Saturday, November 26, 2016

नोटाबंदी एक नवी संधी ..

Image result for mobile wallet paymentमहाराष्ट्र टाईम्स २६ नोव्हेंबर २०१६: पेटिएम करोया टीव्हीवरील छोटश्या जाहिरातीचा खरा ‘अर्थ’ पाचशे-हजाराच्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना आता पर्यंत चांगलाच समजला असेल.  ‘मोबाईल-वॉलेट-सर्व्हिस’या बाजारपेठेत जगभर यश संपादन केलेली पेटीएम ही एक आघाडीची कंपनीची आहे. याची सुरवात कुणी व कशी केली हे मराठी तरुणांसाठी बघणं फार महत्वाच आहे म्हणून हा आजचा लेख.

पेटीएम या स्टार्ट अपचे संस्थापक विजय शर्मा, मुळचे उत्तर प्रदेशातील अलिगढचे.  शाळेतील ते एक हुशार विद्यार्थी. पुढे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ते दिल्लीला आले.  इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन सुरु केले. महिना दहा हजार रुपयांची नोकरी सोडून आयटी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारचे बिले भागवणे या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेने बॅंकिंग क्षेत्राचे संपूर्ण चित्रच पालटून गेले. 


विजय यांनी जेव्हा ही कल्पना प्रथम आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडली तेव्हा तिच्या यशस्वीतेबद्द्ल शंका व्यक्त करण्यात आल्या.  त्यांना उद्देशून विजय म्हणाले, ‘‘इतर जे करतात तेच करण्यात फारसा अर्थ नाही. ‘अरे, तुम्हाला काय जमतंय?’ असे उद्गार इतर व्यक्ती काढतात, त्याचा अर्थ ते काम खूप आव्हानात्मक आहे आणि ते शिंगावर घेऊन करण्यात खरी मजा आहे.’’ अशाप्रकारे जून २०१२ मध्ये पेटीएमची (www.paytm.com) सुरुवात ही ऑनलाईन मोबाईल रिचार्ज या सेवेने झाली.

पेटीएम  म्हणजे स्मार्ट फोनमधील पैशांचे पाकीट - यात ग्राहक पेटीएमच्या पाकिटात पैसे साठवून आपले सर्व व्यवहार तातडीने करू शकतो हे याचे मुख्य वैशिष्ट्य.  त्याच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यातील पैसे दुकानदार,  हॉटेल, सराफ आणि अगदी पेटीएमच्या जाहिरातीतीत दाखवतात तसे टॅक्सी-रिक्षावाल्यापर्यंत कोणाच्याही खात्यात जमा होऊ शकतात. मोबाईल रिचार्ज, वीजबिल, बस, रेल्वे, विमान, चित्रपटाची तिकिटे, गॅस बील, हॉटेलमधील खोलीचे आरक्षण अशी जरुरी कामे पेटीएमद्वारे करता येतात. पेटीएम किराणा दुकानात पोहोचल्यावर या पद्धतीने बाजारपेठांमधील व्यवहारांवर चांगलाच कब्जा मिळवला. या पद्धतीने अडचणीतील मित्रालाही तातडीने मदत पाठवता येते. तसेच विविध प्रकारचे पैसे देण्यासाठी मोबाईल सोबत आपला साधा संगणक देखिल वापरता येतो.

हे पेटीएम वापरणे अगदीसोपे आहे. आपल्या स्मार्ट फोनमध्ये आधी पेटीएमचे अॅप डाऊनलोड करायचे आणि मग त्यात स्वतःचे खाते उघडून काही पैसे आपल्या बँक खात्यातून त्यात जमा करायचे आणि गरजेप्रमाणे पे-किंवा-सेन्ड हे पर्याय वापरायचे. सगळ्यात महत्वाचं


कॅशफुल स्टार्टअप्स ..  

अगदी सुरुवातीच्या व्यवहारात असलेली वस्तुंची अदला-बदल, नाण्यांच्या रोख व्यवहाराने, आणि मग बॅंकेच्या चेक-बुक ने घेतली, मग जलद पैसे पाठवण्यासाठी पोस्टाची मनी ऑर्डर आली, कंप्युटरच्या युगात घरोघरी नेट-बॅंकिंग आलं, 24/7 चालणार्या एटीएम मशीन्स आल्या आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल-वॅलेट !  

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात रोखविरहीत व्यवहारांना चेक, डिमांड ड्राफ्ट, नेट-बँकिंग,  क्रेडीट-डेबिट कार्ड मार्फत होणारा रोखविरहीत व्यवहार येत्या चार-पाच वर्षात ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा तज्ञांचा अंदाज आहे. पण त्याच बरोबर ग्रामीण व असंघटित क्षेत्रात मोठी उलथापालथ झालेली आहे, कित्येकांचे व्यवहार पुर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचे परिणाम भविष्यात भयकंर असू शकतील.

