा ओघ वाढू लागला नसता तरच नवल.  २०१२ मध्ये गुंतवणुकीच्या मालिकेत हेलिऑन व्हेंचर पार्टनर्स आणि कालारी कॅपिटल यांनी ३ दशलक्ष कंपनीत गुंतवले.  त्यानंतर वर्षभराने ब-बीगुंतवणूक मालिकेत याच कंपन्यांनी १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पुन्हा गुंतवले. २०१५च्या एप्रिलमध्ये या दोन कंपन्यांसह मेफिल्डच्या गुंतवणुकीमुळे सिम्पली लर्नची गुंतवणूक १५ दशलक्ष डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे.

सिम्पली लर्न सध्या ४०० अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवत असून यात दरमहा एका अभ्यासक्रमाची भर पडत आहे.  बिग डाटा संगणकाच्या मदतीने महा-माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करणे, डिजिटल मार्केटिंग अस आजच्या काळात उपयुक्त अभ्यासक्रम इथे आहेत. यापैकी TOGAF, Certified Scrum Master, CISSP, ITIL, Hadoop, Cassandra, Social Media, Web Analytics, Android App development इत्यादी अभ्यासक्रमांना भारत तसेच अमेरिकेत विशेष मागणी आहे.  कंपनीचा असा दावा आहे की, इ-लर्निंगचा १७५ हून अधिक तासांचा कंन्टेट त्यात असून ह कोर्स १८० दिवसात पूर्ण होतो. शैक्षणिक साहित्य आणि प्रमाणपत्र OMCP.org कडून दिले जाते.
सिम्पली लर्न सध्या उद्योग-व्यवसायांना सेवा देत असली तरी तिचा भर व्यक्तिगत ग्राहकांवर अधिक आहे व त्यांना जगभरात आपला विस्तार करायचा आहे. त्यासाठी या वर्षाच्या अखेरीपर्यंत ६०० व्यावसायिक अभ्यासक्रम विकसित करण्याची कंपनीची योजना आहे.

२०१५ संपे पर्यंत सिम्पली लर्नने १०० कोटींची यशस्वी उलाढाल केली.  सिम्पली लर्नचे संस्थापक व सीईओ कृष्णा कुमार यांची प्रतिक्रिया शिक्षणाकडे डोळसपणे पाहायला लावणारी अशीच आहे. ते म्हणतात, ‘‘आमचे सर्व अभ्यासक्रम हे स्वयं शिक्षण आणि शिक्षक नेतृत्वाचे शिकवणी वर्ग आहेत. वर्षाचे सर्व दिवस अहोरात्र चालू असल्याने तिला भौगोलिक सीमा नाहीत, वेळेचे बंधन नाही. शिक्षण हे ते घेणाऱ्यांच्या सोयीचे असावे असे आम्हाला वाटते. आगामी दोन वर्षात वर्षाला दशलक्ष करिअरवर परिणाम घडवून आणण्याची आमची योजना आहे तंत्रज्ञान आणि प्रतिभा यासाठी आमच्याशी हातमिळवणी करू इच्छिणाऱ्या नाविन्यपूर्ण अशा स्टार्ट अपच्या आम्ही शोधात आहोत.’’  

इंटरनेटचा वाढता वापर आणि केंद्रसरकारचे डिजिटल इंडियाचे महत्वाकांक्षी स्वप्न यामुळे आगामी काळात ऑनलाईन शिक्षणाचे मह्त्व अनेक पटींनी वाढणार आहे हे आपल्या मोठ् मोठ्या देणग्या घेणार्या शैक्षणिक संस्थाना जरी कळल तरी पुरे.

नितीन पोतदार
nitinpotdar@maxplore.in

No comments: