Friday, May 20, 2011

माझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम!

२० मे २०११:   २००९ वर्षांपासून केवळ १ डॉलर वेतन घेणाऱ्या सिटी बॅक सीईओ विक्रम पंडित यांचा कंपनीने त्यांनी केलेल्या अलौकिक कामगिरीबद्दल भरघोस बक्षिसी देऊन गौरव केला आहे!  आर्थिक गर्तेत सापडलेल्या न्यूयॉर्कस्थित सिटी ग्रुपला गतवैभव मिळवून देण्यासाठी झगडणा-या पंडीतांना सिटी बॅंकेने तब्बल १ कोटी ६० लाख डॉलरची विशेष बक्षिसी बहाल केलेली आहे.   त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आपण त्यांचे मनापासुन अभिनंदन आणि तोंडभरुन कौतुक करुया.   परदेशात असलेल्या प्रत्येक भारतीयाची मान आज अभिमानाने ताठ झालेली असेल.

सीटी ग्रुप आर्थिक संकटातून जात असताना पंडितांचे दुरदर्शी धोरण, पारदर्शक नेतृत्व आणि पैशाचे योग्य नियोजन या मुळे त्यांच्या व्यवस्थापकीय सदस्यांना योग्य दिशेने मार्ग काढण्यात यश आले अशी माहिती देत कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष रिचर्ड पार्सन यांनी पंडित यांना बक्षिसाची घोषणा केली.   पंडित यांनी सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर कंपनीला नफा मिळवला.   पंडित यांना मिळालेल्या प्रोत्साहनपर बक्षिसाचा पहिला हप्ता शेअरच्या स्वरुपात १ कोटी डॉलरचा असून तीन टप्प्यांत ही रक्कम त्यांना समान भागात दिली जाणार आहे. त्यांना ६० लाख ६५ हजार डॉलर रोख स्वरुपात मिळणार आहेत. यापैकी दोन तृतीयांश रक्कम त्यांना १७ मे २०१३ रोजी दिली जाणार आहे.  प्रश्न त्यांना पैसे किती मिळाले ह्याचा नसुन तो कशासाठी मिळालेला आहे हे महत्वाच आहे.  सिटीसारख्या बल्लढ्य बॅंकेचा सिईओ होणं म्हणजे रोज एका अग्निदिव्यातुन जाण्यासारखं आहे मग ते सुगीचे दिवस असो की आर्थिक मंदीचे;  त्यात जागतिक आर्थिक संकट म्हणजे दुष्काळात पंधरावा महिन!   कुठल्याही मल्टिनॅशनल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मिटींग्सस मधे आणि समभागधारकांच्या सभेला सामोरे जाणं म्हणजे त्यांच काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.   अशाच एका मिटींग मधे असणाऱ्या टेन्शनच एक चित्र वर देत आहे.  

यशात हजार लोक मित्र म्हणुन सहभागी होतात; पण अपयश हे फक्त एकट्याच असतं हे कटु सत्य माहित असताना देखिल  चेहऱ्यावर सतत हास्याची लकीर न सोडता विक्रम पंडितांनी इतकी मोठी जबाबदारी यश्स्वीपणे पार पाडली हे यश फक्त त्यांच आणि त्यांच्या कुटूंबियांच आहे.   जगातल्या बॅकिंग क्षेत्रातल गेल्या काही दशकामधल हे सगळ्यात मोठं यश असेल,  त्यात ते महाराष्ट्राचे आहेत आणि मुख्य म्हणजे ते अस्सल मराठी आहेत म्हणुन जरा जास्तच कौतुक!  मराठी माणसांवर एक टीका नेहमी होते की आपण फक्त संगीत, नाटक आणि क्रीडा याच क्षेत्रातत यश मिळवु शकतो, पण पैशाच गणित त्याला जमत नाही आणि कळत देखिल नाही.  ही टीका संपुर्णपणे किती खोटी आहे हे विक्रम पंडीतांनी दाखवुन दिलं.    तोट्यात आलेली जागातील सगळ्यात मोठी बॅंक त्यांनी फायद्यात आणली.  त्यांनी जे केल ते एखाद्या गुजराती किंवा मारवाड्याला सुद्दा जमलं नसत!   हो त्यांना सुद्दा अस यश मिळवता आलं नसतं!   पंडीतांनी कुठलाही आकड्यां खेळ केला नाही, कुठलही चोरी केली नाही की लबाडी देखील केलेली नाही.   एक निश्चित धोरण ठरवून त्यांनी यश मिळवलेल आहे.  हे हिमालया एवढे प्रचंड यश आहे.   लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या विक्रमांच्या तोडीचा हा विक्रम आहे!   आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी त्यांच "विक्रम" हे नाव पुर्णपणे सार्थ केलं.  असा विक्रम पुन्हा होणे नाही!!   हा ब्लॉग वाचणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी पंडीताच्या यशा बद्दलच्या सर्व बातम्या /मजकूर आपल्या सर्व मित्रांना वाचण्यासाठी पाठवा. 

टीप:  विक्रम पंडितया महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा जगभर असा गौरव होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि अभिमानाची प्रतीक मानली गेलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम कारभारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) या बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करून तिथे प्रशासक नेमण्याची घोषणा केली.   मुख्य म्हणजे राज्याचे अर्थमंत्रीच या बँकेच्या संचालक मंडळाचे गेली अनेक वर्षे सदस्य आहे.   महाराष्ट्राच्या इतर सहकारी बॅंकांची काही वेगळी परिस्थिती नाही, त्यांच्या बद्दल न बोललेल बरं.  

5 comments:

साधक said...

पंडित भारतीय व त्यातल्या त्यात मराठी असल्याचा अभिमान वाटतो. प्रेरणादायक पोस्ट.

Anonymous said...

Case of Vikram Pandit shows,
Maharashtrians are at par with,or little better than rest of the world,person like him,could do things,and even after staying overseas,he is supporting Maharashtra in many ways,medical services through,Gajanan Maharaj SANSTHAN IS JUST ONE SUCH SERVICE,
HE IS TRUE MARATHI TO CORE.
It's time for all those who have returned to Maharashtra,from last 40 years,under the cover of doing good and slogan of giving the best to Maharashtra,have taken only the best from the state,and given nothing,same is the case with many Maharashtrian who live on the soil of Maharashtra,but enjoy undermining the state,it's time they follow Vikram Pandit,and stay loyal to the state,as finally cash in their pocket is from common Maharashtrians,they should respect the state,while showing their own EGO TOWERS.
We need such Vikram to rescue Maharashtra.
people like Vikram are more Indians and Maharashtrians,than those living in.

Anonymous said...

Salute to this wonderful maverick man...i mean Superman.... He is truely global banker.... Our leaders from Maharashtra shouls learn something from this icon... what we really need more more such Vikram's to save our Maharashtra from the present shamless creatures.. I am not using word leaders because our politicians in Maharashtra are living only for themselves... Few years some one has coined the concept of "Garibi Hatao"...Logo ki Nahi ... Khud ki... I still can't understand why we give so much undue importance to these creatures... Just neglect them and follow the teachers, leaders like Vikram Pandit.... Then and then only we will be able to call our Jai Maharashtra....

Hobasrao said...

Congratulations to Mr. Vikram Pandit for this wonderful success. This definitely puts and example in front of us and everybody else, that we Marathi people are nothing less but in fact much better. What we need is readiness towards taking efforts like Mr. Vikram did. When we Marathi people take something serious, we put our efforts all hearted, try genuinely and good point is we are mostly honest people.
Further we should congratulate him more as he is Marathi and helping for Marathi cause.

Anonymous said...

www.myniti.com is cool, bookmarked!

[url=http://www.buzzfeed.com/bookie/unlock-samsung-blackberry-nokia-lg-motorola-an-39dn]unlock motorola[/url]