१२५ कोटीं लोकसंख्या असलेल्या देशात इतका मोठा बदल आर्थिक साक्षरतेशिवाय पूर्ण होवुच शकत  नाही. दुर्दैवाने आपल्या देशात जिथं  साक्षरताच नाही तिथं आर्थिक साक्षरता कुठुन येणार?  मुंबई-पुणे सारख्या शहरात आपल्या मुलांची पैसे कमवायलालागे पर्यंत आपण साधी बॅंकखाती काढत नाही तर देशाच्या ग्रामीण भागात काय दुरावस्था असेल याचा विचारच न केलेला बरा. म्हणुन देशात आर्थिक साक्षरतेसाठी मोठ्या प्रमाणात जन-जागृती होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तरुणांनीच पुढे यायला पाहीजें. समाजातील प्रत्येकाला गरजेनुसार विविध लहानमोठे आर्थिक साक्षरतेचे कोर्सेस, बॅंकांचे व्यवहार, कॅशलेस व्यवहार शिकवण्यासाठी प्रत्येक भाषेमध्ये स्टर्टअप्स होवु शकतात. नोटाबंदीतून नेमके काय निष्पन्न होईल हे नजीकच्या भविष्यकाळात समजेलच पण त्यातुन स्टर्टप्सला आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमातुन भरपुर कॅश कमावण्याची संधी मिळु शकते हे नक्की ..    

मोबाईल वॅलेट म्हणजे आपण आपल्या बँक खात्यातील पैसे जरुरीनुसारच पेटीएम पाकिटात टाकू शकतो, आणि आपल बॅंक खातं पुर्णपणे सुरक्षित ठेवू शकतो. यासाठी इंटरनेटची गरज पडत नाही. विजय म्हणतात, ‘‘ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीच्या प्राप्तीतील ३० टक्के रक्कम प्रचार मोहिमेसाठी खर्च केली जाते. कारण ग्राहकांचा विश्वास हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे.’’

विजय हे कोणा एकट्याचे यश न मानता सांघिक कामाचे यश मानतात. संचालक मंडळावरील व्यक्ती या ध्येयनिष्ठेने झपाटलेल्या असल्याने कंपनीला जगभरात प्रतिष्ठा मिळू शकली याचे भान ठेवून विजयने त्याच्याकडील समभागांच्या ४ टक्के म्हणजे जवळपास १२ कोटी डॉलर्स एव्हढी रक्कम त्यांच्या टीमला दिली.

पेटीएममध्ये अलिबाबा, सैफ पार्टनर्स, सफायर व्हेंचर्स आणि सिलिकॉन व्हॅली बँक अशा नामांकित गुंतवणूकदारांकडून १० कोटी डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. याशिवाय अलीकडेच रतन टाटा यांनीही पेटीएममध्ये भरीव गुंतवणूक केली. नवी दिल्लीत मुख्यालय असलेल्या पेटीएमची मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, कोलकाता अशा शहरांत विभागीय कार्यालये आहेत. शिवाय आफ्रिका, युरोप, मध्यपूर्व आणि दक्षिण आशियातही पेटीएमचा विस्तार झाला आहे. जवळपास ३२०० हून अधिक व्यक्तींची टीम पेटीएमसाठी काम करते आहे.   

गेल्या काही दिवसात बाजारपेठेत जी चलन टंचाई निर्माण झाली त्यामुळे पेटीएमच्या ग्राहकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५००-१००० च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर ४-५ दिवसातच पेटीएमला ३० लाख नवे ग्राहक मिळाले. त्यांच्या व्यवहारात तीनशे टक्क्यांनी वाढ झाली. त्यांचे नियमित ग्राहक, पुन्हा वापर करू लागलेले खंडित ग्राहक आणि नवे ग्राहक अशी सर्व मिळून ही संख्या आता १ कोटी लाखांच्या पुढे पोहोचली आहे. नोटा टंचाईने त्रस्त झालेला व्यापारी वर्गही पेटीएमशी जोडला गेलाय. दिवसाला २५ हजार याप्रमाणे चार दिवसातच व्यापाऱ्यांची संख्या १ लाखाच्या पुढे पोहोचली आहे. यात दिल्ली, बेंगलोर, पुणे, मुंबई, हैद्राबाद या महानगरांत व्यवहार संख्याचा उच्चांक प्रस्थापित झाला. आता पेटीएमची प्रणाली स्वीकारणार्‍या जगभरातील व्यापाऱ्यांची संख्या ८ लाख ५० हजारच्या पुढे गेली आहे.

एकूणच २०१६ साल विजय शर्मांसाठी भाग्याचे ठरले आहे. मागील एका वर्षात त्यांच्या संपत्तीत १६२ टक्क्यांनी वाढ झाली असून हुरन्स इंडियाच्या ४० वर्षांखालील अतीश्रीमंत व्यक्तींच्या यादीत २०१६ मध्ये विजय शर्मा यांचा समावेश झाला आहे. गतवर्षीच्या २ हजार ८२४ कोटींपासून यावर्षीच्या ७ हजार ३०० कोटींपर्यंत ही वाढ पोहोचली असून कंपनीचे २१ टक्के शेअर्स त्यांच्याकडे आहेत. २०१६ मधील सर्वोत्कृष्ट स्टार्ट अप म्हणून पेटीएमने ‘फोर्ब्ज लिडरशीप अॅवार्ड’ पटकावले आहे.
पेटीएमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दीपक अब्बोट म्हणतात, ‘‘काही दिवसातच एक हजार टक्क्यांपर्यंत पोहोचलेली ही वाढ आश्चर्याचा सुखद धक्का देणारी आहे. अगदी ३०-५० रुपयांचा किरकोळ व्यवहारसुद्धा आज पेटीएमच्या माध्यमातून केला जातोय. हे निश्चितच आमच्या सांघिक प्रयत्नाचे यश 
आहे.’’  


No comments: